एक्स्प्लोर

Obscene Post : अश्लील पोस्ट लाईक करणं अपराध नाही, अलाहाबाद उच्च न्यायालयाचा निर्वाळा

Allahabad High Court : फेसबुक किंवा ट्विटरसारख्या सोशल मीडियावरील अश्लील पोस्ट लाईक करणं हा गुन्हा नाही, असा निर्वाळा अलाहाबाद उच्च न्यायालयाने दिला आहे.

Allahabad High Court said Liking Obscene Post Not Offence : फेसबुक (Facebook) किंवा ट्विटर एक्स (Twitter X) वर यासारख्या सोशल मीडिया (Social Media) प्लॅटफॉर्मवर अश्लील पोस्ट (Obscene Post) शेअर करणं गुन्हा आहे, पोस्ट लाईक (Post Like) करणे हा गुन्हा नाही, असं अलाहाबाद उच्च न्यायालय (Allahabad High Court) ने म्हटलं आहे. पोस्ट लाईक करणं हे पोस्ट प्रकाशित किंवा प्रसारित करण्यासारखे नाही, त्यामुळे आयटी कायद्याअंतर्गत हे कृत्य दंडनीय नाही, असं अलाहाबाद हायकोर्टाने म्हटलं आहे. 

पोस्ट करणं गुन्हा, लाईक करणं नाही

एका प्रकरणाची सुनावणी करताना अलाहाबाद उच्च न्यायालयाने म्हटलं आहे की, फेसबुक किंवा एक्सवर अश्लील पोस्ट शेअर करणं गुन्हा आहे. न्यायमूर्ती अरुण कुमार सिंह देशवाल यांच्या एकल  खंडपीठाने एका प्रकरणाच्या सुनावणी दरम्यान हा निर्वाळा दिला आहे. माहिती तंत्रज्ञान कायद्याच्या कलम 67 अंतर्गत शिक्षा फक्त पोस्ट लाइक करणे हा पोस्ट प्रकाशित करणे किंवा प्रसारित करणे, यासारखा गुन्हा नाही, त्यामुळे या प्रकरणी शिक्षा होऊ शकत नाही.

नेमकं प्रकरण काय?

या प्रकरणात याचिकाकर्त्याच्या विरोधात आरोप होता की, त्याने सोशल मीडियावर काही आक्षेपार्ह आणि उत्तेजक संदेश पोस्ट केले होते. ज्यामुळे  मुस्लिम समाजातील सुमारे 600-700 लोकांनी परवानगीशिवाय मिरवणुकीची व्यवस्था केली, ज्यामुळे शांतता आणि सुरक्षेचा गंभीर धोका निर्माण झाला. सुनावणीदरम्यान, या प्रकरणाच्या तपास अधिकाऱ्यांनी काझमीने जमाव जमवण्याचे आवाहन करणाऱ्या सोशल मीडियावरील पोस्ट लाइक केल्याच्या वस्तुस्थितीवर विश्वास ठेवला. पण काझमीने स्वत: पोस्ट केल्याचा किंवा पोस्ट शेअर केल्याचा पुरावा पोलिसांना सादर करता आला नाही.

अश्लील पोस्ट लाइक करणं गुन्हा नाही

या प्रकरणी सुनावणी करताना अलाहाबाद उच्च न्यायालय (Allahabad High Court) ने म्हटलं की, अश्लील साहित्य प्रकाशित करणे किंवा प्रसारित करणे हा गुन्हा आहे. एखादी पोस्ट किंवा संदेश जेव्हा पोस्ट केला जातो, तेव्हा प्रकाशित केला जातो असे म्हटले जाऊ शकते आणि पोस्ट किंवा संदेश शेअर किंवा रीट्विट केल्यावर प्रसारित केला जाऊ शकतो. खंडपीठाने पुढे सांगितले की, याचिकाकर्ता फरहान उस्मानची पोस्ट लाईक केली आहे, पण पोस्ट लाइक करणे हे पोस्ट प्रकाशित किंवा प्रसारित करण्यासारखा गुन्हा नाही, म्हणून आयटी कलम 67 लागू होणार नाही. कोणत्याही पोस्टला फक्त लाईक करणं अपराध नाही.

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Nitish kumar : मोठी बातमी! बिहारमध्ये उलथापालथ, नितीश कुमारांचा राजीनामा; भाजपकडून मुख्यमंत्रीपदासाठी नव्या नावाची घोषणा
मोठी बातमी! बिहारमध्ये उलथापालथ, नितीश कुमारांचा राजीनामा; भाजपकडून मुख्यमंत्रीपदासाठी नव्या नावाची घोषणा
Bihar Politics 2026: नितीश कुमारला हटवण्यासाठी पगडी घालणारे भाजपचे सम्राट होणार मुख्यमंत्री? बिहारची सूत्रे कोणाकडे?
नितीश कुमारला हटवण्यासाठी पगडी घालणारे भाजपचे सम्राट होणार मुख्यमंत्री? बिहारची सूत्रे कोणाकडे?
ED arrests IPAC Vinesh Chandel: ईडीने पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जींचा प्रचार करणाऱ्या 'आयपॅक'च्या प्रमुखालाच उचललं, निवडणुकीच्या तोंडावर झटका
ईडीने पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जींचा प्रचार करणाऱ्या 'आयपॅक'च्या प्रमुखालाच उचललं, निवडणुकीच्या तोंडावर झटका
Bihar : बिहारमध्ये पहिल्यांदा भाजपचा मुख्यमंत्री होणार, नितीश कुमार राजीनामा देणार, नवी दिल्ली ते पाटणा राजकीय घडामोडी वाढल्या
बिहारमध्ये पहिल्यांदा भाजपचा मुख्यमंत्री होणार, नितीश कुमार राजीनामा देणार, राजकीय घडामोडी वाढल्या

व्हिडीओ

Praniti Shinde : भोंदू अशोक खरातचा एन्काऊंटर करतील,प्रणिती शिंदेंचा मोठा दावा
Asha Bhosle Funeral : सूरसम्राज्ञी आशा भोसलेंना अखेरचा निरोप
Donald Trump Post Ai Image Himself Jesus Christ : आता डोनाल्ड ट्रम्प यांच्या निशाण्यावर पोप लिओ.. Special Report
Iran Us And China : इराण-अमेरिका युद्धामुळे बेहाल पण चीन मालामाल Special Report
Palghar Crime : लव्ह, सेक्स आणि धोका... पालघरमधील धक्कादायक प्रकार

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
धक्कादायक! डेटिंग ॲपवरुन मैत्री, हॉटेलचं बिल पाहून तरुणी पळाली; तरुणाची पोलिसात धाव, मॅनेजरविरुद्ध तक्रार
धक्कादायक! डेटिंग ॲपवरुन मैत्री, हॉटेलचं बिल पाहून तरुणी पळाली; तरुणाची पोलिसात धाव, मॅनेजरविरुद्ध तक्रार
मोठी बातमी! बिहारमध्ये उलथापालथ, नितीश कुमारांचा राजीनामा; भाजपकडून मुख्यमंत्रीपदासाठी नव्या नावाची घोषणा
मोठी बातमी! बिहारमध्ये उलथापालथ, नितीश कुमारांचा राजीनामा; भाजपकडून मुख्यमंत्रीपदासाठी नव्या नावाची घोषणा
Mhada Mumbai Lottery :  म्हाडाच्या मुंबईतील 2640 घरांसाठी दोन आठवड्यात किती अर्ज आले?  अनामत रक्कम किती अर्जदारांनी भरली, आकडेवारी समोर
म्हाडाच्या मुंबईतील 2640 घरांसाठी दोन आठवड्यात किती अर्ज आले?  अनामत रक्कम किती अर्जदारांनी भरली, आकडेवारी समोर
कल्याणमध्ये 11 प्रवाशांनी जीव गमावला तरीही अवैध वाहतूक सुरूच; टॅक्सीत 5 ऐवजी खचाखच 10 जण भरुन गाडी सुसाट
कल्याणमध्ये 11 प्रवाशांनी जीव गमावला तरीही अवैध वाहतूक सुरूच; टॅक्सीत 5 ऐवजी खचाखच 10 जण भरुन गाडी सुसाट
Nashik Crime News: पोलीस होण्याचं स्वप्न अधुरं राहिलं, अवघ्या दोन गुणांनी आलेल्या अपयशामुळे तरुणीनं आयुष्य संपवलं; नाशिकमधील दुर्दैवी घटना
पोलीस होण्याचं स्वप्न अधुरं राहिलं, अवघ्या दोन गुणांनी आलेल्या अपयशामुळे तरुणीनं आयुष्य संपवलं; नाशिकमधील दुर्दैवी घटना
Ashok Kharat Case Nashik Crime News: आता कोण सोडणार...अशोक खरातचे कारनामे ऐकून सासू पार्वती काय काय म्हणाली?
आता कोण सोडणार...अशोक खरातचे कारनामे ऐकून सासू पार्वती काय काय म्हणाली?
उन्हाळ्यात जपून, कुल्फीमध्ये चक्क वनस्पती तेल अन् भेसळ; अन्न व औषध विभागाची धाड, 1856 पॅकेट्स जप्त
उन्हाळ्यात जपून, कुल्फीमध्ये चक्क वनस्पती तेल अन् भेसळ; अन्न व औषध विभागाची धाड, 1856 पॅकेट्स जप्त
Kalyan Crime news: कल्याणमध्ये सासरच्या मंडळींकडून सून-मेहुण्यावर चाकू-दगडाने हल्ला, पोलीस ठाण्याबाहेरच राडा, कारण काय?
कल्याणमध्ये सासरच्या मंडळींकडून सून-मेहुण्यावर चाकू-दगडाने हल्ला, पोलीस ठाण्याबाहेरच राडा, कारण काय?
Embed widget