एक्स्प्लोर

आखाडा परिषदेकडून भोंदू बाबांची दुसरी यादी जाहीर

दिल्लीच्या बाबा वीरेंद्र देव दीक्षितच्या कारनाम्यानंतर, साधू-संतांची प्रतिमा मलिन होत आहे. त्या पार्श्वभूमीवर आखाडा परिषदेने भोंदू बाबांची दुसरी यादी जाहीर केली

अलाहाबाद : दिल्लीच्या बाबा वीरेंद्र देव दीक्षितच्या कारनाम्यानंतर, साधू-संतांची प्रतिमा मलिन होत आहे. त्या पार्श्वभूमीवर आखाडा परिषदेने भोंदू बाबांची दुसरी यादी जाहीर केली आहे. या यादीत दिल्लीच्या बाबा वीरेंद्र देव दीक्षितसह, उत्तर प्रदेशमधील बस्तीच्या सचिदानंद सरस्वती आणि अलाबादच्या त्रिकाल भवंता यांच्या नावाचा समावेश आहे. आखाडा परिषदेचे अध्यक्ष महंत नरेंद्र गिरी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत 13 आखाड्याचे प्रमुख सहभागी होते. या बैठकीनंतर महंत नरेंद्र गिरी यांनी भोंदू बाबांपासून सावध राहण्याचं आवाहन करताना सांगितलं. विशेष म्हणजे, राजस्थानच्या अलवरचे फलाहारी बाबांनाही आखाडा परिषदेतून निलंबित केल्याची घोषणा गिरी यांनी यावेळी केली. शिवाय, आखाडा परिषदेच्या या बैठकीत 2019 मध्ये प्रयागमध्ये होणाऱ्या कुंभ मेळ्याच्या तयारीसंदर्भात आढावा घेण्यात आल्याची माहितीही त्यांनी यावेळी दिली. नव्या यादीतील भोंदू बाबांचा परिचय बाबा वीरेंद्र दीक्षित बाबा वीरेंद्र दीक्षित राजधानी दिल्लीत 'आध्यात्मिक यूनिव्हर्सिटी' नावाने एक आश्रम चालवत होता. या आश्रमातून तरुण मुली आणि महिलांचं लैंगिक शोषण होत असल्याचा आरोप आहे. यात पोलिसांनी बाबाच्या एकूण पाच आश्रमतून 150 तरुणी आणि महिलांची सुटका केली आहे. सध्या बाब वीरेंद्र दीक्षित फरार असून, दिल्ली हायकोर्टाने त्याला 4 जानेवारीपर्यंत हजर करण्याचे आदेश दिले आहेत. सचिदानंद सरस्वती बाबा सचिदानंद सरस्वती आपल्या संत कुटिल आश्रमात धर्म प्रसाराच्या नावावर 20 वर्षांपासून तरुणींना शिष्य बनवत होता. त्यानंतर, त्यांचे लैंगिक शोषण करत असल्याचा आरोप आहे. या प्रकरणी त्यांच्याविरोधात कोर्टात याचिका दाखल आहे. त्रिकाल भवंता उत्तर प्रदेशच्या मिर्झापूर जिल्ह्याची मूळ रहिवासी असलेली त्रिकाल भवंता ऊर्फ अनीता शर्माने पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण केलं. त्यानंतर काहीकाळ अलाहबादमधील एका खासगी रुग्णालयात नर्स म्हणून काम केलं. यानंतर अलाबादमधील दारागंजमध्ये स्वत: चं क्लीनिक सुरु केलं. जवळपास 20 वर्षांपूर्वी तिचं लग्न अलाहबादमधील राम शर्मा नावाच्या एका शिक्षकासोबत लग्न झालं. तिला एक मुलगा रवी शर्मा आणि एम मुलगी अपराजिता शर्मा अशी दोन मुलं आहेत. हे दोघेही अलाहबाद जळच्या शहरात शिक्षण घेत आहेत. नाशिकमधील कुंभ मेळ्यात तिने महिलांचा स्वतंत्र आखाडा बनवून धर्माचार्यांनाच आव्हान दिलं होतं. यानंतर ती सर्वाधिक चर्चेत राहिली होती. दरम्यान, यापूर्वी आखाडा परिषदेने 10 सप्टेंबर रोजी 14 भोंदू बाबांची यादी जाहीर केली होती. या यादीत आसाराम बापू, गुरमीत राम रहीम, सुखविंदर कौर ऊर्फ राधे माँ, सच्चिदानंद गिरी, ओमबाब ऊर्फ विवेकानंद झा, नर्मल बाबा, स्वामी असीमानंद, इच्छाधारी भीमानंद ऊर्फ शिवमूर्ती द्विवेदी, ओम नम: शिवाय बाबा, नारायण साई, रामपाल, कुश मुनी, मलखान गिरी, आणि बृहस्पती गिरी आदींचा समावेश होता. त्यातच आता नवी यादी जाहीर केली असून, यात दिल्लीच्या बाबा वीरेंद्र देव दीक्षितसह, उत्तर प्रदेशमधील बस्तीच्या सचिदानंद सरस्वती आणि अलाबादच्या त्रिकाल भवंता यांच्या नावाचा समावेश आहे. संबंधित बातम्या भोंदू बाबांची दुसरी यादी लवकरच, नव्या यादीत कोण कोण? भोंदू बाबांची यादी जारी करणाऱ्या आखाडा परिषदेचे महंत मोहनदास बेपत्ता!  आखाडा परिषदेकडून देशभरातील 14 भोंदू बाबांची यादी जाहीर भोंदू बाबांची यादी जारी करणाऱ्या आखाडा परिषदेचे महंत मोहनदास बेपत्ता!  माझा विशेष : भोंदू बाबांची पैदास रोखण्यासाठी धर्मसंस्था अपयशी आहे?

महत्त्वाच्या बातम्या

FSSAI Action : Old Monk सह इतर दारू आणि खाद्यपेये FSSAIच्या निशाण्यावर का आहेत? देशभर धडक कारवाई
Old Monk सह इतर दारू आणि खाद्यपेये FSSAIच्या निशाण्यावर का आहेत? देशभर धडक कारवाई
Video: 'ज्यांनी आमचं संरक्षण केलं पाहिजे तेच आम्हाला चोपून काढत आहेत' मुंबई पोलिसांची गाडी भर रस्त्यात अडवणाऱ्या रियासह देशातील तरुणी राहुल गांधींच्या भेटीला
Video: 'ज्यांनी आमचं संरक्षण केलं पाहिजे तेच आम्हाला चोपून काढत आहेत' मुंबई पोलिसांची गाडी भर रस्त्यात अडवणाऱ्या रियासह देशातील तरुणी राहुल गांधींच्या भेटीला
आता तर विधिमंडळ पक्ष दुसऱ्याच राजकीय पक्षात विलीन होत आहेत, लोकशाही मूल्यांचे रक्षण कसे करायचे, याचा निर्णय तुम्हालाच घ्यावा लागेल; कपिल सिब्बलांची 'सर्वोच्च' साद
आता तर विधिमंडळ पक्ष दुसऱ्याच राजकीय पक्षात विलीन होत आहेत, लोकशाही मूल्यांचे रक्षण कसे करायचे, याचा निर्णय तुम्हालाच घ्यावा लागेल; कपिल सिब्बलांची 'सर्वोच्च' साद
इकडं जंतर मंतरवर विद्यार्थ्यांना अमानुष मारहाण, राम मंदिर लुटीवर चर्चेसाठी विरोधक एकवटले अन् तिकडं संसदेत पराभव होऊन सुद्धा केंद्र सरकार मतदारसंघ पुनर्रचना विधेयक पुन्हा आणण्याच्या तयारीत
इकडं जंतर मंतरवर विद्यार्थ्यांना अमानुष मारहाण, राम मंदिर लुटीवर चर्चेसाठी विरोधक एकवटले अन् तिकडं संसदेत पराभव होऊन सुद्धा केंद्र सरकार मतदारसंघ पुनर्रचना विधेयक पुन्हा आणण्याच्या तयारीत

व्हिडीओ

Kunbi Certificate Issues Special Report : मराठा आरक्षणाचा पेच वाढला? कुणबी दाखलेच अवैध? | Special Report
Dharashiv News Special Report : धाराशिव जिल्हा परिषदेच्या दोन तास टीव्ही, मोबाईल बंद उपक्रमाला सुरुवात | Special Report
Analogue paneer Special Report : महाराष्ट्रात ॲनालॉग पनीरवर वर्षभराची बंदी, तुकाराम मुंढेंचा तडाखा
Mumbai Mayor Bungalow Special Report : मुंबई महापालिकेचा नव्या टेंडरमुळे वादंग : Ritu Tawade
Gungi Gudiya Special Report : गूंगी गुडिया ते गूंगा गुड्डा, मौनावरून राजकारण की राजकारणासाठी मौन?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
FSSAI Action : Old Monk सह इतर दारू आणि खाद्यपेये FSSAIच्या निशाण्यावर का आहेत? देशभर धडक कारवाई
Old Monk सह इतर दारू आणि खाद्यपेये FSSAIच्या निशाण्यावर का आहेत? देशभर धडक कारवाई
Sunetra Pawar : म्हाडाच्या प्रलंबित गृहनिर्माण प्रकल्पांना तातडीने गती द्या; उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे निर्देश
म्हाडाच्या प्रलंबित गृहनिर्माण प्रकल्पांना तातडीने गती द्या; उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे निर्देश
'एबीपी माझा' इम्पॅक्ट; बिबट्यासह पिल्लांचा वावर, वन अधिकारी थेट वावरात; बिबटे जेरबंद करण्यासाठी पिंजरे तैनात
'एबीपी माझा' इम्पॅक्ट; बिबट्यासह पिल्लांचा वावर, वन अधिकारी थेट वावरात; बिबटे जेरबंद करण्यासाठी पिंजरे तैनात
कोर्टाच्या तारखेला वेळेवर हजर न राहणे भोवले, 2020 चं प्रकरण; मुंबईतील भाजप नगरसेवकास अटक
कोर्टाच्या तारखेला वेळेवर हजर न राहणे भोवले, 2020 चं प्रकरण; मुंबईतील भाजप नगरसेवकास अटक
Congress News : काँग्रेसचे नेतृत्व तळागाळापासून तुटलं, निष्ठावानांना डावललं जातंय, महिला नेत्याचा गंभीर आरोप
काँग्रेसचे नेतृत्व तळागाळापासून तुटलं, निष्ठावानांना डावललं जातंय, महिला नेत्याचा गंभीर आरोप
BMM 2026 : सिअॅटलमध्ये रंगणार जागतिक मराठी मेळावा; संस्कृती, ज्ञान, उद्योजकता आणि मनोरंजनाचा चौफेर संगम
सिअॅटलमध्ये रंगणार जागतिक मराठी मेळावा; संस्कृती, ज्ञान, उद्योजकता आणि मनोरंजनाचा चौफेर संगम
रस्ता आहे की, चिखलमार्ग; गोवा मार्गावर बससह वाहने फसली, विद्यार्थ्यांसह नागरिकांना मोठा त्रास
रस्ता आहे की, चिखलमार्ग; गोवा मार्गावर बससह वाहने फसली, विद्यार्थ्यांसह नागरिकांना मोठा त्रास
विलास घुले मृत्यू प्रकरण! खासदार बजरंग सोनवणेंच्या मुलाला अटक करा नाहीतर आम्ही… बीड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर घुले कुटुंबीयांचे आमरण उपोषण 
विलास घुले मृत्यू प्रकरण! खासदार बजरंग सोनवणेंच्या मुलाला अटक करा नाहीतर आम्ही… बीड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर घुले कुटुंबीयांचे आमरण उपोषण 
Embed widget