एक्स्प्लोर
टॅक्सीच्या भाड्यात विमान प्रवास, एअर एशियाची बंपर ऑफर
मलेशियाची एअरलाईन्स एअर एशियानं आज या बंपर डिस्काऊंटची घोषणा केली आहे. मे 2018 ते जानेवारी 2019 पर्यंतच्या प्रवासासाठी ही योजना लागू असेल. मात्र या ऑफरसाठी ठरावीक कालावधीतच बुकिंग करावी लागणार आहे.

नवी दिल्ली : देशांतर्गत विमान प्रवासासाठी 99 रुपयांचं बेस फेअर, तर आंतरराष्ट्रीय विमान प्रवासासाठी फक्त 444 रुपयांचं बेस फेअर. ऐकून तुम्हालाही धक्का बसेल, मात्र हे खरं आहे. मलेशियाची एअरलाईन्स एअर एशियानं आज या बंपर डिस्काऊंटची घोषणा केली आहे. मे 2018 ते जानेवारी 2019 पर्यंतच्या प्रवासासाठी ही योजना लागू असेल. मात्र या ऑफरसाठी ठरावीक कालावधीतच बुकिंग करावी लागणार आहे. दरम्यान बेस फेअर व्यतिरिक्त टॅक्स आणि इतर सर्व्हिसेससाठी कंपनी किती पैसे आकारणार आहे हे कळू शकलेलं नाही. भारतात एअर एशिया आणि टाटा सन्सची 51 टक्के आणि 49 टक्के अशी भागीदारी आहे. कंपनीनं दिलेल्या जाहीरातीनुसार या विशेष ऑफरसाठी 19 नोव्हेंबरपर्यंत बुकिंग करता येणार आहे.
आणखी वाचा























