Air India Plane Crash: एअर इंडिया विमान अपघाताची संभाव्य 3 कारणं समोर, माजी अमेरिकन नौदल पायलटचा दावा
Air India Plane Crash: या अपघातात मृतांची संख्या आतापर्यंत 270 पर्यंत पोहोचली आहे . केंद्र सरकारने या अपघाताची चौकशी करण्यासाठी एका पॅनल ची स्थापना केली आहे .

Air India plane crash: गुजरातच्या अहमदाबादमध्ये गुरुवारी (12 जून) एअर इंडियाचं 'बोईंग 787 ' विमान उड्डाणानंतर काही मिनिटातच कोसळले .या भीषण अपघातात विमानातील 242 प्रवाशांचा जागीच जीव गेला .या अपघातात मृतांची संख्या आतापर्यंत 270 पर्यंत पोहोचली आहे . केंद्र सरकारने या अपघाताची चौकशी करण्यासाठी एका पॅनल ची स्थापना केली आहे .जे तीन महिन्यात आपला अहवाल सादर करेल .दरम्यान माझी अमेरिकन नौदल पायलट आणि सुप्रसिद्ध नेवीगेशन तज्ञ कॅप्टन स्टीव्ह शेबनर यांनी या विमान अपघाताच्या व्हिडिओचे विश्लेषण करताना या अपघाताची तीन संभाव्य कारणे सांगितले आहेत .यात प्रामुख्याने RAT (रॅम एअर टर्बाइन) सक्रिय असल्याचं त्यांनी म्हटलंय . या अपघाताच्या तीन संभाव्य कारणांमध्ये पहिले विद्युत बिघाड झाल्याने दोन्ही इंजिनमध्ये बिघाड किंवा तिसरे हायड्रोलिक बिघाड अशी तीन संभाव्य करणे समोर येत आहेत .
पहिली शक्यता : दोन्ही इंजिन एकाच वेळी निकामी झाले
दोन्ही इंजिन एकाच वेळी निकामी झाले असावेत अशी पहिली शक्यता कॅप्टन स्टीव्ह यांनी व्यक्त केली आहे .कॅप्टन स्टीव्ह यांनी म्हटले आहे की, हा अपघात लिफ्ट लॉस मुळे म्हणजेच विमानाच्या पंखांमधून पुरेशी हवा न मिळाल्याने झाला असावा . स्टीव्ह यांच्या मते, विमान वर उचलण्यासाठी पुरेशी ताकद नव्हती .जर असे घडले असेल तर विमान मोठ्या पक्षांच्या कळपाला आदळले असावे, ज्यामुळे दोन्ही इंजिन निकामी झाले असतील .
दुसरी शक्यता- वैमानिक फ्लॅप्स लावायला विसरले असतील !
या विमाना अपघाताचे दुसरे कारण असे असू शकते की विमान उड्डाण करण्यापूर्वी काही विशिष्ट तांत्रिक सेटिंग्स आवश्यक असतात . त्यातील मुख्य म्हणजे फ्लॅप्स कमी करणे . फ्लॅप्स म्हणजे विमानांच्या पंखांचे असे भाग जे उड्डाणादरम्यान लिफ्ट वाढवतात . कॅप्टन स्टीव्ह यांच्या मते, जर वैमानिक फ्लॅप्स लावायला विसरले असतील तर विमान हवेत राहू शकणार नाही .मात्र असे होण्याची शक्यता कमी आहे कारण सेव्हन एटी सेवन सारख्या आधुनिक विमानांमध्ये फ्लॅट सेट केलं नाही तर कॉकपिटमध्ये मोठ्याने अलार्म वाजू लागतात .स्क्रीनवरही तसा इशारा दिसतो . असे कॅप्टन स्टीव्ह यांनी सांगितले .
तिसरी शक्यता- वैमानिकाने चुकीचा लिव्हर ओढला असेल
या विमान अपघाताची तिसरी शक्यता अशी असू शकते की पायलटने चुकीचा लिव्हर ओढला असेल . स्टीव्ह यांच्या मते विमान उड्डाण करताच, सहवैमानिक सांगतो की 'विमान हवेत आहे . ' त्यानंतर पायलट गिअर अप करतो .सहवैमानीकाने चुकून गिअर ऐवजी फ्लॅटसह हँडल ओढले असण्याची शक्यता आहे .याचा अर्थ असा की विमान हवेत ठेवण्यास मदत करणारे भाग काढून टाकले गेले .शेवटी तज्ञ असा निष्कर्षही काढतात की हा अपघात दोन्ही इंजिनांच्या बिघाडामुळे झाला असावा .मात्र या प्रकरणाची चौकशी सध्या भारतात अजूनही सुरू आहे .केंद्र सरकारने नियुक्त केलेल्या पॅनलचा अहवाल आल्यानंतरच याबाबत अधिकृत माहिती उपलब्ध होईल .
हेही वाचा:























