एक्स्प्लोर

Air India: एअर इंडियाचा मोठा निर्णय; 'या' दोन विमान कंपन्यांचे होणार विलिनीकरण

Air India : टाटा समूहाकडे मालकी असलेल्या एअर इंडिया आणि एअर एशिया इंडिया कंपनीचे विलिनीकरण होणार आहे. पुढील वर्षाच्या अखेरीस ही प्रक्रिया पूर्ण होण्याची शक्यता आहे.

Air India : टाटा (Tata) समूहाकडे मालकी आल्यानंतर एअर इंडियाकडून (Air India) मोठे निर्णय घेतले जात आहेत. Air India Express आणि AirAsia India च्या विलिनीकरणाची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. पुढील वर्षी, 2023 च्या अखेरीस याचे विलिनीकरण होण्याची शक्यता असल्याचे वर्तवण्यात आले आहे. टाटा समूहाच्या एअर इंडियाने AirAsia India मध्ये 100 टक्के भागीदारीसाठी करार केला आहे. AirAsia India हा Tata Sons आणि Air Asia Investment Limited यांचा संयुक्त उपक्रम आहे. यामध्ये टाटा सन्सचा वाटा 83.67 टक्के आणि एअर एशिया इन्व्हेस्टमेंटचा 16.33 टक्के वाटा आहे.

वर्षभरात विलिनीकरणाची प्रक्रिया पूर्ण होणार

एअर इंडियाने दिलेल्या माहितीनुसार, विलिनीकरण 2023 च्या अखेरीस होऊ शकते. या माध्यमातून परवडणाऱ्या दरात विमान सेवा पुरवणारी एअरलाइन कंपनी तयार करण्याचे उद्दिष्ट आहे. विलिनीकरणानंतर निर्माण होणार्‍या नव्या कंपनीचे नाव 'एअर इंडिया एक्सप्रेस' असे असणार आहे. दरम्यान, एअरएशिया कंपनी 2014 मध्ये सुरू झाली होती. तर, एअर इंडिया एक्सप्रेसची 2005 मध्ये विमान सेवा सुरू झाली होती. एअरएशिया इंडिया आणि एअर इंडिया एक्सप्रेस या दोन एअरलाइन्सच्या विलिनीकरणाची प्रक्रिया पुनर्रचना योजनेचा भाग म्हणून केली जात आहे. या प्रक्रियेला सुमारे 12 महिन्याचा कालावधी लागणार असल्याचे म्हटले जात आहे.

'या' कंपनीतील उर्वरित हिस्सा एअर इंडियाला विकण्याचा करार 

तत्पूर्वी, मलेशियन एअरलाइन एअरएशिया कंपनीने एका निवेदनात म्हटले आहे की, एअरएशिया इंडिया विमान कंपनीत असणारा आपला उर्वरीत हिस्सा एअर इंडियाला विकण्यासाठी करार केला आहे. 

एअरएशिया एव्हिएशन ग्रुप लिमिटेडने सांगितले की, एअरएशिया इंडियामध्ये असणारा उर्वरीत हिस्सा एअर इंडियाला विकण्यासाठी एक शेअर करार केला आहे. भारतीय स्पर्धा आयोगाने या वर्षी जून महिन्यात एअर इंडियाद्वारे एअरएशिया इंडिया कंपनी खरेदी करण्याच्या प्रस्तावाला मंजुरी दिली. 

जगातील सर्वात मोठ्या नागरी उड्डाण बाजारांपैकी एक

एअर इंडियाचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी कॅम्पबेल विल्सन यांच्या अध्यक्षतेखालील समितीला अहवाल दिला जाईल. विल्सन म्हणाले, "एअर इंडियाच्या अखत्यारीत असणाऱ्या आणि परवडणाऱ्या दरात विमान प्रवासाची संधी देणाऱ्या विमान कंपनीची निर्मिती सुरू करण्यासाठी आम्ही उत्साहित आहोत. भारतीय स्पर्धा आयोगाने (CCI) या वर्षी जूनमध्ये AirAsia इंडियाच्या संपूर्ण भागीदारीच्या प्रस्तावित अधिग्रहणास मान्यता दिली आहे. एअरएशिया एव्हिएशन ग्रुपचे (समूह) मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) बो लिंघम म्हणाले, "जेव्हा आम्ही 2014 पासून भारतात प्रथमच सेवा सुरू केली तेव्हा AirAsia ने चांगला व्यवसाय केला. जगातील सर्वात मोठ्या हवाई वाहतुकीची बाजारपेठेत आम्ही स्थान मिळवले.'

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

CM Eknath Shinde : संतोष कटकेने अपशब्द वापरले, मुख्यमंत्र्‍यांनी गाडीतून उतरुन जाब विचारला
CM Eknath Shinde : संतोष कटकेने अपशब्द वापरले, मुख्यमंत्र्‍यांनी गाडीतून उतरुन जाब विचारला
Crime News: रस्त्यात अडवून मारहाण, मैत्रिणीचा जबडा केला फ्रॅक्चर, पुण्यातील धक्कादायक प्रकार, नेमकं काय घडलं?
रस्त्यात अडवून मारहाण, मैत्रिणीचा जबडा केला फ्रॅक्चर, पुण्यातील धक्कादायक प्रकार, नेमकं काय घडलं?
Eknath Shinde: गद्दार म्हणताच एकनाथ शिंदेंच्या डोक्यात तिडीक गेली, गाडीतून उतरुन रागात नसीम खान यांच्या कार्यालयात शिरले अन्...
गद्दार म्हणताच एकनाथ शिंदेंच्या डोक्यात तिडीक गेली, गाडीतून उतरुन रागात नसीम खान यांच्या कार्यालयात शिरले अन्...
शिंदेंकडील 8 आमदार 1 मंत्री परत येणार, आदित्य ठाकरेंच्या दाव्यावर श्रीकांत शिंदेंचा पलटवार; दिलं चॅलेंज
शिंदेंकडील 8 आमदार 1 मंत्री परत येणार, आदित्य ठाकरेंच्या दाव्यावर श्रीकांत शिंदेंचा पलटवार; दिलं चॅलेंज
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

CM Eknath Shinde : संतोष कटकेने अपशब्द वापरले, मुख्यमंत्र्‍यांनी गाडीतून उतरुन जाब विचारलाUddhav Thackeray Ausa Bag Checking : औसा येथे पुन्हा एकदा बॅगची तपासणी; सलग दुसऱ्यांदा तपासणीCM Eknath Shinde Angry : 'गद्दार'घोषणा शिंदे संतापले; काँग्रेस कार्यालयात घुसन विचारला जाबDevendra Fadnavis Speech Dahanu : शेतकऱ्यांच्या खात्यात 15 हजार जमा करणार ,देवेंद्र फडणवीसांची घोषणा

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
CM Eknath Shinde : संतोष कटकेने अपशब्द वापरले, मुख्यमंत्र्‍यांनी गाडीतून उतरुन जाब विचारला
CM Eknath Shinde : संतोष कटकेने अपशब्द वापरले, मुख्यमंत्र्‍यांनी गाडीतून उतरुन जाब विचारला
Crime News: रस्त्यात अडवून मारहाण, मैत्रिणीचा जबडा केला फ्रॅक्चर, पुण्यातील धक्कादायक प्रकार, नेमकं काय घडलं?
रस्त्यात अडवून मारहाण, मैत्रिणीचा जबडा केला फ्रॅक्चर, पुण्यातील धक्कादायक प्रकार, नेमकं काय घडलं?
Eknath Shinde: गद्दार म्हणताच एकनाथ शिंदेंच्या डोक्यात तिडीक गेली, गाडीतून उतरुन रागात नसीम खान यांच्या कार्यालयात शिरले अन्...
गद्दार म्हणताच एकनाथ शिंदेंच्या डोक्यात तिडीक गेली, गाडीतून उतरुन रागात नसीम खान यांच्या कार्यालयात शिरले अन्...
शिंदेंकडील 8 आमदार 1 मंत्री परत येणार, आदित्य ठाकरेंच्या दाव्यावर श्रीकांत शिंदेंचा पलटवार; दिलं चॅलेंज
शिंदेंकडील 8 आमदार 1 मंत्री परत येणार, आदित्य ठाकरेंच्या दाव्यावर श्रीकांत शिंदेंचा पलटवार; दिलं चॅलेंज
Video: मोठी बातमी : उद्धव ठाकरेंची दुसऱ्यांदा बॅग तपासली; दरवेळेला मीच पहिला गिऱ्हाईक म्हणत ठाकरेंकडून पुन्हा व्हिडीओ शूट
Video: मोठी बातमी : उद्धव ठाकरेंची दुसऱ्यांदा बॅग तपासली; दरवेळेला मीच पहिला गिऱ्हाईक म्हणत ठाकरेंकडून पुन्हा व्हिडीओ शूट
Ajit Pawar : अजितदादांची श्रीरामपूरमध्ये मोठी खेळी! जेलमध्ये असणाऱ्या माजी आमदाराच्या कुटुंबियांची घेतली अचानक भेट, पक्षाची ताकद वाढणार?
अजितदादांची श्रीरामपूरमध्ये मोठी खेळी! जेलमध्ये असणाऱ्या माजी आमदाराच्या कुटुंबियांची घेतली अचानक भेट, पक्षाची ताकद वाढणार?
Maharashtra Assembly Elections 2024 : नाशिक पूर्वमध्ये राजकारण तापलं! 'माझ्याकडे निवडणुकीचा अजेंडा' राहुल ढिकलेंच्या वक्तव्यावर गणेश गीतेंचा हल्लाबोल, म्हणाले 'तुमचा अजेंडा...'
नाशिक पूर्वमध्ये राजकारण तापलं! 'माझ्याकडे निवडणुकीचा अजेंडा' राहुल ढिकलेंच्या वक्तव्यावर गणेश गीतेंचा हल्लाबोल, म्हणाले 'तुमचा अजेंडा...'
Maharashtra Election 2024: हरियाणात जे घडलं ते टाळायचं असेल तर उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्रीपदाचा चेहरा घोषित करा, केजरीवालांच्या 'आप'ची मोठी मागणी
उद्धव ठाकरेंना आत्ताच मुख्यमंत्रीपदाचा चेहरा जाहीर करा, अन्यथा... केजरीवालांच्या 'आप'ची मोठी मागणी
Embed widget