(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Owaisi on Inflation : वाढत्या महागाईला औरंगजेब जबाबदार; एआयएमआयएम प्रमुख असदुद्दीन ओवेसींचा केंद्र सरकारला टोला
Asaduddin Owaisi on Inflation : देशातील तरूणांजवळ रोजगार नाही. परंतु, यासाठी केंद्र सरकार जबाबदार नाही, तर अकबर जबाबदार आहे. पेट्रोल शंभरी पार गेले आहे तर त्याला जबाबदार ताजमलह आहे, असा टोला आयएमआयएम प्रमुख असदुद्दीन ओवेसी (Asaduddin Owaisi) यांनी केंद्र सरकारला लगावला आहे.
Asaduddin Owaisi on Inflation : भारतातील बेरोजगारी आणि वाढत्या महागाईला केंद्र सरकार जबाबदार नसून त्यासाठी औरंगजेब जबाबदार आहे. आज देशात पेट्रोल आणि डिझेलच्या दराने शंभरी पार केली आहे. परंतु, या महागाईला पंतप्रधान नरेंद्र मोदी जबाबदार नाहीत, तर या औरंगजेब जबाबदार आहे, असा टोला एआयएमआयएम प्रमुख असदुद्दीन ओवेसी (Asaduddin Owaisi) यांनी केंद्र सरकारला लगावला आहे.
असदुद्दीन ओवेसी यांनी त्यांच्या ट्विटरवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये ओवेसी एका सभेला संबोधित करत असल्याचे दिसत आहे. यावेळी त्यांनी वाढती महागाई आणि देशामधील बेरोजगारीवरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर जोरदार टीका केली. "भारतात सध्या महागाईचा भडका उडाला आहे. तरूणांच्या हाताला रोजगार नाही. पेट्रोल आणि डिझेलने शंभरी पार केली आहे. परंतु, देशातील या वाढत्या महागाईला केंद्र सरकार जबाबदार नाही, तर त्यासाठी मोघल आणि औरंगजेब जबाबदार आहेत, असा टोला ओवेसी यांनी केंद्र सरकारला लगावला आहे.
ओवेसी म्हणाले, देशातील तरूणांजवळ रोजगार नाही. परंतु, यासाठी केंद्र सरकार जबाबदार नाही, तर अकबर जबाबदार आहे. पेट्रोल शंभरी पार गेले आहे तर त्याला जबाबदार ताजमलह आहे. ताजमहल नसता तर आज देशात पेट्रोलची किंमत 40 रूपये असती. मोघलांनी ताजमल आणि लाल किल्ला बांधून मोठी चूक केली. त्यांनी हे पैसे बचत करून ठेवायला पाहिजे होते. त्यामुळे आज पेट्रोल स्वस्त झाले असते."
देश में महंगाई, बेरोज़गारी, और बढ़ती पेट्रोल-डीज़ल की कीमतों का ज़िम्मेदार @narendramodi नहीं, मुग़ल हैं😜 - Barrister @asadowaisi https://t.co/KLDrUaOwMz
— AIMIM (@aimim_national) July 4, 2022
भारतात या पूर्वी फक्त मोघलांनी राज्य केले नाही तर मोघलांच्या आधी सम्राट अशोक, चंद्रगुप्त यांचे राज्य होते. परंतु, देशातील प्रत्येक गोष्टीला भाजपकडून मोघलांना जबाबदार धरले जात आहे. भाजपला फक्त मोघलच दिसतात. भाजपला एका डोळ्याने मोघल दिसतात, तर एका डोळ्याने पाकिस्तान दिसते. परंतु, देशातील सामान्य नागरिकांना मोघल आणि पाकिस्तानचे काही देणे-घेणे नाही. तर वाढती महागाई कमी व्हावी ही सामान्य नागरिकांची इच्छा आहे, असे ओवेसी यांनी म्हटले.