एक्स्प्लोर
Advertisement
अरुण जेटली यांची प्रकृती स्थिर, एम्स रुग्णालयाची माहिती
श्वसनाचा त्रास होत असल्याने आणि हृदयाचे ठोके वाढल्यामुळे माजी अर्थमंत्री अरुण जेटली यांना दिल्लीतल्या एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
नवी दिल्ली : श्वसनाचा त्रास होत असल्याने आणि हृदयाचे ठोके वाढल्यामुळे माजी अर्थमंत्री अरुण जेटली यांना दिल्लीतल्या एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. संध्याकाळी त्यांची प्रकृती अधिक बिघडल्यामुळे त्यांना अतिदक्षता विभागात डॉक्टरांच्या निगराणीखाली ठेवण्यात आले आहे. एंडोक्रायनोलॉजिस्ट, हृदयरोग आणि मूत्रपिंड विसेषज्ञ डॉक्टर त्यांच्यावर उपचार करत आहेत.
रात्री 8 च्या सुमारास जेटली यांची प्रकृती बिघडल्याची बातमी कळताच पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह जेटली यांना भेटण्यासाठी रुग्णालयात दाखल झाले. ही बातमी कळताच अनेकांच्या चिंता वाढल्या होत्या. दरम्यान, काही वेळापूर्वी एम्स रुग्णालयाने प्रसिद्धीपत्रक काढून जेटली यांच्या प्रकृतीबाबतची माहिती दिली. त्यामध्ये जेटली यांची प्रकृती स्थिर असल्याचे सांगण्यात आले आहे.
गेल्या काही महिन्यांपासून अरुण जेटलींची तब्येत खराब असल्याने, त्यांनी मोदी सरकारच्या दुसऱ्या कार्यकाळातील कॅबिनेट मंत्रिमंडळात सहभागी होण्यास नकार दिला होता. जेटली यांनी ट्विटरद्वारे सांगितले होते की, गेल्या 18 महिन्यांपासून मी आजारी आहे. माझी प्रकृती खराब आहे. यामुळे माझा मंत्रीपदासाठी विचार केला जाऊ नये.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
Advertisement