एक्स्प्लोर

Ahmedabad Plane Crash: अहमदाबादमधील विमान दुर्घटनेत पायलट सभरवालांचा दुर्दैवी अंत; 90 वर्षांच्या वडिलांना दिलेले वचन राहिलं अपूर्ण

Ahmedabad Plane Crash: अहमदाबादमधील विमान अपघातात मृत्युमुखी पडलेल्या 265 जणांमध्ये पायलट सुमित सभरवाल यांचा समावेश होता. काही दिवसांपूर्वी सुमितने त्याच्या वृद्ध वडिलांना एक वचन दिले होते. सुमित यांनी मृत्यूनंतरही ते वचन अपूर्ण राहिले आहे.

Ahmedabad Plane Crash: अहमदाबादमध्ये काल (गुरुवारी,12) दुपारी अहमदाबाद विमानतळाजवळ विमान अपघात झाला. या अपघाताने केवळ 265 लोकांचा जीव घेतला नाही तर अनेक आई, वडील आणि भावंडांच्या आशा आणि स्वप्नेही हिरावून घेतली. या अपघातात जीव गमावलेल्या पायलट पायलट सुमित सभरवालांची कहाणीही अशीच आहे. गुरुवारी अहमदाबादहून लंडनला उड्डाण करणारे पायलट सुमित सभरवाल, ज्यांना 8300 तासांचा अनुभव घेतला होता, त्यांनी त्यांच्या 90 वर्षीय वडिलांना एक वचन दिले होते, जे आता त्यांच्या मृत्यूनंतर अपूर्ण राहिले आहे.

अपूर्ण राहिलेले वचन

सुमीत गेल्या अनेक वर्षांपासून पायलट म्हणून काम करत होते. या काळात ते अविवाहित राहिले. सुमीत त्यांच्या 90 वर्षांच्या वडिलांसोबत राहत होते. लंडनला जाण्याच्या शेवटच्या विमान प्रवासाच्या काही दिवस आधी, सुमीत यांनी त्याच्या वडिलांना वचन दिले होते की, ते लवकरच नोकरी सोडून देतील आणि पूर्ण वेळ त्याची काळजी घेतील. पण नियतीने काहीतरी वेगळेच ठरवले होते. सुमीत यांनी त्यांच्या वडिलांना दिलेले वचन त्यांच्यासोबत गेले. आता ना ते वचन उरले आहे ना ते पूर्ण करणारे सुमीत. आता फक्त उरले आहे ते म्हणजे 90 वर्षांच्या वडिलांच्या डोळ्यात अश्रू आणि खूप आठवणी. आता वृद्ध वडिलांचे उर्वरित आयुष्य या आठवणी आणि त्या अपूर्ण वचनासह घालवावे लागेल. आपल्या मुलाच्या मृत्यूवर वडिलांना शोक करताना पाहून सर्वजण भावनिक होत आहेत.

सुमित सबरवाल कोण होता

कॅप्टन सुमित सुमित सभरवाल हा पवईचे रहिवासी होता. त्याचे वृद्ध वडील नागरी विमान वाहतूक महासंचालनालयातून (DGCA) निवृत्त झाले आहेत. सुमित गेल्या अनेक वर्षांपासून पायलट म्हणून काम करत होते. सुमित एक अनुभवी पायलट होता. सुमित गेल्या अनेक वर्षांपासून पायलट म्हणून काम करत होता. त्याच्या अनुभवाचा अंदाज त्याच्या 8300 तासांच्या उड्डाणाच्या अनुभवावरून येतो. सुमित यांचे दोन्ही पुतणेही वैमानिक आहेत. सुमितच्या एका शेजाऱ्याने हिंदुस्तान टाईम्सशी बोलताना सांगितले की, उड्डाण करण्यापूर्वी सुमित आम्हाला त्याच्या वडिलांची काळजी घेण्यास सांगायचा. शेजाऱ्यांनी सांगितले की, वृद्ध वडील आता पूर्णपणे खचले आहेत.

विमानात एकूण 242 प्रवासी आणि 12 केबिन क्रू सदस्य 

गुजरातच्या राजधानी अहमदाबादमध्ये काल घडलेल्या भीषण विमान अपघाताने देशभरात शोककळा पसरली आहे. एअर इंडियाच्या अहमदाबादहून लंडनला जाणाऱ्या विमानात एकूण 242 प्रवासी आणि 12 केबिन क्रू सदस्य होते. या विमानाचे संचालन करत होते कॅप्टन सुमित सभरवाल, तर त्यांच्या सोबत फर्स्ट ऑफिसर क्लाइव्ह कुंदर हे होते. मिळालेल्या माहितीनुसार, कॅप्टन सुमित सभरवाल हे एलटीसी (Line Training Captain) होते आणि त्यांना तब्बल 8300 तासांचे उड्डाणाचे अनुभव होते. ते अत्यंत अनुभवी वैमानिक मानले जात होते. तर फर्स्ट ऑफिसर कुंदर यांना 1100 तासांचा अनुभव होता. दोघांचाही अनुभव असला तरी विमान उड्डाणानंतर काही मिनिटांतच दुर्घटनाग्रस्त झाले.

अपघात होण्याच्या क्षणी पायलटने 'मेडे कॉल' (आपत्कालीन संदेश) दिला होता. मात्र, त्यानंतर काही क्षणातच विमान जमिनीवर कोसळले. अपघातानंतर घटनास्थळी प्रचंड आग आणि धुराचे लोट दिसून आले. हे विमान अहमदाबादच्या मेघानीनगर आयजीपी परिसरात दुर्घटनाग्रस्त झालं. हा अपघात इतका भीषण होता की अनेक मृतदेह ओळखता येण्याच्या स्थितीत नव्हते. अद्याप अपघाताचं नेमकं कारण स्पष्ट झालेलं नाही, मात्र प्राथमिक अंदाजानुसार तांत्रिक बिघाड किंवा हवामानातील अचानक बदल हे कारण असू शकते. या घटनेने हवाई प्रवासाच्या सुरक्षिततेबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित झाले असून, कॅप्टन सुमितचा अनुभव असूनही अपघात टळू न शकणं अधिक धक्कादायक आहे. 

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Jalgaon : नऊ वर्षांची चिमुकली तीन दिवसांपासून रहस्यमयरित्या बेपत्ता, गावाबाहेर शाळेचे दप्तर आढळलं; चाळीसगावातील घटना
नऊ वर्षांची चिमुकली तीन दिवसांपासून रहस्यमयरित्या बेपत्ता, गावाबाहेर शाळेचे दप्तर आढळलं; चाळीसगावातील घटना
शॉकींग!एक कोटीच्या इन्शुरन्साठी स्वतःचा ‘मृत्यू’; लिफ्ट मागणाऱ्या वृद्धाचा जिवंत जाळून खून, उलगडलं सत्य
शॉकींग!एक कोटीच्या इन्शुरन्साठी स्वतःचा ‘मृत्यू’; लिफ्ट मागणाऱ्या वृद्धाचा जिवंत जाळून खून, उलगडलं सत्य
थेट मुंबई उच्च न्यायालयाच्या दारात एकानं स्वत:ला पेट्रोलनं पेटवून घेतलं, तब्बल 60 टक्के भाजल्याची भीती
थेट मुंबई उच्च न्यायालयाच्या दारात एकानं स्वत:ला पेट्रोलनं पेटवून घेतलं, तब्बल 60 टक्के भाजल्याची भीती
बिहारमध्ये दणकून आपटल्यानंतर प्रशांत किशोर पुन्हा चकवा देण्याच्या तयारीत? थेट दिल्ली गाठत कोणाशी केली 'मन की बात'??
बिहारमध्ये दणकून आपटल्यानंतर प्रशांत किशोर पुन्हा चकवा देण्याच्या तयारीत? थेट दिल्ली गाठत कोणाशी केली 'मन की बात'??

व्हिडीओ

Election Commission PC : राज्यात महानगर पालिका निवडणुका जाहीर, 15 जानेवारीला मतदान, 16 ला मतमोजणी
Muncipal Corporation Election : राज्याच्या मतदार यादीत कोणताही घोळ नाही, निवडणूक आयोगाची भूमिका
Municipal Corporation Election : आजपासून 29 महानगर पालिकांसाठी आचारसंहिता लागू- निवडणूक आयोग
Municipal Corporation Election : उमेदवारांना सहा महिन्यात जात वैधता प्रमाणपत्र सादर करावा लागणार
Municipal Corporation Election : मनपासाठी 15 जानेवारीला मतदार, तर 16 जानेवारीला मतमोजणी

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Jalgaon : नऊ वर्षांची चिमुकली तीन दिवसांपासून रहस्यमयरित्या बेपत्ता, गावाबाहेर शाळेचे दप्तर आढळलं; चाळीसगावातील घटना
नऊ वर्षांची चिमुकली तीन दिवसांपासून रहस्यमयरित्या बेपत्ता, गावाबाहेर शाळेचे दप्तर आढळलं; चाळीसगावातील घटना
शॉकींग!एक कोटीच्या इन्शुरन्साठी स्वतःचा ‘मृत्यू’; लिफ्ट मागणाऱ्या वृद्धाचा जिवंत जाळून खून, उलगडलं सत्य
शॉकींग!एक कोटीच्या इन्शुरन्साठी स्वतःचा ‘मृत्यू’; लिफ्ट मागणाऱ्या वृद्धाचा जिवंत जाळून खून, उलगडलं सत्य
थेट मुंबई उच्च न्यायालयाच्या दारात एकानं स्वत:ला पेट्रोलनं पेटवून घेतलं, तब्बल 60 टक्के भाजल्याची भीती
थेट मुंबई उच्च न्यायालयाच्या दारात एकानं स्वत:ला पेट्रोलनं पेटवून घेतलं, तब्बल 60 टक्के भाजल्याची भीती
बिहारमध्ये दणकून आपटल्यानंतर प्रशांत किशोर पुन्हा चकवा देण्याच्या तयारीत? थेट दिल्ली गाठत कोणाशी केली 'मन की बात'??
बिहारमध्ये दणकून आपटल्यानंतर प्रशांत किशोर पुन्हा चकवा देण्याच्या तयारीत? थेट दिल्ली गाठत कोणाशी केली 'मन की बात'??
पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, 19 तारखेला पंतप्रधान बदलणार; देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, विखे पाटलांचही सडकून टीका
पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, 19 तारखेला पंतप्रधान बदलणार; देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, विखे पाटलांचही सडकून टीका
Who is Nitin Nabin: ज्यांचं कालपर्यंत नाव कोणाला माहीत नाही, ओळखही नाही तेच आता थेट भाजपचे राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष! नितिन नबीन नेमके आहेत तरी कोण?
ज्यांचं कालपर्यंत नाव कोणाला माहीत नाही, ओळखही नाही तेच आता थेट भाजपचे राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष! नितिन नबीन नेमके आहेत तरी कोण?
Kolhapur Municipal Corporation: आचारसंहिता लागण्यापूर्वीच कोल्हापूरच्या केएमटी कर्मचाऱ्यांना घेतलं कायम सेवेत; एकनाथ शिंदेंकडून प्रस्तावावर सही
कोल्हापूर : आचारसंहिता लागण्यापूर्वीच केएमटी कर्मचाऱ्यांना घेतलं कायम सेवेत; एकनाथ शिंदेंची प्रस्तावावर सही
Video: महिलेचा हिजाब काढला, नितीश कुमारांच्या व्हिडिओने नवा वाद; विरोधकांचा संताप, काँग्रेसने मागितला राजीनामा
Video: महिलेचा हिजाब काढला, नितीश कुमारांच्या व्हिडिओने नवा वाद; विरोधकांचा संताप, काँग्रेसने मागितला राजीनामा
Embed widget