(Source: Poll of Polls)
Air India Plane Crash: DGCA ने एअर इंडियाला आधीच पत्र पाठवत दिला होता इशारा; माजी सहसचिव म्हणाले, चूक कुठे झाली?
Sanat Kaul on Air India Plane Crash: अहमदाबादमध्ये झालेल्या एअर इंडियाच्या विमान अपघातावर नागरी विमान वाहतूक मंत्रालयाचे माजी सहसचिव डॉ. सनत कौल (Sanat Kaul) यांनी गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत.

Sanat Kaul on Air India Plane Crash : अहमदाबादमध्ये झालेल्या एअर इंडियाच्या विमान अपघातावर नागरी विमान वाहतूक मंत्रालयाचे माजी सहसचिव डॉ. सनत कौल (Sanat Kaul) यांनी गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत. ते म्हणाले की, ही दुर्घटना खूप भयानक आहे, ज्यामध्ये अनेक लोकांना आपले प्राण गमवावे लागले, हे खूप दुःखद आहे. मात्र हे बोलत असताना त्यांनी प्रश्न उपस्थित केला की, दोन्ही इंजिन एकाच वेळी कसे निकामी होऊ शकतात?
अपघातग्रस्त बोईंग विमान फक्त 10 वर्षे जुने होते. डॉ. कौल म्हणाले की, बोईंग ही 100 वर्षे जुनी प्रतिष्ठित कंपनी आहे. परंतु अलिकडच्या काळात त्यांच्या विमान निर्मितीबाबत अनेक तक्रारी समोर आल्या आहेत आणि अमेरिकेतही चौकशी सुरू आहे. किंबहुना, अपघातग्रस्त बोईंग विमान फक्त दहा वर्षे जुने होते.
डीजीसीएने एअर इंडियाला अनेक वेळा पाठवले होते पत्र
डॉ. सनत कौल यांनी पुढे सांगितले की, या प्रकरणातील चौकशीनंतरच सत्य बाहेर येईल, परंतु सुरक्षेतील त्रुटी निश्चितच प्रश्न उपस्थित करते. डॉ. कौल यांनी असेही उघड केले की, डीजीसीए (नागरी विमान वाहतूक महासंचालनालय) ने एअर इंडियाला अनेक वेळा पत्र लिहून इशारा दिला होता, ज्यामुळे हे स्पष्ट होते की सुरक्षेच्या मुद्द्यांकडे दुर्लक्ष केले गेले असावे. ते म्हणाले की आपल्या देशाचे विमान वाहतूक नियम आणि रचना आंतरराष्ट्रीय दर्जाची आहे. या अपघाताची चौकशी करण्यासाठी परदेशी पथकेही भारतात येतील आणि बोईंगची तज्ज्ञ टीमही या चौकशीत सहभागी होईल.
विमानातील एक प्रवासी बचावला
अहमदाबाद विमान अपघातात एक प्रवासी जिवंत बचावल्याची माहिती समोर आली आहे. एएनआय वृत्तसंस्थेला दिलेल्या माहितीनुसार, विमानातील 11A या सीटवर बसलेले रमेश विश्वकुमार हे एकमेव प्रवासी सुदैवाने वाचले आहेत. सध्या त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू असून, त्यांची प्रकृती गंभीर आहे. डॉक्टरांची एक विशेष टीम त्यांच्या प्रकृतीवर सातत्यानं लक्ष ठेवून आहे. या भीषण दुर्घटनेविषयी सांगताना रमेश विश्वकुमार म्हणाले, "विमानाने टेकऑफ घेतल्यानंतर अवघ्या 30 सेकंदांतच जोरदार आवाज यायला लागला आणि काही क्षणांतच विमान कोसळलं. हे सगळं इतकं वेगानं घडलं की कळायच्या आतच अपघात झाला," असे त्यांनी म्हटले आहे.
इतर महत्वाच्या बातम्या



















