![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/Premium-ad-Icon.png)
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Agriculture Innovation : 'या' गावातल्या प्रत्येक घरात मोफत बायोगॅस, वाचा गावाचं कल्याण करणाऱ्या 'गगनदीप'ची गाथा
Innovative Farmer : पंजाबच्या एका शेतकऱ्यानं आपल्या दूध व्यवसायाच्या माध्यमातून संपूर्ण गावाचे चित्र बदलून टाकलं आहे. त्या शेतकऱ्याने गावासाठी एक कल्याणाचे काम केले आहे.
![Agriculture Innovation : 'या' गावातल्या प्रत्येक घरात मोफत बायोगॅस, वाचा गावाचं कल्याण करणाऱ्या 'गगनदीप'ची गाथा Agriculture News Punjab Success story Gagandeep singh Dairy Farmer encourages organic farming from biogas plant supplies free cooking gas to village Agriculture Innovation : 'या' गावातल्या प्रत्येक घरात मोफत बायोगॅस, वाचा गावाचं कल्याण करणाऱ्या 'गगनदीप'ची गाथा](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/01/05/625700d9e94ce10fd86e6e6c520a85d11672899140933339_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Agriculture News Successful Farmer: शेतकरी कृषी क्षेत्रात (Agricultural Sector) सातत्यानं नवनवीन प्रयोग करत आहेत. आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करुन मोठ्या प्रमाणावर उत्पादन घेतलं जात आहे. तसेच काही शेतकरी दुग्ध व्यवसायातून (Dairy Business) मोठा नफा कमवत आहेत. आज आपण पंजाबच्या (Punjab) एका यशस्वी दूध व्यवसायिकाची माहिती पाहणार आहोत. आपल्या दूध व्यवसायाच्या माध्यमातून त्या शेतकऱ्याने संपूर्ण गावाचे चित्र बदलून टाकलं आहे. त्यांनी आपल्या गावासाठी एक कल्याणाचे काम केले आहे.
गगनदीप सिंह (Gagandeep singh) हे पंजाबमधील रूपनगर येथील एक दुग्ध व्यवसाय करणारे शेतकरी आहेत. त्यांच्या शेतात जवळपास 150 गायी आहेत. या गाईंपासून गगनदीप सिंह हे केवळ दुधाचे उत्पादन घेत नाहीत, तर शेणखतापासूनही त्याना चांगले उत्पन्न मिळत आहे. गगनदीप सिंह यांनी डेअरी फार्मसह बायोगॅस प्लांट उभारला आहे. त्यामध्ये शेण गोळा करून बायोगॅस आणि सेंद्रिय खते बनवली जात आहेत. याचा मोठा फायदा त्यांना होत आहे.
Agriculture News : गावातील प्रत्येक घरात स्वयंपाकाचा गॅस मोफत
गगनदीप सिंह यांनी उभारलेल्या बायोगॅस प्लांटमधून निघणाऱ्या गॅसमुळं आज संपूर्ण गावाची गरज भागत आहेत. उर्वरित शेणापासून सेंद्रिय खते तयार करून शेतकऱ्यांना दिली जात आहेत. आज संपूर्ण गावात एलपीजी सिलिंडर कोणाच्याही घरी येत नाही, त्याऐवजी बायोगॅस प्लांटमधून निघणाऱ्या गॅसमधून मोफत अन्न तयार केले जाते. गगनदीप सिंह यांनी गावातील प्रत्येक घरात मोफत स्वयंपाकाचा गॅस दिला आहे. शेणामुळं जमिनीची सुपीक वाढते. तसेच पर्यावरणाच्या दृष्टिकोनातून बायोगॅस हा सुरक्षित आहे. पंजाबमधील रूपनगर येथील रहिवासी असलेल्या गगनदीप सिंह यांनी या शेणाचा योग्य वापर करून संपूर्ण गावाला मोफत बायोगॅस दिला आहे.
Agriculture News ; गावातील नागरिकांचा सिलिंडरचा 800 ते 1000 रुपयांचा खर्च वाचला
गगनदीप सिंह यांनी भूमिगत बायोगॅस प्लांट उभारला आहे. ज्यातून एक पाइपलाइन काढण्यात आली आहे. या पाइपलाइनद्वारे गावातील प्रत्येक घरात बायोगॅस कनेक्शन देण्यात आले आहे. आता या पाइपलाइन कनेक्शनद्वारे प्रत्येक स्वयंपाकघरात दररोज सहा ते सात तास स्वयंपाक करण्यासाठी बायोगॅस मिळतो. याचा गावकऱ्यांना मोठा फायदा होत आहे. हा गॅस पूर्णपणे मोफत उपलब्ध करून देण्यात येत असल्याने गावातील प्रत्येक घरात सिलिंडरचा 800 ते 1000 रुपयांचा खर्च वाचत आहे. कोरोना महामारीच्या काळात देशभरात स्वयंपाकाच्या गॅसच्या पुरवठ्याची समस्या निर्माण झाली असताना, या गावातील नागरिकांना कोणताही अडचण आली नाही.
महत्त्वाच्या बातम्या:
Dairy Business : दिलासादायक! दुग्ध व्यवसायासाठी 50 लाख शेतकऱ्यांना मिळणार 50 टक्के अनुदान : मंत्री डॉ. संजीव बल्यान
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)