एक्स्प्लोर

'ऑपरेशन सिंदूर'ने नांगी ठेचून काही दिवस सुद्धा होत नाहीत तोपर्यत पाकिस्तानने पुन्हा फणा काढला; 'आयएसआय'चा कट रचण्यासाठी नवीन पॅटर्न

Pakistan : भारताचा पाकिस्तानशी असलेला तणाव काहीसा कमी झाला असला, तरी परंतु पाकिस्तानची  गुप्तचर संस्था आयएसआय (ISI) अजूनही भारतात अशांतता पसरवण्याच्या अजेंड्यावर काम करत आहे.

Inter-Services Intelligence : पहलगाममध्ये झालेल्या निष्पाप पर्यटकांवर झालेल्या क्रूर दहशतवादी हल्ल्यानंतर (Pahalgam Terror Attack) भारताने पंधरा दिवसात पाकिस्तानची नांगी ठेचताना ऑपरेशन सिंदूर (Operation Sindoor) करत दहशतवाद्यांचे तळ हवेतून उद्ध्वस्त करून टाकले. हवाई तळांना सुद्धा दणका देत अचूक लष्करी सामर्थ्याची ताकद दाखवून दिली. यानंतर भारताचा पाकिस्तानशी असलेला तणाव काहीसा कमी झाला असला, तरी परंतु पाकिस्तानची  गुप्तचर संस्था आयएसआय (Inter-Services Intelligence) अजूनही भारतात अशांतता पसरवण्याच्या अजेंड्यावर काम करत आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, युद्धबंदी जाहीर झाल्यानंतर आयएसआयनेआता खलिस्तानी समर्थकांना (Khalistani supporters) भडकवण्यास सुरुवात केली आहे, जेणेकरून भारतात मोठी दहशतवादी घटना घडू शकेल.

खलिस्तानी दहशतवाद्यांचे नेटवर्क पुन्हा सक्रिय करण्याचे काम 

आयएसआय खलिस्तानी दहशतवादी संघटना शीख फॉर जस्टिस (एसएफजे) प्रमुख गुरपतवंत सिंग पन्नू आणि कॅनडामधील इतर खलिस्तानी दहशतवाद्यांची मदत घेत आहे. त्यांच्या माध्यमातून पंजाब, हरियाणा आणि इतर राज्यांमध्ये खलिस्तानी दहशतवाद्यांचे नेटवर्क पुन्हा सक्रिय करण्याचे काम सुरू झाले आहे. खलिस्तानी दहशतवाद्यांचा कट भारतातील पोलिस स्टेशन, सैन्य आणि सरकारी आस्थापनांना लक्ष्य करण्याचा आहे. कट रचण्यासाठी गेल्या काही दिवसांत एक नवीन पॅटर्न दिसून आला आहे. फरार खलिस्तानी दहशतवादी आता पुन्हा भारतात येऊ लागले आहेत, जेणेकरून येथे मोठी दहशतवादी घटना घडू शकेल. गुप्तचर संस्थांनी देशातील सर्व सुरक्षा तपास संस्थांना याबद्दल इशारा दिला आहे. यानंतर एनआयए, पंजाब-दिल्ली-चंदीगड पोलिस आणि इतर राज्यांचे पोलिस अलर्ट मोडवर आहेत. काही राज्यांवरही कारवाई करण्यात आली आहे.

4 प्रकरणांमध्ये खलिस्तानी नेटवर्क पुन्हा सक्रिय होत असल्याचे दिसून येते

  • नाभा तुरुंग फोडण्याचा आरोपी आणि 10 लाख रुपयांचे बक्षीस असलेला दहशतवादी काश्मीर सिंग 9 वर्षांनी भारतात परतला आणि त्याला बिहारमधून अटक करण्यात आली.
  • चंदीगडवर हल्ला करू इच्छिणारा बब्बर खालसा इंटरनॅशनलचा दहशतवादी हॅरी याला मणिमाजरा येथून पिस्तूलसह पकडण्यात आले.
  • गेल्या आठवड्यात, चंदीगड पोलिसांनी बीकेआयच्या 2 सक्रिय खलिस्तानी दहशतवादी जोबनजीत सिंग आणि सुमनदीप सिंग यांना आरडीएक्ससह अटक केली. अमृतसर पोलिस स्टेशनवरील बॉम्ब हल्ल्याच्या प्रकरणात ते हवे होते.
  • बब्बर खालसाशी संबंधित 5 दहशतवादी ग्रेनेडने अमृतसर पोलिस स्टेशनवर हल्ला करण्यासाठी आले होते, परंतु त्यांना अटक करण्यात आली.

खलिस्तान समर्थित सोशल मीडिया पेज पाकिस्तानमधून  

गुप्तचर यंत्रणांनी पाकिस्तानमधून चालवले जाणारे खलिस्तान समर्थित सोशल मीडिया अकाउंट रोखले आहे. ही सर्व बॉट ऑपरेटेड अकाउंट आहेत आणि त्यांनी स्वतःला भारतीय असल्याचे दाखवले आहे. ही सोशल मीडिया अकाउंट्स काही शीख व्यक्तीची ओळख किंवा बनावट नाव वापरून तयार करण्यात आली आहेत. केंद्राने खलिस्तान समर्थकांना भडकावणारे 100 व्हिडिओ ब्लॉक केले आहेत. दहशतवादी पन्नूचे 50हून अधिक बॉट सोशल मीडिया अकाउंट्स देखील बंद करण्यात आले आहेत.

10 मे रोजी भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्धबंदी 

10 मे रोजी संध्याकाळी भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्धबंदी झाली. तथापि, पाकिस्तानने सलग दोन वेळा युद्धबंदीचे उल्लंघन केले. 12 मे रोजी दोन्ही देशांच्या डीजीएमओंमध्ये पुन्हा चर्चा झाली. ज्यामध्ये सीमेवरून सैनिक कमी करण्याचे आणि एकमेकांविरुद्ध कारवाई थांबवण्याचे मान्य करण्यात आले.

इतर महत्वाच्या बातम्या 

महत्त्वाच्या बातम्या

Ramlila Maidan Protest Charges : सरकारकडून आंदोलकांची आर्थिक कोंडी, रामलिला मैदानाच्या एका दिवसाच्या बुकिंगसाठी 'इतके' लाख रुपये खर्च, फक्त 3 दिवसच मैदान मोकळे
सरकारकडून आंदोलकांची आर्थिक कोंडी, रामलिला मैदानाच्या एका दिवसाच्या बुकिंगसाठी 'इतके' लाख रुपये खर्च, फक्त 3 दिवसच मैदान मोकळे
शेतकऱ्यांच्या पदरात पुन्हा एकदा आश्वासनांचे गाजर, आता थेट आरपारची लढाई, ऊस प्रश्नावरुन राजू शेट्टींचा एल्गार 
शेतकऱ्यांच्या पदरात पुन्हा एकदा आश्वासनांचे गाजर, आता थेट आरपारची लढाई, ऊस प्रश्नावरुन राजू शेट्टींचा एल्गार 
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 12 ऑक्टोबर 2026 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 12 ऑक्टोबर 2026 | सोमवार
Gyanesh Kumar : ज्ञानेश कुमारांना सर्वोच्च न्यायालयाचा मोठा झटका, विरोधातील सर्व याचिका मंजूर, 27 ऑक्टोबरला होणार एकत्रित सुनावणी
ज्ञानेश कुमारांना सर्वोच्च न्यायालयाचा मोठा झटका, विरोधातील सर्व याचिका मंजूर, 27 ऑक्टोबरला होणार एकत्रित सुनावणी

व्हिडीओ

India Alliance Supreme Court Morcha : विरोधकांची 'सुप्रीम' धाव; कुणाकुणावर घाव? | Special Report ABP Majha
Abhijeet Dipke vs Delhi Police : दिपके, पोलीस भिडले; कोण कुणाला नडले? | Special Report ABP Majha
Sunetra Pawar Speech : अजित पवारांचे नाव घेताना सुनेत्रा पवार भावुक, भावनिक भाषण
MPSC Protest Pune: पुण्यातील तिन्ही आंदोलनं कशी गुंडाळली?; Inside Story
Shetitil Navdurga | Swati Kushare |‘शेतकरी’ म्हणवून घेण्याचा संकोच होता… आज त्याच ओळखीचा अभिमान आहे!

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Someshwar Sugar Factory Election Result : 'सोमेश्वर'वर राष्ट्रवादीचे एकछत्री वर्चस्व! सुनेत्रा पवारांच्या पॅनेलचा 21-0 ने विजय; विरोधकांचे मनसुबे धुळीस
'सोमेश्वर'वर राष्ट्रवादीचे एकछत्री वर्चस्व! सुनेत्रा पवारांच्या पॅनेलचा 21-0 ने विजय; विरोधकांचे मनसुबे धुळीस
Tribal Students Protest : आदिवासी विद्यार्थ्यांच्या आंदोलनानंतर सरकार ॲक्शन मोडवर, 'सेंट्रल किचन'च्या अन्नाच्या दर्जाची होणार चौकशी
आदिवासी विद्यार्थ्यांच्या आंदोलनानंतर सरकार ॲक्शन मोडवर, 'सेंट्रल किचन'च्या अन्नाच्या दर्जाची होणार चौकशी
Ahilyadevi Holkar Karjmukti Yojana 3rd List : शेतकरी कर्जमुक्तीची तिसरी यादी जाहीर, साडेतीन लाख शेतकऱ्यांना थेट लाभ; लाभार्थ्यांची नावं कुठे पाहाल?
शेतकरी कर्जमुक्तीची तिसरी यादी जाहीर, साडेतीन लाख शेतकऱ्यांना थेट लाभ; लाभार्थ्यांची नावं कुठे पाहाल?
सोमेश्वर कारखाना निवडणुकीत एकतर्फी विजय; सुनेत्रा पवार भावुक, जय स्मृतीस्थळावर, पार्थ पवारांनाही आनंद
सोमेश्वर कारखाना निवडणुकीत एकतर्फी विजय; सुनेत्रा पवार भावुक, जय स्मृतीस्थळावर, पार्थ पवारांनाही आनंद
मतदार यादीतील नाव नोंदणीस आणखी मुदतवाढ; SIR प्रक्रियेत नाव वगळलेल्यांना संधी, निवडणूक आयोगाचा निर्णय
मतदार यादीतील नाव नोंदणीस आणखी मुदतवाढ; SIR प्रक्रियेत नाव वगळलेल्यांना संधी, निवडणूक आयोगाचा निर्णय
धक्कादायक! चिमुकल्या बाळाचे अपहरण करुन विक्री; महिलांची टोळी अटकेत, गुजरातला नेणार असल्याचं तपासातून समोर
धक्कादायक! चिमुकल्या बाळाचे अपहरण करुन विक्री; महिलांची टोळी अटकेत, गुजरातला नेणार असल्याचं तपासातून समोर
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 12 ऑक्टोबर 2026 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 12 ऑक्टोबर 2026 | सोमवार
विरोधी पक्षांचा पहिल्यांदाच सुप्रीम कोर्टावर विराट मोर्चा, अभूतपूर्व एकजुटीने दिल्ली दणाणली; राहुल, अखिलेश यादवांसह 11 विरोधी नेत्यांकडून SIR, ज्ञानेश कुमारांविरोधात रिट याचिका
विरोधी पक्षांचा पहिल्यांदाच सुप्रीम कोर्टावर विराट मोर्चा, अभूतपूर्व एकजुटीने दिल्ली दणाणली; राहुल, अखिलेश यादवांसह 11 विरोधी नेत्यांकडून SIR, ज्ञानेश कुमारांविरोधात रिट याचिका
Embed widget