एक्स्प्लोर

Exclusive | हाथरस प्रकरण : गावच्या प्रधानांची कबुली; म्हणाले, घटनास्थळी उपस्थित होते आरोपी संदीप आणि राम कुमार

हाथरस प्रकरणात तरूणीसोबत झालेल्या अत्याचाराच्या वेळी आरोपी घटनास्थळी उपस्थित नव्हते, असा दावा आरोपींच्या कुटुंबियांकडून सातत्याने केला जात आहे. आरोपींना वाचवण्यासाठी सतत हा एकच दावा केला जात आहे.

उत्तर प्रदेश : हाथरस प्रकरणी ABP न्यूजने एक मोठा खुलासा केला आहे. हाथरस प्रकरणातील तरूणीचा मेडिकल रिपोर्ट सर्वात महत्त्वाचा ठरत आहे. पीडितेचं मेडिकल करणाऱ्या डॉक्टरांनी सांगितलं की, मी तरूणीसोबत अन्याय होऊ देणार नाही.

हाथरस प्रकरणात तरूणीसोबत झालेल्या अत्याचाराच्या वेळी आरोपी घटनास्थळी उपस्थित नव्हते, असा दावा आरोपींच्या कुटुंबियांकडून सातत्याने केला जात आहे. आरोपींना वाचवण्यासाठी सतत हा एकच दावा केला जात आहे. खरचं असं झालं आहे का? ज्यावेळी पीडितेवर अत्याचार झाला, त्यावेळी आरोपी घटनास्थळी उपस्थित नव्हते? आरोपींच्या कुटुंबियांकडून करण्यात येणाऱ्या दाव्याची सत्यता शोधताना एबीपी न्यूजच्या अंडर कव्हर टीमने एक व्हिडीओ कॅमेऱ्यात कैद केला आहे. ज्यावरून हे सिद्ध होतं की, हाथरस प्रकरणातील पीडितेवर जबरदस्ती करण्यात आली होती. तसेच त्यावेळी दोन आरोपी घटनास्थळी उपस्थित होते.

आरोपी लव कुशची आई म्हणाली की, 'माझा मुलगा निर्दोष आहे. मी त्यांच्यासोबतच होते. गुरांसाठी चारा कापत होते. या प्रकरणात निर्दोष असलेल्यांना अडकवण्यात येत आहे. मी स्वतः पाणी मागवलं आणि आईला म्हटलं की, घ्या वहिनी पाणी पाजा.' तसेच आरोपी राम कुमारचे वडिल म्हणाले की, 'ज्या दिवशी घटना घडली त्या दिवशी माझा मुलगा गावात नव्हता. तो 7 वाजता कामावर निघून गेला होता. हे प्रकरण सर्व खोटं आहे.' एवढचं नाहीतर मुख्य आरोपीचे वडिल म्हणाले की, 'याच्यातील कोणीच घटनास्थळी उपस्थित नव्हतं, माझा मुलगा माझ्याजवळ होता.'

हाथरस प्रकरण : पीडितेचा मृत्यू आई आणि भावाच्या मारहाणीमुळे; चारही आरोपींचं उत्तर प्रदेश पोलिसांना पत्र

खरंच घटनास्थळी संदीप आणि राम कुमार उपस्थित नव्हते?

एबीपी न्यूजची अंडर कव्हर टीमच्या हाथरसमधील बुलगढी गावात पोहोचली आणि तिथे सर्वांसोबत संपर्क साधला. या संपूर्ण प्रकरणात गावाचे प्रमुख हे अत्यंत जोमाने आरोपीच्या बाजूने उभे असल्याचे दिसून येत आहे. बुलगढी गावात या प्रमुखांचा प्रभाव आणि संपर्क दोन्ही चांगला आहे. आमच्या अंडरकव्हर रिपोर्टर्सनी गावाच्या प्रमुखांशी संवाद साधला.

सुरुवातीला ते आमच्या टीमसोबत फारसा संवाद साधत नव्हते. परंतु, त्यानंतर आमच्या रिपोर्टर्सनी ज्यावेळी त्यांच्यावर प्रश्नांची सरबत्ती करण्यास सुरुवात केली, त्यावेळी मात्र त्यांनी घटनाक्रमाबाबत बोलण्यास सुरुवात केली. ज्यावेळी त्यांना विचारण्यात आले की, त्यावेळी लवकुश कुठे होता? त्यावेळी मात्र त्यांनी दिलेलं उत्तर एबीपीच्या कॅमेऱ्यात कैद झालं आहे.

रिपोर्टरने विचारलं लव-कुश कुठे होता? गावाचे प्रमुख म्हणाले की, 'तेच तर सांगतोय, घटनेनंतर त्याने पीडितेला पाणी पाजलं... सगळ्या गावासमोर... तिच्या आईने हल्ला केला... मारलं... मारलं... जेव्हा तो शेतातून निघून आला त्यावेळी हल्ला केला. त्याची आई म्हणत होती की, माझी मुलगी आहे ती... संदीप खेचून घेऊन गेला आणि गळा दाबला... त्यानंतर लवकुश पाणी घेऊन आला... सर्वांना माहिती आहे... ज्याने पाणी पाजलं त्याचंही नाव आलं.'

तपासासाठी एसआयटीला आणखी 10 दिवसांची मुदतवाढ

हाथरस प्रकरणी स्पेशल इन्वेस्टिगेशन टीम (SIT) तपास करत असून बुधवारी एसआयटी आपला अहवाल उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याकडे सोपावणार होती. मात्र आज सकाळीच एसआयटीला आणखी दहा दिवसांचा अवधी मिळाला आहे. गृहसचिव भगवान स्वरुप यांच्या नेतृत्त्वात एसआयटीचा तपास सुरु आहे. या प्रकरणात एसआयटीला तपासासाठी एक आठवड्यांचा मुदत देण्यात आली होती. दरम्यान तपसासाठी आणखी 10 दिवसांची मुदत वाढवून देण्यात आली आहे.

Hathras Gang Rape | पीडितेच्या शवविच्छेदन अहवालात बलात्काराचा उल्लेखच नाही!

पीडितेच्या शवविच्छेदन अहवालात बलात्काराचा उल्लेखच नाही

उत्तर प्रदेशातील हाथरस बलात्कार आणि हत्या प्रकरणावरुन राजकारण तापलं आहे. काही दिवसांपूर्वी पीडितेचा शवविच्छेदन अहवाल समोर आला होता. धक्कादायक बाब म्हणजे या अहवालात बलात्काराचा उल्लेखच नाही. परिणामी या अहवालाचा थेट फायदा स्वाभाविकपणे आरोपींना होणार आहे. त्यामुळे ज्याप्रमाणे पीडितेच्या कुटुंबीयांना न सांगताच पोलिसांनी गुपचूप अंत्यसंस्कार केले, त्याचप्रमाणे या शवविच्छेदन अहवालातही छेडछाड केली का असाही प्रश्न उपस्थित होत आहेत.

दिल्लीच्या सफदरजंग रुग्णालयातील डॉक्टरांच्या पथकाने पीडितेचं शवविच्छेदन केलं. या शवविच्छेदन अहवालानुसार, "पीडितेचा मृत्यू मानेचं हाड मोडल्याने झाला आहे." तसंच गळ्यावर जखमांचे निशाण आहे. पीडितेला ब्लड इन्फेक्शन झालं आणि हार्ट अटॅकही आला होता. या तरुणीचा मृत्यू 29 सप्टेंबर सकाळी 6 वाजून 55 मिनिटांनी झाला होता, असं अहवालात नमूद केलं आहे.

14 सप्टेंबर रोजी पाशवी अत्याचार, 29 सप्टेंबरला अखेरचा श्वास

14 सप्टेंबर रोजी हाथरसमध्ये एका 19 वर्षीय तरुणीवर पाशवी अत्याचार करण्यात आले. आरोपींनी क्रूरतेची परिसीमा गाठत तरुणीची जीभ कापली. यानंतर तिला अलिगड मुस्लीम विद्यापीठाच्या जवाहरलाल नेहरु मेडिकल कॉलेजमध्ये दाखल करण्यात आलं. त्यानंतर तिला सोमवारी (28 सप्टेंबर) दिल्लीच्या सफदरजंग रुग्णालयात हलवण्यात आलं. तिथे तिने मंगळवारी सकाळी प्राण सोडले. या प्रकरणातील चार आरोपींना पकडलं असून त्यांची रवानगी तुरुंगात करण्यात आली आहे.

महत्त्वाच्या बातम्या : 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Satej Patil Radhanagari Speech :   भर मंचावर सतेज पाटलांना समोर बोलावलं, राधानगरीत मोठी जबाबदारी
भर मंचावर सतेज पाटलांना समोर बोलावलं, राधानगरीत मोठी जबाबदारी
मध्यप्रदेशकडून महाराष्ट्रात येणाऱ्या वाहनातून 70 लाखांची रोकड जप्त
Dhule Cash Seized : मध्यप्रदेशकडून महाराष्ट्रात येणाऱ्या वाहनातून 70 लाखांची रोकड जप्त
लोकसभेत हातावर लिहिले 3 'वाजे'ला मतदान करा, माझ्या पाठीत खंजीर खुपसला, हेमंत गोडसेंचा भुजबळांवर गंभीर आरोप
लोकसभेत हातावर लिहिले 3 'वाजे'ला मतदान करा, माझ्या पाठीत खंजीर खुपसला, हेमंत गोडसेंचा भुजबळांवर गंभीर आरोप
एकाच राज्यासाठी काम करत असाल तर तुम्ही पंतप्रधान कशाला होता? राज्याचे मुख्यमंत्री व्हा; पवार गरजले
एकाच राज्यासाठी काम करत असाल तर तुम्ही पंतप्रधान कशाला होता? राज्याचे मुख्यमंत्री व्हा; पवार गरजले
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Uddhav Thackeray Radhanagri Speech : शिवरायांचं मंदिर ते मुलांना मोफत शिक्षण; ठाकरेंची मोठी आश्वासनंSatej Patil Radhanagari Speech :   भर मंचावर सतेज पाटलांना समोर बोलावलं, राधानगरीत मोठी जबाबदारीEknath Shinde Koregaon Sabha : महेश शिंदेंच्या प्रचारसाठी कोरेगावात सभा, शिंदेंची कोरेगावात सभाSharad Pawar On Retirement : 14 वेळा निवडणुका लढल्या, आता निवडणुक लढणार नाही

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Satej Patil Radhanagari Speech :   भर मंचावर सतेज पाटलांना समोर बोलावलं, राधानगरीत मोठी जबाबदारी
भर मंचावर सतेज पाटलांना समोर बोलावलं, राधानगरीत मोठी जबाबदारी
मध्यप्रदेशकडून महाराष्ट्रात येणाऱ्या वाहनातून 70 लाखांची रोकड जप्त
Dhule Cash Seized : मध्यप्रदेशकडून महाराष्ट्रात येणाऱ्या वाहनातून 70 लाखांची रोकड जप्त
लोकसभेत हातावर लिहिले 3 'वाजे'ला मतदान करा, माझ्या पाठीत खंजीर खुपसला, हेमंत गोडसेंचा भुजबळांवर गंभीर आरोप
लोकसभेत हातावर लिहिले 3 'वाजे'ला मतदान करा, माझ्या पाठीत खंजीर खुपसला, हेमंत गोडसेंचा भुजबळांवर गंभीर आरोप
एकाच राज्यासाठी काम करत असाल तर तुम्ही पंतप्रधान कशाला होता? राज्याचे मुख्यमंत्री व्हा; पवार गरजले
एकाच राज्यासाठी काम करत असाल तर तुम्ही पंतप्रधान कशाला होता? राज्याचे मुख्यमंत्री व्हा; पवार गरजले
Numerology : अतिशय घाबरट असतात 'या' जन्मतारखेचे लोक; मनातील भावनाही धड करत नाहीत व्यक्त, लोक काय बोलतील याचा करतात अति विचार
अतिशय घाबरट असतात 'या' जन्मतारखेचे लोक; लोक काय बोलतील याचा करतात अति विचार, मनातील भावना व्यक्त करायलाही घाबरतात
नालासोपाऱ्यात हिंदी भाषिक टीसीची दादागिरी, दाम्पत्याकडून लिहून घेतलं
नालासोपाऱ्यात हिंदी भाषिक टीसीची दादागिरी, दाम्पत्याकडून लिहून घेतलं "मराठी बोलणार नाही"
मोठी बातमी! उत्तर प्रदेशच्या मदरसा कायद्याला सर्वोच्च न्यालयाची मान्यता, मदरशांना मोठा दिलासा 
मोठी बातमी! उत्तर प्रदेशच्या मदरसा कायद्याला सर्वोच्च न्यालयाची मान्यता, मदरशांना मोठा दिलासा 
Uddhav Thackeray Kolhapur : उद्धव ठाकरे कोल्हापुरात अंबाबाईच्या दर्शनाला
Uddhav Thackeray Kolhapur : उद्धव ठाकरे कोल्हापुरात अंबाबाईच्या दर्शनाला
Embed widget