ABP Network Ideas Of India: "लोकशाही, बहुलवाद आणि विकास हा भारताचा पाया आहे..."; आयडिया ऑफ इंडियामध्ये मुख्य संपादक अतिदेब सरकार नेमकं काय म्हणाले?
ABP Network Ideas Of India: एबीपी नेटवर्कचे चीफ एडिटर अतिदेब सरकार यांनी म्हटलं की, हा कार्यक्रम एक स्पर्धा म्हणून 'पीपल्स अजेंडा' या विषयावर बोलतो. भारताला स्वातंत्र्य मिळून 70 वर्ष झाली आहेत. प्राध्यापक आणि इतिहासकार सुनील खिलनानी म्हणतात की, लोकशाही, बहुलवाद आणि विकास हा भारताचा पाया आहे.
ABP Network Ideas Of India Live: एबीपी नेटवर्कची वार्षिक शिखर परिषद 'आयडिया ऑफ इंडिया'ला (Ideas Of India) आजपासून सुरुवात झाली. 23 आणि 24 फेब्रुवारी अशा दोन दिवस हा कार्यक्रम पार पडणार आहे. या परिषदेत बोलताना एबीपी नेटवर्कचे चीफ एडिटर अतिदेब सरकार यांनी म्हटलं की, हा कार्यक्रम एक स्पर्धा म्हणून 'पीपल्स अजेंडा' या विषयावर बोलतो. भारताला स्वातंत्र्य मिळून 70 वर्ष झाली आहेत. प्राध्यापक आणि इतिहासकार सुनील खिलनानी म्हणतात की, लोकशाही, बहुलवाद आणि विकास हा भारताचा पाया आहे.
अतिदेब सरकार म्हणाले की, प्राध्यापक खिलनानी यांची चूक नव्हती. पण नेहरूंचा भारताकडे पाहण्याचा दृष्टिकोन इतरांनी डळमळीत केला आहे. अयोध्येत राम मंदिराच्या उभारणीला सुरुवात होताच, भारत हे हिंदू राष्ट्र असावं, या विचाराला वेग आला. 2018 मध्ये मोहन भागवत म्हणाले होते की, आम्हाला सक्षम देश हवा आहे. मात्र, त्याचा वापर इतरांना दडपण्यासाठी करू नये. इथे आपल्याला एकत्र आणणारी गोष्ट म्हणजे, आपण हिंदुत्व म्हणतो.
"धर्म आणि सरकारचं मिश्रण शिगेला पोहोचलंय"
एबीपीचे मुख्य संपादक अतिदेब सरकार म्हणाले की, "जानेवारीमध्ये राम मंदिराच्या उद्घाटनावेळी अध्यात्म, धर्म आणि सरकार यांचे मिश्रण शिगेला पोहोचले होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, 'राम ही भारताची श्रद्धा आहे; राम हा भारताचा पाया आहे. राम हे भारताचे विचार आहेत, राम हे भारताचे संविधान आहे. आज ही गोष्ट भारतीय राजकारणाच्या मुख्य प्रवाहात आहे. आजच्या लोकांना निर्णायक नेतृत्व हवं आहे. सोशल मीडियाच्या जमान्यात आजची पिढी थोडी वेगळी आहे, जी पालकांपेक्षा मित्रांचंच जास्त ऐकते."
वीर दास यांच्या वक्तव्याचा संदर्भ देत अतिदेब सरकार म्हणाले...
अतिदेब सरकार यांनी म्हटलं की, 2021 मध्ये कॉमेडियन वीर दास म्हणाला होता की, मी दोन भारतांमधून आला आहे. एक जिथे एक्यूआय 900 आहे, तरिही आम्ही मोकळ्या आभाळाखाली झोपतो आणि अवकाशातले तारे पाहतो. दुसरी जागा जिथे आम्ही ट्विटरवर फूट पडल्याच्या चर्चा करतो, पण थिएटरमधील काळ्याकुट्ट अंधारात त्याच बॉलिवूडसाठी एकत्र येतो. एकीकडे आपण आपल्या घरात पोटदुखेपर्यंत हसतो, जे घराच्या भिंतीबाहेरही ऐकू येतं. दुसरीकडे, कॉमेडी क्लबच्या भिंती तुटलेल्या आहेत, कारण तुम्ही आम्हाला आतून ऐकू शकता.
इतर भारतालाही आपला आवाज शोधावा लागेल, असं ते म्हणाले. हे करण्यासाठी त्याला दोन प्रश्नांची उत्तरं शोधावी लागतील. रामराज्य नाही तर काय? आणि मोदी नाही तर कोण? तरंच खरी स्पर्धा पाहायला मिळेल.
कार्यक्रमाला दिग्गजांची मांदियाळी
एबीपी नेटवर्कवरील कार्यक्रमात ब्रिटीश संसदपटू सुएला ब्रेव्हरमन, काँग्रेस खासदार शशी थरूर, लेखक आणि गीतकार जावेद अख्तर, भारतीय अमेरिकन लेखिका आणि मॉडेल पद्मा लक्ष्मी, कलाकार सुबोध गुप्ता, लेखक अमिश त्रिपाठी, अभिनेत्री करीना कपूर, अर्थतज्ज्ञ अरविंद पनगरिया, राजकीय विश्लेषक सुनील शेलान उपस्थित होते. जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला, पूनम महाजन, इतिहासकार विक्रम संपत आणि इतर अनेक मान्यवरांचा समावेश असेल.