ABP CVoter Survey: लोकसभेच्या निवडणुकांमध्येही भाजप नव्या चेहऱ्यांना संधी देणार? सर्वेक्षणातून जनतेचं मत आलं समोर
ABP CVoter Survey: पुढील महिन्यात पाच राज्यांमध्ये विधानसभा निवडणुका आहेत. दरम्यान, सी-व्होटरने एबीपी न्यूजसाठी अनेक मुद्द्यांवर सर्वेक्षण केले आहे.
मुंबई : 2024 च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी राजस्थान, मध्य प्रदेश, छत्तीसगड, तेलंगणा आणि मिझोराम या पाच राज्यांमध्ये विधानसभा निवडणुका (Election) होणार आहेत. भारतीय निवडणूक आयोगाने (Election Comission) विधानसभा निवडणुकीच्या तारखाही जाहीर केल्या आहेत. राजस्थानमध्ये 25 नोव्हेंबरला, मध्य प्रदेशात 17 नोव्हेंबरला, छत्तीसगडमध्ये 7 आणि 17 नोव्हेंबरला, तेलंगणामध्ये 30 नोव्हेंबरला आणि मिझोराममध्ये 7 नोव्हेंबरला मतदान होणार असून या सर्व राज्यांचे निकाल 3 डिसेंबरला लावण्यात येणार आहेत.
मध्य प्रदेशात विधानसभेच्या 230 जागा आहेत. भाजपने आतापर्यंत आपली चौथी यादी जाहीर केली असून एकूण 136 उमेदवारी दिली आहे. 90 जागा असलेल्या छत्तीसगडमध्ये भाजपने 64 उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. त्याचवेळी, राजस्थानमधील एकूण 200 जागांपैकी भाजपने आपल्या पहिल्या यादीत 41 जागांसाठी उमेदवारांची नावे जाहीर केली आहेत.
या तीन राज्यांमध्ये भाजपने आतापर्यंत अनेक दिग्गज चेहऱ्यांना उमेदवारी दिली असून काही नव्या चेहऱ्यांनाही पक्षाकडून संधी दिली जात आहे. अशा परिस्थितीत 2024 च्या लोकसभा निवडणुकीतही भाजप नव्या चेहऱ्यांना संधी देणार का? हे शोधण्याचा प्रयत्न एबीपी न्यूजसाठी सी-व्होटरने मध्य प्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगड या तीन राज्यांमध्ये केलेल्या ताज्या सर्वेक्षणात केला. तर या सर्वेक्षणातून जनतेचं मत समोर आलं आहे.
2024 च्या लोकसभा निवडणुकीतही भाजप नव्या चेहऱ्यांना संधी देणार का?
(स्रोत- सी-व्होटर)
मध्यप्रदेशात 55 टक्के लोकांनी यावर हो असं उत्तर दिलं, तर 30 टक्के लोकांनी यावर नाही असं उत्तर दिलं. 15 टक्के लोकांना यावर काही सांगत येत नसल्याचं म्हटलं. तसेच राजस्थानमध्ये 61 लोकांना भाजप लोकसभा निवडणुकांमध्ये नव्या चेहऱ्यांना संधी देणार असल्याचं म्हटलं आहे, तर 25 टक्के लोकांनी याला सहमती दर्शवली नाही. यामध्ये 14 टक्के लोकांनी सांगता येत नाही असं म्हटलं. छत्तीसगढमध्ये 63 टक्के लोकांनी या प्रश्नावर हो असं उत्तर दिलं, यामध्ये 25
टक्के लोकांनी नाही म्हटलं. 12 टक्के लोकांनी सांगत येत नाही असं उत्तर दिलं.
या खासदारांना मिळाली विधानसभेची तिकिटे
मध्य प्रदेशातील विधानसभा निवडणुकीसाठी भाजपने गणेश सिंग, रीती पाठक, राकेश सिंग, उदय प्रताप सिंग, फग्गन सिंग कुलस्ते या खासदारांना तिकीट दिले आहे.तर रेणुका सिंह, गोमती साई, अरुण साओ आणि विजय बघेल हे देखील यावेळी विधानसभेच्या निवडणुका लढवणार आहेत. त्याचवेळी, पक्षाने दिया कुमारी, बाबा बालकनाथ, हंसराज मीना, किरोडीलाल मीणा, भगीरथ चौधरी आणि नरेंद्र कुमार या खासदारांना राजस्थानमध्ये उभे करण्याचा निर्णय घेतला आहे.
टीप : 5 राज्यांमध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकांच्या तारखा जाहीर झाल्या आहेत. निवडणुकीसाठी सर्वच पक्ष आपापले उमेदवार उभे करून निवडणुकीच्या घोषणा देत आहेत. दरम्यान, सी-व्होटरने अनेक मुद्द्यांवर एबीपी न्यूजसाठी सर्वेक्षण केले आहे. या सर्वेक्षणात 2,649 लोकांची मते जाणून घेण्यात आली आहेत. या सर्वेक्षणात 2 हजार 649 लोकांची मते घेण्यात आली आहेत. शनिवार (14 ऑक्टोबर) ते रविवार (15 ऑक्टोबर) दुपारपर्यंत हे सर्वेक्षण करण्यात आले. सर्वेक्षणातील त्रुटीचे मार्जिन प्लस मायनस 3 ते प्लस मायनस 5 टक्के आहे.
हेही वाचा :