पंतप्रधान मोदींच्या अमेरिका दौऱ्यामुळे भारतीय वारसा अन् संस्कृतीला जागतिक स्तरावर चालना मिळणार? सर्वेक्षणातून काय आलं समोर?
ABP C Voter Survey: पंतप्रधान मोदींच्या अमेरिका दौऱ्यामुळे भारतीय संस्कृती आणि वारसा जागतिक स्तरावर विस्तारलाय? या प्रश्नासंदर्भात सी-व्होटरनं एबीपी न्यूजसाठी सर्वेक्षण केलं आहे.
ABP C Voter Survey: पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी अमेरिकेच्या दौऱ्यात अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडन आणि अनेक कंपन्यांच्या सीईओंची भेट घेतली. यावेळी पंतप्रधान मोदींनी अमेरिकेत वास्तव्य करणाऱ्या भारतीय वंशांच्या लोकांना संबोधित केलं. अमेरिका दौरा आटोपून पंतप्रधान मोदी शनिवारी (24 जून) इजिप्तला पोहोचले. दरम्यान, सी-व्होटरनं एबीपी न्यूजसाठी मोदींच्या अमेरिका दौऱ्याबाबत सर्वेक्षण केलं आहे.
सर्वेक्षणात लोकांना मोदींच्या अमेरिका दौऱ्याबाबत प्रश्न विचारण्यात आले. मोदींच्या अमेरिका दौऱ्यामुळे भारतीय संस्कृती आणि वारसा जागतिक स्तरावर वाढवण्यास मदत होणार का? असा प्रश्न सर्वेक्षणातून लोकांना विचारण्यात आला. यावर 71 टक्के लोकांनी होय असं उत्तर दिलं, तर 24 टक्के लोकांनी नाही, असं उत्तर दिलं. सर्वेक्षणात 5 टक्के लोकांनी यावर माहिती नाही, असं उत्तर दिलं.
पंतप्रधान मोदींनी अमेरिकेत काय म्हटलं?
अमेरिकेच्या पहिल्या अधिकृत दौऱ्याचा समारोप करताना पंतप्रधान मोदी म्हणाले की, भारत-अमेरिका संबंधांचा एक नवा, गौरवशाली प्रवास सुरू झाला आहे आणि दोन महान लोकशाही त्यांच्यातील संबंध दृढ करताना जग पाहत आहे.
वॉशिंग्टनमधील रोनाल्ड रीगन बिल्डिंग अँड इंटरनॅशनल ट्रेड सेंटर येथे भारतीय समुदायाच्या सदस्यांना संबोधित करताना मोदी म्हणाले की, भारत-अमेरिका भागीदारीची पूर्ण क्षमता अजून लक्षात येणं बाकी आहे आणि दोन्ही देशांमधील 21व्या शतकातील संबंध जगाला पुन्हा चांगलं बनववण्यावर केंद्रीत आहे.
अमेरिका-भारत कराराचा उल्लेख
तंत्रज्ञान हस्तांतरण, उत्पादनाला चालना देणं आणि औद्योगिक पुरवठा साखळी बळकट करणं यावरील करारांचा संदर्भ देत पंतप्रधान मोदी म्हणाले की, दोन्ही देशांनी जागतिक मुद्द्यांवर त्यांच्या दृष्टिकोनात एकसंधता पाहिली आहे आणि 'मेक इन इंडिया आणि मेक फॉर वर्ल्ड' यांच्याशी निगडीत प्रयत्नांना चालना मिळेल.
ते म्हणाले की, भारतीय-अमेरिकन समुदाय दोन्ही देशांमधील संबंधांची खरी क्षमता ओळखण्यात मोठी भूमिका बजावेल आणि भारतात अधिकाधिक गुंतवणूक करण्याची हीच योग्य वेळ आहे. दरम्यान, सर्वेक्षणात तीन दिवसांत 8 हजारांहून अधिक लोकांशी संवाद साधला गेला. सर्वेक्षणात मार्जिन ऑफ एरर प्लस मायनस 3 पासून प्लस मायनस 5 टक्के आहे.
सर्वेक्षणात 8 हजारांहून अधिक लोकांशी बातचित
पंतप्रधान मोदींच्या या अमेरिका दौऱ्याची जगभरात चर्चा होत आहे. याबाबत सी-व्होटर गेल्या तीन दिवसांपासून एबीपी न्यूजसाठी झटपट सर्वेक्षण करत होतं. तीन दिवसांच्या सर्वेक्षणात आठ हजारांहून अधिक लोकांशी बोलून त्यांची मतं जाणून घेण्यात आली. सर्वेक्षणातील मार्जिन ऑफ एरर प्लस मायनस 3 ते प्लस मायनस 5 टक्के आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या :
एलॉन मस्क यांनी पंतप्रधान मोदींचं कौतुक करण्यामागचा हेतू काय? सर्वेक्षणाचा धक्कादायक निष्कर्ष