Fraud Case : तामिळनाडूमध्ये ठेवीदारांची तब्बल 870 कोटींची फसवणूक; कंपनीच्या 2 संचालकांना 27 वर्षांची शिक्षा
Tamilnadu Fraud Case : अधिक परताव्याच्या खोट्या आश्वासनावर ठेवी गोळा करून 870.10 कोटी रुपयांची अंदाजे फसवणूक केल्याचा आरोप आहे
Tamilnadu Fraud Case : तामिळनाडूतील कोईम्बतूर येथील न्यायालयाने पाझी मार्केटिंग कंपनीच्या दोन संचालकांना 27 वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली आणि 171.74 कोटी रुपयांचा दंड ठोठावला. सार्वजनिक ठेवीदारांची 870.1 कोटी रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी ही शिक्षा करण्यात आली आहे.
171.74 कोटी रुपयांचा दंड
सीबीआयने एका पत्रकार परिषदेत म्हटले की, न्यायालयाने के मोहनराज आणि कमलवल्ली या दोन्ही खाजगी कंपन्यांच्या संचालकांना सत्तावीस वर्षांच्या सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली आणि 171.74 कोटी रुपयांचा दंड ठोठावला. Pazzi Forex Trading India Pvt Ltd, Pazzi Trading Inc. आणि पाझी मार्केटिंग कंपनी या तीन खाजगी कंपन्यांच्या माध्यामातून कोट्यवधी रुपये उकळल्याचा आरोप आहे.
870.10 कोटी रुपयांची फसवणूक केल्याचा आरोप
एजन्सीने सांगितले की, हे प्रकरण सार्वजनिक ठेवीदारांकडून 870.10 कोटी रुपयांच्या फसवणुकीशी संबंधित दोषांपैकी एक आहे. एकूण 171.74 कोटी रुपये दंड आहे. मद्रास उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार सीबीआयने 15 जून 2011 रोजी आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला होता. के मोहनराज, कंपनीचे संचालक आणि इतर खाजगी कंपन्यांद्वारे चालवल्या जाणार्या पाजी मार्केटिंग कंपनी, तिरुपूर यांनी जुलै 2008 ते सप्टेंबर 2009 या कालावधीत विविध योजना आखल्या आणि विविध ठेवीदारांकडून अधिक परताव्याच्या खोट्या आश्वासनावर ठेवी गोळा करून 870.10 कोटी रुपयांची अंदाजे फसवणूक केल्याचा आरोप आहे. असे निवेदनात म्हटले आहे.
कंपनीच्या 2 संचालकांना 27 वर्षांची शिक्षा
www.paazeemarketing.com या वेबसाईटद्वारे कंपन्यांच्या संचालकांसह आरोपींनी ग्राहकांच्या ठेवी आणि गुंतवणूक विदेशी मुद्रा व्यापार व्यवसायात वापरण्यात येईल, असे आश्वासन देऊन फसवणूक केल्याचा आरोप पुढे करण्यात आला. फार कमी कालावधीत जमा केलेल्या ठेवीवर खूप मोठा लाभ तसेच व्याज दिले जाईल असे वचन आरोपीने दिले. आरोपींनी विविध बँकांचे पोस्ट-डेट चेक जारी केले. ज्यात आरोपींनी Pazzi Forex Trading India Pvt Ltd, Pazzi Trading Inc. आणि Pazzi Marketing Company यांच्या नावे खाती उघडली. सखोल तपासानंतर 7 ऑक्टोबर 2011 रोजी आरोपीविरुद्ध आरोपपत्र दाखल करण्यात आले. ट्रायल कोर्टाने दोन आरोपी आणि तीन कंपन्यांना दोषी ठरवले.
इतर महत्वाच्या बातम्या
Mumbai Traffic Police : चिंतामणी गणपतीच्या आगमनासाठी मुंबईच्या वाहतूक व्यवस्थेत बदल, जाणून घ्या पर्यायी मार्ग
Kerala High Court : राज्यातील अवैध धार्मिक स्थळे बंद करा, उच्च न्यायालयाचे आदेश; काय म्हटले कोर्टाने..