वृद्धाचा व्हिडीओ व्हायरल झाला अन् 'बाबा का ढाबा' वर तुफान गर्दी! अभिनेत्री स्वरा भास्करचंही ट्वीट
दिल्लीतील एका वृद्ध जोडप्याचा व्हिडीओ व्हायरल झाला आणि त्यांच्या 'बाबा का ढाबा' वर तुफान गर्दी झाली. नाईलाजाने या जोडप्याला ढाबा बंद करावा लागला आहे. ट्विटरवर #BabaKaDhaba टॉप ट्रेंड करत आहे.
मालवीय नगर (दिल्ली) : मध्ये एक वयस्कर माणूस आपल्या बायकोसह ढाबा चालवतो, ज्याचे नाव 'बाबा का ढाबा' आहे. परंतु, लॉकडाउननंतर त्याच्या ढाब्यावर कोणीही जेवायला जात नव्हते. एक युट्युबर त्यांच्या छोट्या ढाब्यावर पोहचला, तेव्हा आपली कहाणी सांगताना त्यांना रडू कोसळलं. त्यांचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आणि देशातील बरेच लोक त्यांच्या मदतीसाठी पुढे आले. अभिनेत्री स्वरा भास्कर आणि रविना टंडन यांनीही हा व्हिडीओ ट्वीट केला आहे.
यामध्ये मोठ्या नावांचाही समावेश आहे. व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर काही तासांनंतर, त्यांच्या ढाब्यासमोर लांबच लांब रांग लागली होती. गर्दी पाहून वृद्ध जोडप्याच्या चेहऱ्यावर हास्य उमटले. ट्विटरवर #BabaKaDhaba टॉप ट्रेंड करत आहे. दिल्लीतील लोक त्याच्या दुकानात पोहोचून मदत करत आहेत. ढाब्यावर इतकी गर्दी झाली की नंतर त्यांना ढाबा बंद करावा लागला.
यूट्यूबर गौरव वासनने या वृद्ध जोडप्याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला. हा व्हिडिओ त्याच्या चॅनलवर 'स्वॉद ऑफिशियल' वर 6 ऑक्टोबरला अपलोड करण्यात आला आहे. तिथून तो जास्त प्रमाणात व्हायरल झाला. ट्विटरवर हा व्हिडिओ वसुंधरा नावाच्या वापरकर्त्याने 7 ऑक्टोबरलाही शेअर केला होता. तिथून हा व्हिडिओ ट्विटरवर व्हायरल झाला.
Wooohoooo! ???????????????? Twitter can do good too! ???????????????????????????????????????????????? #BabaKaDhaba #MalviyaNagar https://t.co/yyJNbJwGhy
— Swara Bhasker (@ReallySwara) October 8, 2020
लोकांची मदतीसाठी धाव हा व्हिडिओ व्हायरल होताच देशभरातील लोक मदतीसाठी पुढे आले आहेत. बरेच लोक जेणवासाठी बाबांच्या ढाब्यावरही पोहोचले आहेत. दिल्ली कॅपिटल्सने ट्विटरवर व्हिडिओ शेअर करताना लिहिले आहे की, 'कठीण काळ चालला आहे, पण दिल्लीचं हृदय आजही उदाहरण आहे? दिल्लीकर, आमच्या स्थानिक व्यवसायाला आत्ता आपल्या मदतीची आवश्यकता आहे. उद्यापासून या अश्रूंना आनंदाच्या अश्रूंमध्ये बदलूया. मालवीय नगरातील बाबांच्या ढाब्यावर जा.
काय आहे ढाबा उघडण्याचे कारण? कांता प्रसाद आणि बदामी देवी यांनी बर्याच वर्षांपासून मालवीय नगरमध्ये स्वतःचे एक छोटे दुकान लावत होते. दोघांचेही वय 80 वर्षांपेक्षा जास्त आहे. कांता प्रसाद म्हणतात की त्यांना दोन मुले आणि एक मुलगी आहे. पण तिघांपैकी कोणीही त्यांना मदत केली नाही. ते सर्व कामे स्वत: करतात आणि एकट्याने ढाबा देखील चालवतात.
Unlock 5.0 | लॉकडाऊननंतर पुणे-मुंबई रेल्वे रुळावर; कधी आणि कोणती धावणार?