एक्स्प्लोर
युवराजच्या घराचं गेट कोसळून 8 वर्षीय बालकाचा मृत्यू
नवी दिल्ली : टीम इंडियाचा अष्टपैलू क्रिकेटपटू युवराज सिंगच्या चंदिगढमधील घरात एक दुर्घटना घडल्याचं समोर आलं आहे. घरातील दुरुस्तीच्या वेळी एक भक्कम गेट अंगावर कोसळून 8 वर्षीय बालकाचा मृत्यू झाल्याची माहिती आहे.
चंदिगढच्या पंचकुला भागातील हे घर युवराजची आई शबनम सिंह यांच्या नावावर आहे. या घरात गेल्या काही महिन्यांपासून दुरुस्ती सुरु आहे. यावेळी कुलदीप नावाचा 8 वर्षांचा मुलगा वडिलांसोबत तिथे आला होता. त्यानंतर पाणी पिण्यासाठी तो मामाबरोबर एका नळाजवळ गेला.
खेळता-खेळता तिथे असलेल्या एक गेटलाही त्याने हात लावला. दुर्दैवाने त्याच वेळी हे गेट त्याच्या अंगावर पडलं. कुलदीपच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली आणि तो रक्तबंबाळ झाला. त्याला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं.
अपघाताच्या वेळी युवराज आणि त्याची आई दोघंही गुरुग्राममधील निवासस्थानी होते. पोलिस सध्या या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
निवडणूक
पुणे
विश्व
Advertisement