Reliance Jio 5G : रिलायन्स जिओची 5G सेवा 15 ऑगस्टला लॉन्च होणार?
Reliance Jio 5G : रिलायन्स जिओ 15 ऑगस्ट 2022 रोजी आपली 5G मोबाइल सेवा लॉन्च करू शकतो. 5G स्पेक्ट्रम मिळालेल्या सर्व टेलिकॉम कंपन्यांपैकी रिलायन्स जिओ प्रथम 5G मोबाइल सेवा सुरू करण्याची तयारी करत आहे.
Reliance Jio 5G : 5G स्पेक्ट्रम लिलावातील सर्व 22 दूरसंचार मंडळांसाठी बोली लावणारा रिलायन्स जिओ 15 ऑगस्ट 2022 रोजी आपली 5G मोबाइल सेवा लॉन्च करू शकतो. 5G स्पेक्ट्रम मिळालेल्या सर्व टेलिकॉम कंपन्यांपैकी रिलायन्स जिओ प्रथम 5G मोबाइल सेवा सुरू करण्याची तयारी करत आहे.
रिलायन्स इन्फोकॉमचे चेअरमन आकाश अंबानी म्हणाले होते की, संपूर्ण भारतात 5G मोबाइल सेवा सुरू केल्याने आझादीचा अमृत महोत्सव साजरा केला जाणार आहे. रिलायन्स जिओ जागतिक दर्जाची परवडणारी 5G ची सक्षम सेवा देणार आहे. अशा प्रदान करणार आहोत जे शिक्षण, आरोग्य, कृषी, उत्पादन आणि ई-गव्हर्नन्स क्षेत्रातील डिजिटल क्रांतीला गती देण्यासाठी काम करतील. रिलायन्स जिओने आपल्या निवेदनात म्हटले आहे की, जिओ कमीत कमी कालावधीत 5G मोबाइल सेवा आणणार आहे.
1 ऑगस्ट रोजी 5 जी स्पेक्ट्रमचा लिलाव संपला. 5 जी स्पेक्ट्रमच्या लिलावातून केंद्र सरकारला तब्बल दीड लाख कोटी रूपयांचा महसूल मिळला आहे. 40 व्या फेरीनंतर 5 जी स्पेक्ट्रमचा लिलाव संपला. एअरटेल आणि जिओ या दूरसंचार कंपन्या आता संपूर्ण देशभर 5 जीचे जाळे पसरवणार आहेत. सात दिवस हा लिलाव चालला होता.
भारती एअरटेल आणि रिलायन्स जिओ संपूर्ण देशात 5जीचं जाळं पसरवणार असून व्होडाफोन-आयडियाकडून काही मोजक्या सर्कलमध्ये लिलावास पसंती देण्यात आली. अदानी डाटाकडून 26 MHz स्पेक्ट्रममध्ये अधिक रुची घेत नेटवर्कचे जाळे पसरवणार आहेत.
दरम्यन, भारती एअरटेल देखील ऑगस्ट 2022 मध्ये 5G सेवा सुरु करणार आहे. त्यासाठी एअरटेल कंपनीने एरिक्सन, नोकिया, सॅमसंगसोबत आज करार केला. त्याअंतर्गत या महिन्यात उपकरणांची तैनाती सुरू केली जाणार आहे. नुकताच 5G चा झालेला लिलावात एअरटेलने बाजी मारली होती. भारती एअरटेलने 43,084 कोटी रुपयांची स्पेक्ट्रम खरेदी केली होती. सुनील मित्तल यांच्या नेतृत्वातील कंपनीने नुकतेच 900 मेगाहर्ट्ज, 1800 मेगाहर्ट्ज, 2100 मेगाहर्ट्ज, 3300 मेगाहर्ट्ज आणि 26 गीगाहर्ट्ज बँडमध्ये 19,867.8 मेगाहर्ट्ज स्पेक्ट्रम मिळवले आहे.