5G Service : भारतात ऑक्टोबरपासून 5G सेवा सुरु होणार, केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांची माहिती
5G Service : देशभरात 12 ऑक्टोबरपर्यंत 5G सेवा सुरु करण्यात येणार आहे, असे अश्विनी वैष्णव यांनी गुरुवारी सांगितलं.
5G Service : नुकताच 5 जी स्पेक्ट्रमचा लिलाव पार पडला, यामधून सरकारनं दीड लाख कोटींचा महसूल गोळा केला आहे. लिलावानंतर 5G सेवा कधी सुरु होणार? याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. केंद्रीय तंत्रज्ञान आणि दूरसंचार मंत्री अश्विनी वैष्णव यांनी याबाबतच उत्तर दिलं आहे. देशभरात 12 ऑक्टोबरपर्यंत 5G सेवा सुरु करण्यात येणार आहे, असे अश्विनी वैष्णव यांनी गुरुवारी सांगितलं. 5G सेवा सुरु झाल्यानंतर त्याचा देशभरात टप्या टप्यानं विस्तार करण्यात येणार आहे, असेही वैष्णव म्हणाले.
पुढील दोन ते तीन वर्षांमद्ये देशभरात 5G सेवा पोहचण्याचं आमचं ध्येय आहे. 5G सेवा सर्वसामान्यांना परवडणारी असेल, याचीही आम्ही खात्री करू. त्यासाठी शहरी आणि ग्रामीण या दोन्ही भागांकडे आम्ही लक्ष देत आहोत, असेही अश्विनी वैष्णव म्हणाले.
5G सेवा सुरु करण्यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत. दूरसंचार ऑपरेटर त्या दृष्टीने काम करत आहेत. इन्स्टॉलेशनचं काम पूर्ण झालं आहे. 12 ऑक्टोबरपर्यंत 5G सेवा सुरु होईल, असा अंदाज आहे. त्यानंतर टप्या टप्यानं शहरी आणि ग्रामीण भागामध्ये 5G सेवाचा विस्तार करण्यात येईल. 5G सेवा सर्वसामान्यांनाही परवडणाऱ्या किमतीमध्ये असेल, याची काळजी घेणार आहोत, असे अश्विनी वैष्णव म्हणाले.
भारतातील टेलिकॉम क्षेत्रात आगामी काळात मोठे बदल घडणार आहेत. केंद्र सरकारकडून यासाठी प्रयत्न सुरु आहेत. भारतीय टेलिकॉम क्षेत्राला जागतिक पातळीवर जोडण्याचा केंद्र सरकारचा प्रयत्न आहे. भारतील टेलिकॉम क्षेत्राचा ग्लोबल बेंचमार्कसोबत ताळमेळ बसवण्यासाठी सरकारचा प्रयत्न असल्याचं अश्विनी वैष्णव यांनी सांगितलं.
या 13 शहरात सर्वात आधी 5G सेवा सुरु होणार -
दूरसंचार विभागाच्या (DoT) माहितीनुसार, देशभरात 13 शहरात सर्वात आधी 5G सेवा उपलब्ध होणार आहे. या 13 शहरांमध्ये अहमदाबाद, बेंगळुरु(Ahmedabad, Bengaluru), चंडीगढ, चेन्नई, दिल्ली, गांधीनगर, गुरुग्राम, हैदराबाद, जामनगर, कोलकाता, लखनऊ, मुंबई आणि पुणे (Mumbai, Pune) या शहरांचा समावेश आहे. दरम्यान, देशात सर्वात आधी कोणती टेलिकॉम कंपनी कमर्शिअल पद्धतीने 5G सेवा सुरु करेल, याबाबत अद्याप ठोसपणे सांगणे कठीण आहे. जिओ, एअरटेल अथवा व्होडाफोन-आयडिया यापैकी कोणतीही कंपनी असू शकते.
आणखी वाचा :
Mumbai Pune Express Way : पुणे-मुंबई एक्सप्रेस वेवर शुक्रवारी दोन तासांचा ब्लॉक, आयटीएमएस प्रकल्प राबवण्यास होणार सुरुवात
Monsoon Session : नगराध्यक्ष थेट जनतेतून, औरंगाबादचं नामांतर ते पोलीस भरती, पावसाळी अधिवेशनात घेतलेले महत्वाचे निर्णय एका क्लिकवर