एक्स्प्लोर

नोटाबंदीनंतर 5800 कंपन्यांनी काळा पैसा पांढरा करुन घेतला

13 बँकांनी 13 हजारपेक्षा जास्त बँक खात्यांचे डिटेल केंद्र सरकारला दिले आहे. ज्यातून जवळपास 5800 कंपन्यांनी नोटाबंदीदरम्यान 4.5 हजार कोटी काळा पैसा पांढरा करुन घेतल्याचं समोर आलं आहे

नवी दिल्ली : एकीकडे नोटाबंदी आणि जीएसटीवरुन पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका होत आहे. दुसरीकडे त्यांच्या काळापैशांविरोधी मोहीमेवरुन आता एक मोठा खुलासा झाला आहे. या नव्या खुलाशानुसार, 13 बँकांनी 13 हजारपेक्षा जास्त बँक खात्यांचे डिटेल केंद्र सरकारला दिले आहे. ज्यातून जवळपास 5800 कंपन्यांनी नोटाबंदीदरम्यान 4.5 हजार कोटी काळा पैसा पांढरा करुन घेतल्याचं समोर आलं आहे. काळा पैसा बाहेर काढण्यासाठी नोटाबंदीचा निर्णय घेण्यात आल्याचं वारंवार सांगण्यात येतं. या निर्णयानंतर रिझर्व बँकेकडे परत आलेल्या जुन्या पैशांची मोजणी केल्यानंतर, जवळपास 99 टक्के जुन्या नोटा परत आल्याचं जाहीर करण्यात आलं. यावरुनही केंद्र सरकारवर टीकेची झोड उठवण्यात आली होती. त्यातच आज जे लोक पंतप्रधान मोदींची आलोचना करत आहेत, त्यांनीही नोटाबंदीचा निर्णय चुकल्याचं वारंवार सांगितलं आहे. पण नोटाबंदीनंतर काळापैसा पांढरा करण्याचा उद्योग कसा सुरु होता? याबाबत धक्कादायक माहिती समोर आली आहे. नोटाबंदीदरम्यान, अनेक बोगस कंपन्यांमार्फत काळा पैसा पांढरा करुन घेतला जात असल्याची चर्चा होती. त्याला आता बळकटी मिळत आहे. बँकांनी सादर केलेल्या माहितीनुसार, नोटाबंदीदरम्यान,  2 लाख 9 हजार कंपन्यांच्या बँक खात्यांमधून संशयास्पद व्यवहार सुरु होते. सध्या या सर्व खात्यांवर बंदी घालण्यात आली असून, सरकारनेही बँकांकडून खातेदारांचे डिटेल मागवले आहेत. त्यातील, पहिल्या टप्प्यात 13 बँकांनी जवळपास 13 हजार 140 खातेदारांचे डिटेल सरकारला दिले आहेत. या माहितीनुसार, नोटाबंदीनंतर ज्या 2 लाख बोगस कंपन्यांचं रजिस्ट्रेशन रद्द करण्यात आलं, त्यातील 5800 कंपन्यांच्या बँक खात्यांचे डिटेल समोर आले आहेत. या 5800 कंपन्यांच्या माध्यमातून एकूण 13 हजार 140 बँक खाती उघडण्यात आली. नोटाबंदीच्या निर्णयाच्या घोषणेनंतर, या कंपन्यांकडे 22 कोटी रुपये होते. यातील 4 हजार 573 कोटी रुपये बँक खात्यांवर जमा होते. नंतर यातील 4 हजार 552 कोटी रुपये खात्यातून काढून घेण्यात आली. बँकांनी दिलेल्या माहितीनुसार, यातील 429 खाती अशीही होती, ज्या खात्यांमध्ये नोटाबंदीपूर्वी 50 पैसे देखील जमा नव्हती. पण त्याच खात्यांमध्ये नोटाबंदीनंतर तब्बल 11 कोटी रुपये जमा झाले. यानंतर केवळ 42 हजार रुपये खात्यांवर ठेवून, पैसे पुन्हा खात्यातून काढले. बोगस कंपन्यांच्या माध्यमातून हा खेळ अशा प्रकारे चालू होता, ज्याची कुणकुण रजिस्ट्रार ऑफ कंपनीजलाही लागली नाही. नोटाबंदीनंतर काळा पैसा पांढरा करण्यासाठी असे षडयंत्र रचले गेले, की एका-एका कंपन्यांनी 100-100 खाती उघडली होती. सध्या सरकारने या कंपन्यांची नावं जाहीर केली नसली, तरी काही अशा कंपन्यांची ओळख पटली आहे, ज्या कंपन्यांनी 2 हजार 134 बँक खाती उघडली होती. तर काही अशा कंपन्यांचाही छडा लागला आहे, ज्याने जवळपास 300 ते 900 बँक खाती उघडली होती. त्यामुळे कोणत्याही कंपनीला एवढ्या मोठ्या प्रमाणात बँक खाती उघडण्याची गरज का भासली? हा प्रश्न उपस्थित होत आहे.

महत्त्वाच्या बातम्या

जगातील सगळ्यात हलकं हेल्मेट! वजन फक्त 1050 ग्रॅम, सुरक्षेच्या बाबतीत मजबूत, शानदार कार्यक्रमात अनावरण
जगातील सगळ्यात हलकं हेल्मेट! वजन फक्त 1050 ग्रॅम, सुरक्षेच्या बाबतीत मजबूत, शानदार कार्यक्रमात अनावरण
वारसा हक्क ते गुंतवणूक! भारतीय महिला बनणार 73 लाख कोटी रुपयांच्या मालक, अहवालातून महत्वाची माहिती समोर
वारसा हक्क ते गुंतवणूक! भारतीय महिला बनणार 73 लाख कोटी रुपयांच्या मालक, अहवालातून महत्वाची माहिती समोर
सुप्रीम कोर्टात वकिलांनी आज कळस चढवला; शिवसेना पक्ष अन् चिन्हाबाबत सुनावणी, अरविंद सावंतांना मोठा विश्वास
सुप्रीम कोर्टात वकिलांनी आज कळस चढवला; शिवसेना पक्ष अन् चिन्हाबाबत सुनावणी, अरविंद सावंतांना मोठा विश्वास
साखरेच्या दरानं चिंता वाढवली! 10 वर्षानंतर प्रथमच भारत सरकार घेणार मोठा निर्णय, देशात सध्या किती साखर शिल्लक? 
साखरेच्या दरानं चिंता वाढवली! 10 वर्षानंतर प्रथमच भारत सरकार घेणार मोठा निर्णय, देशात सध्या किती साखर शिल्लक? 

व्हिडीओ

Vande Mataram Special Report : वंदे मातारमबाबत काँग्रेसचा ठराव, अमित शाहांचा हल्लाबोल
Sinhagad Fort 'किल्ले सिंहगड' ॲप नोंदणी द्वारेच मिळणार गडावर प्रवेश; एआय कॅमेऱ्यांची राहणार करडी नजर
Pawar Family Special Report : बारामतीकडे लक्ष द्या, बारामतीकरांनी थेट लिहलं पवार कुटुंबाला पत्र
Shiv Sena Hearing Special Report : राहुल नार्वेकरांच्या निर्णयावर आक्षेप, ठाकरेंच्या नेत्यांचा हल्लाबोल
Shiv Sena Hearing : तर धनुष्यबाण चिन्ह गोठवा, ठाकरेंची मागणी | Special Report ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Burger : अंधेरीतील 'जिमीज बर्गर'मध्ये धक्कादायक प्रकार; बर्गरमध्ये आढळला काचेचा तुकडा, ग्राहकाची तुकाराम मुंढेंच्या FDA कडे तक्रार
Burger : अंधेरीतील 'जिमीज बर्गर'मध्ये धक्कादायक प्रकार; बर्गरमध्ये आढळला काचेचा तुकडा, ग्राहकाची तुकाराम मुंढेंच्या FDA कडे तक्रार
मुक्ताईनगरमध्ये एकनाथ खडसेंचा सत्कार, मुख्यमंत्री फडणवीसांसह दिग्गजांची उपस्थिती; अरुणभाईंनी दिली माहिती
मुक्ताईनगरमध्ये एकनाथ खडसेंचा सत्कार, मुख्यमंत्री फडणवीसांसह दिग्गजांची उपस्थिती; अरुणभाईंनी दिली माहिती
भंगारवाल्याकडून 30 हजारांची लाच घेताना पोलीस हवालदारास बेड्या; एसीबीने रंगेहात पकडलं
भंगारवाल्याकडून 30 हजारांची लाच घेताना पोलीस हवालदारास बेड्या; एसीबीने रंगेहात पकडलं
Nashik Crime News : एकाच अपार्टमेंटमध्ये शेजारी, विवाहितांच्या प्रेमसंबंधात ठिणगी; दारू पिऊन प्रियकराने 34 वर्षीय मैत्रिणीला रिसॉर्टच्या दारातच चिरडले, नेमकं काय घडलं?
एकाच अपार्टमेंटमध्ये शेजारी, विवाहितांच्या प्रेमसंबंधात ठिणगी; दारू पिऊन प्रियकराने 34 वर्षीय मैत्रिणीला रिसॉर्टच्या दारातच चिरडले, नेमकं काय घडलं?
जंतर मंतर आंदोलनात पोलिसी बळाचा वापर, आरोपांची चौकशी करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाकडून चौकशी समिती स्थापन; माजी न्यायमूर्तींची अध्यक्षपदी नियुक्ती
जंतर मंतर आंदोलनात पोलिसी बळाचा वापर, आरोपांची चौकशी करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाकडून चौकशी समिती स्थापन; माजी न्यायमूर्तींची अध्यक्षपदी नियुक्ती
साखरेच्या इतिहासात आत्तापर्यंतची सर्वात मोठी दरवाढ, 65 वरुन 80 रुपयांवर उसळी, ग्राहकांच्या खिशाला मोठी झळ
साखरेच्या इतिहासात आत्तापर्यंतची सर्वात मोठी दरवाढ, 65 वरुन 80 रुपयांवर उसळी, ग्राहकांच्या खिशाला मोठी झळ
Ind vs Eng : तेच मैदान, तेच ठिकाण, तोच संघ; लंडनमधील लॉर्डमध्ये पु्न्हा एकदा टी-शर्ट काढून सेलिब्रेशन, टीम इंडियाकडून इंग्लंडचा धुव्वा
Video: तेच मैदान, तेच ठिकाण, तोच संघ; लंडनमधील लॉर्डमध्ये पु्न्हा एकदा टी-शर्ट काढून सेलिब्रेशन, टीम इंडियाकडून इंग्लंडचा धुव्वा

Embed widget