एक्स्प्लोर
जम्मू-काश्मीरच्या कूपवाड्यात 5 दहशतवाद्यांना कंठस्नान
कूपवाडा : काश्मीरच्या कूपवाडा जिल्ह्यात भारतीय जवानांनी 5 दहशतवाद्यांचा खात्मा केला आहे. दहशतवाद्यांकडील 5 बंदुकाही जवानांनी जप्त केल्या आहेत.
कुपवाड्यातल्या डरुगमुल्ला गावात दहशतवादी लपून बसल्याची माहिती जवानांना मिळाली, त्यानंतर जवानांनी खास ऑपरेशन राबवत या संपूर्ण परिसराला घेरलं. यावेळी दहशतवाद्यांनी भारतीय जवानांवर गोळीबार केला. या गोळीबाराला जवानांनी चोख प्रत्युत्तर देत 5 दहशतवाद्यांना कंठस्नान घातलं.
या गोळीबारात 2 जवान जखमी झाल्याची माहिती आहे, त्यांना हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे. सध्या भारतीय जवानांकडून सर्च ऑपरेशन सुरु आहे. दहशतवाद्यांकडील 5 बंदुकाहीजवानांनी जप्त केल्या आहेत.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
पुणे
विश्व
छत्रपती संभाजी नगर
Advertisement