एक्स्प्लोर
नोटाबंदीच्या निर्णयानंतर 48 तासात 4 टन सोन्याची विक्री
मुंबई : नोटाबंदीचा निर्णय जाहीर होताच केवळ 48 तासात 4 टन सोनं विक्री झाल्याची माहिती पुढे आलीय. केंद्रीय अबकारी गुप्तचर विभागाने एका सर्व्हेतून ही माहिती दिली आहे. 4 टन म्हणजेच तब्बल 1250 कोटी रुपये किमतीचं सोन अवघ्या 48 तासात विकलं गेल्याने आश्चर्य व्यक्त होतंय.
नोटाबंदीचा निर्णय जाहीर झाल्यानंतर 8 नोव्हेंबरला तब्बल 2 टन सोन्याची विक्री झाल्याचं सर्वेक्षणात म्हटलंय. यामध्ये जुन्या नोटा खपवण्यासाठी सोन्याची एवढी मोठी खरेदी केल्याचा अंदाज व्यक्त केला जातोय.
दिल्लीतील एका प्रसिद्ध ज्वेलरने 8 नोव्हेंबरला 700 जणांना 45 किलो सोन्याची विक्री केली. एक दिवस आधी म्हणजे 7 नोव्हेंबरला याच ज्वेलरकडून केवळ 820 ग्रॅम सोन्याची खरेदी करण्यात आली होती.
केंद्रीय अबकारी गुप्तचर विभागाच्या सर्वेनुसार चेन्नईतील ललिता ज्वेलर्सने 8 नोव्हेंबरला 200 किलो सोन्याची विक्री केली. तर एक दिवस आधी केवळ 40 किलो सोन्याची विक्री करण्यात आली होती.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
निवडणूक
पुणे
विश्व
Advertisement