एक्स्प्लोर
Advertisement
जीएसटीमधून 28 टक्क्यांचा स्लॅब काढणार : अरुण जेटली
अरुण जेटली यांनी ' जीएसटीचे 18 महिने' या मथळ्याखाली लिहिलेल्या लेखात ही माहिती त्यांनी दिली. सध्या 5, 12, 18, 28 टक्के अशा चार स्लॅबमध्ये जीएसटी आकारला जातो. यातून 28 टक्क्यांचा स्लॅब काढला जाईल.
नवी दिल्ली : जीएसटीमधील 28 टक्क्यांचा स्लॅब लवकरच काढण्यात येणार असल्याची महत्वपूर्ण माहिती केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी दिली आहे. त्याशिवाय सर्व वस्तूंवर समान कर आकारला जाईल असे संकेतही त्यांनी दिले. जीएसटीमध्ये 12 आणि 18 टक्के या स्लॅबमध्ये 15 टक्केचा स्लॅब आणुन सुवर्णमध्य साधला जाईल अशी शक्यता आहे.
अरुण जेटली यांनी ' जीएसटीचे 18 महिने' या मथळ्याखाली लिहिलेल्या लेखात ही माहिती दिली. सध्या 5, 12, 18, 28 टक्के अशा चार स्लॅबमध्ये जीएसटी आकारला जातो. यातून 28 टक्क्यांचा स्लॅब काढला जाईल. एकूण उपयोगाच्या 1216 वस्तूंमधून 183 वस्तूंवर 0 टक्के, 308 वस्तूंवर 5 टक्के, 178 वस्तूंवर 12 टक्के आणि 517 वस्तूंवर 18 टक्के जीएसटी आकारली जातो. सिमेंट आणि वाहनांसोबत 26 वस्तूंवर 28 टक्क्यांचा कर लागतो.
नुकत्याच झालेल्या जीएसटी परिषदेत 28 टक्क्यांच्या स्लॅबमधून 23 वस्तू वगळण्यात आल्या आहेत. आलिशान गाड्या, एसी, मोठे टीव्ही, डीश वॉशर यासारख्या वस्तूंवरील कर 28 टक्क्यांवरुन 18 टक्के करण्यात आला आहे. आता लवकरच सिमेंटवरील कर कमी करण्यात येऊन सर्वसामान्यांना दिलासा देण्याचा सरकारचा प्रयत्न असेल, अशी माहिती जेटलींनी दिली.
जीएसटीच्या मुद्द्यावर बोलताना अरुण जेटलींनी काँग्रेसवर जोरदार हल्लबोल केला. ते म्हणाले, काँग्रेसच्या काळात अनेक वस्तूंवर 31 टक्क्यांपर्यंत कर आकारला जात होता. लोकांकडे फक्त दोनचं पर्याय होते, एकतर कर भरा किंवा चोरी करा, म्हणून त्यावेळी मोठ्याप्रमाणात चोरी होत होती.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
परभणी
भारत
करमणूक
Advertisement