Pulwama terror attack: पुलवामा हल्ल्याला दोन वर्षे पूर्ण, देशभर शहीदांना श्रद्धांजली
पुलवामा हल्ल्याला (Pulwama terror attack) दोन वर्षे पूर्ण झाली असून देशभर शहीदांना श्रद्धांजली वाहिली जात आहे. पुलवामा हल्ल्यात CRPF चे 40 जवान शहीद झाले होते.
नवी दिल्ली: देशाला हादरवून सोडणाऱ्या पुलवामा दहशतवादी हल्ल्याला आज दोन वर्षे पूर्ण झाली. 14 फेब्रुवारी 2019 साली झालेल्या या दहशतवादी हल्ल्यात CRPF चे 40 जवान शहीद झाले होते. देशभर या शहिदांचे स्मरण करण्यात येत असून त्यांना श्रद्धांजली वाहण्यात येत आहे. या 40 शहीदांमध्ये CRPF च्या 76 व्या बटालियनच्या 5 जवानांचा समावेश होता. या सर्व शहीदांना आज CRPF च्या 76 व्या बटालियनने श्रद्धांजली वाहिली.
नवी दिल्ली येथील इन्टिग्रेटेड डिफेन्स स्टाफच्या मुख्यालयात पुलवामा हल्ल्यात शहीदांना श्रद्धांजली वाहण्यात आली. त्यावेळी पाकिस्तानच्या या भ्याड हल्ल्याचा निषेध करण्यात आला. तसेच भारतीय जवानांच्या सर्वोच्च बलिदानाचे स्मरण करण्यात आलं.
On this day, 14 Feb 2019, in one of the most cowardly terror attacks in Pulwama(J&K), the Nation lost 40 Brave Hearts of the CRPF. The Armed Forces and the Nation pays homage to their supreme sacrifice. Jai Hind ???????? pic.twitter.com/yqx7TK0exf — HQ IDS (@HQ_IDS_India) February 14, 2021
जम्मूच्या CRPF च्या 76 व्या बटालियन मुख्यालयात आयोजित कार्यक्रमात या शहीदांना आदरांजली वाहण्यात आली. या बटालियन मधील जवानांनी आपल्या काही खास मित्रांना गमावलंय. त्यामुळे या जवानांचे बलिदान वाया जाऊ न देण्याचा निश्चयही व्यक्त करण्यात आला.
पुलवामा येथे 14 फेब्रुवारी 2019 रोजी सकाळी पाकिस्तानच्या दहशतवाद्यांनी CRPF च्या बसवर हल्ला केला. त्यावेळी त्या बसमधून प्रवास करत असलेले 40 जवान शहीद झाले. या घटनेने संपूर्ण देश हादरला होता. या भ्याड हल्ल्यामागे जैश-ए-मोहम्मद या पाकिस्तानी दहशतवादी संघटनेचा हात असल्याची माहिती आहे. या हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून भारतीय लष्कराने पाकव्याप्त काश्मीरमध्ये सर्जिकल स्ट्राइक केला होता.
गेल्या वर्षीच्या या हल्ल्यानंतर जम्मू आणि काश्मीरमध्ये 375 दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात आल्याची माहिती CRPF ने दिली आहे.
पुलवामा हल्ला पाकिस्तान सरकारने घडवला, पाकिस्तानच्या संसदेत मंत्री फवाद चौधरींची कबुली