एक्स्प्लोर

मोठी बातमी! 1993 च्या साखळी बॉम्बस्फोटातील मुख्य आरोपी अब्दुल करीम टुंडा निर्दोष, अजमेरच्या टाडा न्यायालयाचा निकाल

1993 Serial Bomb Blast : 1993 च्या साखळी बॉम्बस्फोटातील आरोपी अब्दुल करीम टुंडा याची निर्दोष मुक्तता झाली आहे. राजस्थानमधील अजमेरच्या टाडा कोर्टाने हा निर्णय दिला आहे.

मुंबई : 1993 च्या साखळी बॉम्बस्फोटासंदर्भात (1993 Serial Bomb Blast) एक मोठी बातमी समोर येत आहे. या स्फोटातील मुख्य आरोपी अब्दुल करीम टुंडा (Abdul Karim Tunda) याची न्यायालयाने (Court) निर्दोष मुक्तता केली आहे. राजस्थानमधील अजमेरच्या टाडा कोर्टाने हा निर्णय दिला आहे. बॉम्बस्फोटानंतर तब्बल 31 वर्षांनंतर न्यायालयाच्या निकालाकडे सर्वांचेच लक्ष लागेले होते. आता न्यायालयाने अब्दुल करीम टुंडाची निर्दोष मुक्तता केली आहे. यासह टाडा न्यायालयाने इरफान आणि हमीदुद्दीन यांना दोषी घोषित केले आहे.

1993 मध्ये मुंबई, कानपूर, हैदराबाद, सुरत आणि लखनऊच्या काही ट्रेनमध्ये एकापाठोपाठ एक स्फोट झाले होते. या प्रकरणी अब्दुल करिब टुंडा, इरफान आणि हमीमुद्दीन यांच्यावर गंभीर आरोप करण्यात आले होते. अब्दुल करीम टुंडा याला 2013 मध्ये नेपाळ सीमेवरून पकडण्यात आले होते. सर्व आरोपींविरुद्ध टाडा कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणात आतापर्यंत दीडशेहून अधिक जणांची साक्ष झाली आहे. 

2013 साली टुंडाला अटक

सीबीआयने टुंडाला या बॉम्बस्फोटांचा मास्टरमाइंड मानले होते आणि त्याला 2013 मध्ये नेपाळ सीमेवरून अटक करण्यात आली होती. टुंडावर देशात विविध ठिकाणी दहशतवादाचे खटले प्रलंबित आहेत. टुंडाने तरुणांना भारतात दहशतवादी कारवाया करण्यासाठी प्रशिक्षण दिल्याचा आरोप आहे. जुनैद या पाकिस्तानी नागरिकासह त्याने 1998 मध्ये गणेशोत्सवादरम्यान दहशतवादी हल्ला करण्याची योजना आखल्याचेही बोलले जाते. 

कोण आहे टुंडा? 

मुंबई बॉम्बस्फोटात सहभागी होण्यापूर्वी टुंडाने जलीस अन्सारी सोबत मुंबईतील मुस्लिम समाजासाठी काम करण्याच्या उद्देशाने 'तन्झीम इस्लाह-उल-मुस्लिमीन' या संघटनेची स्थापना केली. मध्य दिल्लीतील दर्यागंजमधील छत्तालाल मियाँ भागात एका गरीब कुटुंबात जन्मलेल्या टुंडाने उत्तर प्रदेशातील गाझियाबादमधील पिलखुआ गावातील बाजार खुर्द भागात आपल्या मूळ गावी सुतार म्हणून काम करायला सुरुवात केली. तो त्याच्या वडिलांना मदत करू लागला. वडिलांच्या मृत्यूनंतर टुंडाने उदरनिर्वाहासाठी भंगाराचे काम सुरू केले आणि कट्टरपंथी जिहादी दहशतवादी बनण्यापूर्वी कपड्यांचा व्यवसायही केला. 80 च्या दशकात तो पाकिस्तानी गुप्तचर संस्था आयएसआयच्या कार्यकर्त्यांच्या माध्यमातून लष्कर-ए-तैयबाच्या संपर्कात आला. टुंडाने मूलतत्त्ववाद स्वीकारला. अब्दुल करीम टुंडा लष्कर-ए-तैयबा या दहशतवादी संघटनेशी संबंधित असल्याचा संशय आहे. टुंडाने पाकिस्तानची गुप्तचर संस्था आयएसआयकडून दहशत पसरवण्याचे प्रशिक्षण घेतल्याचा दावाही केला जात आहे.

इतर महत्वाच्या बातम्या

Mumbai 1993 Bomb Blast : 12 मार्च अन् 12 स्फोट! मुंबईसह देशाला हादरवून टाकणारा तो काळा दिवस... नेमकं काय घडलेलं...

रत्नागिरी सिंधुदुर्गची जागा शिवसेना लढणार, नारायण राणेंना जागा सोडण्यास शिंदेंच्या शिवसेनेचा नकार?

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Virat Kohli IPL 2024 : प्लेऑफमध्ये कोहलीच्या बॅटला लागतो गंज, पाहा आकडेवारी
Virat Kohli IPL 2024 : प्लेऑफमध्ये कोहलीच्या बॅटला लागतो गंज, पाहा आकडेवारी
भारतातील टॉप 10 शहरे; राहणीमानासाठी मुंबई तिसऱ्या स्थानावर, पुण्याचा कितवा नंबर?
भारतातील टॉप 10 शहरे; राहणीमानासाठी मुंबई तिसऱ्या स्थानावर, पुण्याचा कितवा नंबर?
अनाधिकृत 16 पब, 6 बार अन् 10 रुफटॉप सील, पुण्यातील पोर्शे कार अपघातानंतर प्रशासनाची धडक कारवाई 
अनाधिकृत 16 पब, 6 बार अन् 10 रुफटॉप सील, पुण्यातील पोर्शे कार अपघातानंतर प्रशासनाची धडक कारवाई 
भर दुष्काळात मराठवाड्यात आश्वासनांचा पाऊस, मुख्ममंत्री शिंदे आले आणि पुन्हा 14 हजार कोटींच्या घोषणा करून गेले
भर दुष्काळात मराठवाड्यात आश्वासनांचा पाऊस, मुख्ममंत्री शिंदे आले आणि पुन्हा 14 हजार कोटींच्या घोषणा करून गेले
Advertisement
for smartphones
and tablets

व्हिडीओ

Ambadas Danve on Eknath Shinde : टँकरमध्ये पाणू कुठून टाकणार? अजित पवारासारखं आणणार का?TOP 25 : टॉप 25 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 25 न्यूज : 08 PM : 23 May 2024: ABP MajhaABP Majha Headlines : 08 PM : 23 May 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्सNitesh Rane on Pune Case : पुणे प्रकरणावर Supriya Sule गप्प का? नितेश राणे यांचं सूचक वक्तव्य

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Virat Kohli IPL 2024 : प्लेऑफमध्ये कोहलीच्या बॅटला लागतो गंज, पाहा आकडेवारी
Virat Kohli IPL 2024 : प्लेऑफमध्ये कोहलीच्या बॅटला लागतो गंज, पाहा आकडेवारी
भारतातील टॉप 10 शहरे; राहणीमानासाठी मुंबई तिसऱ्या स्थानावर, पुण्याचा कितवा नंबर?
भारतातील टॉप 10 शहरे; राहणीमानासाठी मुंबई तिसऱ्या स्थानावर, पुण्याचा कितवा नंबर?
अनाधिकृत 16 पब, 6 बार अन् 10 रुफटॉप सील, पुण्यातील पोर्शे कार अपघातानंतर प्रशासनाची धडक कारवाई 
अनाधिकृत 16 पब, 6 बार अन् 10 रुफटॉप सील, पुण्यातील पोर्शे कार अपघातानंतर प्रशासनाची धडक कारवाई 
भर दुष्काळात मराठवाड्यात आश्वासनांचा पाऊस, मुख्ममंत्री शिंदे आले आणि पुन्हा 14 हजार कोटींच्या घोषणा करून गेले
भर दुष्काळात मराठवाड्यात आश्वासनांचा पाऊस, मुख्ममंत्री शिंदे आले आणि पुन्हा 14 हजार कोटींच्या घोषणा करून गेले
मी माझी स्वत:ची टीम सुरु करतोय, धोनीच्या पोस्टचा नेमका अर्थ काय?
मी माझी स्वत:ची टीम सुरु करतोय, धोनीच्या पोस्टचा नेमका अर्थ काय?
''बिल्डरच्या मुलाला वाचवण्याचा प्रयत्न करणारा आमदार कोणत्या पवारांचा?''; नानांचा सवाल, थेट पत्रच
''बिल्डरच्या मुलाला वाचवण्याचा प्रयत्न करणारा आमदार कोणत्या पवारांचा?''; नानांचा सवाल, थेट पत्रच
मॅक्सवेलला रिटेन करणार का? आरसीबी 4 चार खेळाडूंचा करेल विचार
मॅक्सवेलला रिटेन करणार का? आरसीबी 4 चार खेळाडूंचा करेल विचार
Pune Car Accident Accused Rap Song : पश्चाताप नाहीच, उलट पैशांचा माज, बिल्डर पुत्रानं म्हटला रॅप
पश्चाताप नाहीच, उलट पैशांचा माज, दोघांना चिरडल्यानंतर बिल्डर पुत्रानं म्हटला रॅप
Embed widget