एक्स्प्लोर

Hyderabad Gang Rape : हैदराबादमधील सर्वांत पॉश परिसरात 5 अल्पवयीन मुलांचा 17 वर्षीय मुलीवर मर्सिडिजमध्ये सामूहिक बलात्कार 

17 वर्षीय अल्पवयीन मुलीवर गेल्या शनिवारी मर्सिडिज कारमध्ये महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी सामूहिक बलात्कार (Hyderabad Gang Rape) केल्याचे धक्कादायक प्रकरण समोर आले आहे.

हैदराबाद : हैदराबादमध्ये (Hyderabad) एका पबमध्ये पार्टीसाठी गेलेल्या 17 वर्षीय अल्पवयीन मुलीवर गेल्या शनिवारी मर्सिडिज कारमध्ये महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी सामूहिक बलात्कार (Hyderabad Gang Rape) केल्याचे धक्कादायक प्रकरण समोर आले आहे. सर्व आरोपी अल्पवयीन आहेत. एका आमदाराचा मुलगाही या गटात सामील होता, असे मानले जात आहे, मात्र या सामूहिक बलात्कारात त्याचा सहभाग असण्यावरून पोलिसांनी साशंकता व्यक्त केली आहे.

एक 17 वर्षांची मुलगी तिच्या मैत्रिणीसोबत पबमध्ये आली होती, ती लवकर निघून गेली. पीडित मुलीची कथितपणे त्या मुलांशी मैत्री होती आणि ती तो मुलगा आणि मुलाच्या मित्रांसोबत पबमध्ये होती. त्यांनी मुलीला घरी सोडण्याचे आश्वासन दिले होते. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही भयंकर घटना होण्यापूर्वी हा गट एका पेस्ट्री शॉपमध्ये गेला होता.

बलात्काराचा गुन्हा दाखल

घरी सोडण्याच्या बहाण्याने जुबली हिल्स परिसरात (jubilee hills) त्या 5 मुलांनी कार उभी करून अल्पवयीन मुलीवर आळीपाळीने बलात्कार केला. आमदाराचा मुलगा, ज्याचे नाव या प्रकरणात समोर आले आहे, तो कथितरित्या मारहाण होण्यापूर्वी कारमधून खाली उतरला आणि पळून गेला. 

जेव्हा मुलीच्या कुटुंबीयांनी तिच्या मानेवर झालेल्या जखमा पाहिल्या आणि तिला विचारले तेव्हा तिने सांगितले की, पबमध्ये एका पार्टीत गेल्यानंतर काही मुलांनी तिच्यावर हल्ला केला होता. मुलीच्या वडिलांच्या तक्रारीवरून पोलिसांनी सुरुवातीला गुन्हा दाखल केला होता. त्यानंतर तिने सविस्तर माहिती दिली असता बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला.

तांत्रिक पुराव्याच्या आधारे संशयितांचा शोध सुरू

पोलीस अधिकारी जोएल डेव्हिस यांनी एनडीटीव्हीला सांगितले की, मुलीच्या वडिलांनी आमच्याशी संपर्क साधला होता. त्यांनी सांगितल्यानुसार आम्ही गुन्हा दाखल केला. मुलगी काही सांगण्याच्या मन:स्थितीत नसल्याने वडिलांना काय झाले याची पूर्ण खात्री नव्हती. या मुलीला महिला अधिकाऱ्यांकडे पाठवले असता घडलेला प्रकार उघड झाला. मुलगी आरोपीची ओळख सांगू शकली नाही. फुटेज आणि तांत्रिक पुराव्याच्या आधारे संशयितांचा शोध सुरू आहे.

दरम्यान, पबने अल्पवयीन मुलांना प्रवेश कसा दिला आणि त्यांच्याकडे दारू आहे का? याचाही तपास पोलीस करत आहेत. पबच्या व्यवस्थापकाने सांगितले की, पार्टीमध्ये कोणालाही मद्यपान किंवा धूम्रपान करण्याची परवानगी नाही.

संशयित मुलांसोबत पीडित मुलगी पबसमोरील व्हिडीओमध्ये कैद

दरम्यान, समोर आलेल्या व्हिडिओमध्ये, मुलगी एका मित्राला मिठी मारताना, निरोप घेताना आणि लाल मर्सिडीजमध्ये मुलांसोबत फिरताना दिसत आहे. काही वेळानंतर, मुलांनी कथितरित्या जुबली हिल्समध्ये मर्सिडीज पार्क केली आणि तिच्यावर बलात्कार केला तर इतर कारच्या बाहेर पहारा देत होते.

आरोपी हे इयत्ता 11वी आणि 12वीचे विद्यार्थी असून ते 'राजकीयदृष्ट्या प्रभावशाली' कुटुंबातील असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. एका आमदाराचा मुलगा देखील या गटाचा भाग असल्याचे मानले जात आहे, परंतु पोलिसांचे म्हणणे आहे की तो सामूहिक बलात्कारात सहभागी नसावा.

गेल्या शनिवारी संध्याकाळी ही तरुणी तिच्या मित्रासोबत पबमध्ये गेली होती, ती लवकर निघून गेल्याचे सांगण्यात येत आहे. अल्पवयीन मुलीने एका मुलाशी मैत्री केली आणि तो आणि त्याच्या मित्रांसह क्लब सोडला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संपूर्ण ग्रुप पेस्ट्रीच्या दुकानातही गेला होता. मारहाण करण्यापूर्वी आमदाराचा मुलगा गाडीतून उतरून पळून गेला होता.

इतर महत्त्वाच्या बातम्या 

महत्त्वाच्या बातम्या

ओमानच्या किनाऱ्याजवळ भारतीय जहाजावर हल्ला, होर्मुझच्या सामुद्रधुनीत तणाव वाढला, किती जणांची सुटका, किती जण बेपत्ता? 
ओमानच्या किनाऱ्याजवळ भारतीय जहाजावर हल्ला, होर्मुझच्या सामुद्रधुनीत तणाव वाढला, किती जणांची सुटका, किती जण बेपत्ता? 
Manipur Violence: मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार उफाळला, चार जणांचा मृत्यू; सहा वर्षांच्या मुलालाही गोळी लागली
मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार उफाळला, चार जणांचा मृत्यू; सहा वर्षांच्या मुलालाही गोळी लागली
Manoj Tiwari: भाजप खासदार मनोज तिवारींनी BRICS वर असा एक फोटो शेअर केला की तो डिलीट करून माफी मागायची वेळ आली, नेमकं घडलं तरी काय?
भाजप खासदार मनोज तिवारींनी BRICS वर असा एक फोटो शेअर केला की तो डिलीट करून माफी मागायची वेळ आली, नेमकं घडलं तरी काय?
Abhijeet Dipke : मी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा देतो, आजच राज्यपालांना भेटतो; सोशल मीडिया इन्फ्लुएंसरने ट्रोल केल्यानंतर अभिजीत दिपकेंचे पत्र
मी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा देतो, आजच राज्यपालांना भेटतो; सोशल मीडिया इन्फ्लुएंसरने ट्रोल केल्यानंतर अभिजीत दिपकेंचे पत्र

व्हिडीओ

Maharashtra Rain : राज्यभरात बळीराजाच्या स्वागताला वरूणराजा Special Report
Muslim Ganpati Mumbai : मुंबईत गणेशोत्सवात धार्मिक एकोप्यात दर्शन | Special Report ABP Majha
Will Jarange march on Mumbai, or will a solution be found : मुंबईत धडकणार की तोडगा निघणार? | Special Report ABP Majha
Majha Katta Ramchandra Godbole Sunita Godbole : नलक्षग्रस्त भाग,बस्तरच्या जंगलातलं जीवणघेणं वास्तव मांडणारा कट्टा
Shweta Mahale Vs Sanjay Gaikwad : श्वेता महालेंवरील वक्तव्य भोवलं, संजय गायकवाड यांच्याविरुद्ध पोलिसांत गुन्हा दाखल

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
MH-CET Exam : सीईटी डेटा लीक अन् सेंटर मॅनेजमेंट प्रकरणाची होणार चौकशी, मुख्यमंत्री फडणवीसांचे FIR आणि फॉरेन्सिक ऑडिटचे आदेश
सीईटी डेटा लीक अन् सेंटर मॅनेजमेंट प्रकरणाची होणार चौकशी, मुख्यमंत्री फडणवीसांचे FIR आणि फॉरेन्सिक ऑडिटचे आदेश
Manipur Violence: मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार उफाळला, चार जणांचा मृत्यू; सहा वर्षांच्या मुलालाही गोळी लागली
मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार उफाळला, चार जणांचा मृत्यू; सहा वर्षांच्या मुलालाही गोळी लागली
स्कॉटलंड, वेल्स आणि उत्तर आयर्लंड युनायटेड किंगडमपासून वेगळे होणार? स्वातंत्र्याच्या निर्णयावर सार्वमत होण्याची शक्यता
स्कॉटलंड, वेल्स आणि उत्तर आयर्लंड युनायटेड किंगडमपासून वेगळे होणार? स्वातंत्र्याच्या निर्णयावर सार्वमत होण्याची शक्यता
Manoj Tiwari: भाजप खासदार मनोज तिवारींनी BRICS वर असा एक फोटो शेअर केला की तो डिलीट करून माफी मागायची वेळ आली, नेमकं घडलं तरी काय?
भाजप खासदार मनोज तिवारींनी BRICS वर असा एक फोटो शेअर केला की तो डिलीट करून माफी मागायची वेळ आली, नेमकं घडलं तरी काय?
Afghanistan vs India, 1st T20I: पहिल्यांदाच आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामन्यात राष्ट्रगीतापूर्वी 'वंदे मातरम' वाजलं; कोणालाच काही कळेना, चाहते सुद्धा हैराण अन् सामना सुरु होण्याची वेळ सुद्धा लांबली
पहिल्यांदाच आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामन्यात राष्ट्रगीतापूर्वी 'वंदे मातरम' वाजलं; कोणालाच काही कळेना, चाहते सुद्धा हैराण अन् सामना सुरु होण्याची वेळ सुद्धा लांबली
Mamata Banerjee: पश्चिम बंगालमध्ये चक्क टीएमसीच्या फुटीर गटाची थेट ममता बॅनर्जींनाच ऑफर, राजकीय भूवया उंचावल्या!
पश्चिम बंगालमध्ये चक्क टीएमसीच्या फुटीर गटाची थेट ममता बॅनर्जींनाच ऑफर, राजकीय भूवया उंचावल्या!
Ayam Cemani Chicken : सोन्यापेक्षाही महागडी कोंबडी! एका अंड्याची किंमत 3 हजार; काय आहे या काळ्या कोंबडीचे वैशिष्ट्य?
सोन्यापेक्षाही महागडी कोंबडी! एका अंड्याची किंमत 3 हजार; काय आहे या काळ्या कोंबडीचे वैशिष्ट्य?
Arvind Kejriwal: तब्बल पाच महिन्यांनी अरविंद केजरीवालांनी भाजपवासी राघव चड्ढांवर मौन सोडलं! म्हणाले, 'आता कोणाला राज्यसभेवर पाठवण्यापूर्वी..'
तब्बल पाच महिन्यांनी अरविंद केजरीवालांनी भाजपवासी राघव चड्ढांवर मौन सोडलं! म्हणाले, 'आता कोणाला राज्यसभेवर पाठवण्यापूर्वी..'
Embed widget