पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या दौऱ्याआधी कानपूरमध्ये मोठा राडा, दोन समाजात दगडफेक
Kanpur Latest News : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कानपूर दौऱ्याआधी दोन समाजामध्ये तुफान दगडफेक झाली आहे. प

Kanpur Latest News : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कानपूर दौऱ्याआधी दोन समाजामध्ये तुफान दगडफेक झाली आहे. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांकडून सर्वोप्तरी प्रयत्न सुरु आहेत. जमावाला पांगवण्यासाठी पोलीस प्रयत्न करत आहेत.
27 मे रोजी भाजपच्या प्रवक्त्या नुकूल शर्मा यांनी प्रेषितांबाबत केलेल्या वक्तव्याबाबत कानपूरमध्ये मुस्लीम जमाव एकवटला. आज शुक्रवार आहे, अन् याच दिवशी मुस्लीम समजाचा असंतोष समोर आला. कानपूरमधील परेड चौराह या भागात सुरुवातीला दुकानं बंद करुन विरोध दर्शवण्यात आला. त्यानंतर दोन समाजात काही ठिकाणी दडगफेक झाली. त्यानंतर पोलिसांनी तात्काळ घटनास्थाळावर धाव घेत परिस्थिती नियंत्रणात आणली आहे. पोलीस सध्या तेथील परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत.
सध्या स्थिती सामान्य आहे. दगडफेक करणाऱ्यांना ओळखण्याचं काम सुरु आहे. दोषींवर कारवाई केली जाईल, असे स्थानिक पोलिसांनी सांगितलेय.
पंतप्रधान नरेंद्र मोदी शुक्रवारी उत्तर प्रदेश दौऱ्यावर
पंतप्रधान नरेंद्र मोदी शुक्रवारी म्हणजेच 3 जून 2022 रोजी उत्तर प्रदेशच्या दौऱ्यावर आलेत. दुपारी पंतप्रधान कानपूरच्या पारौंख गावात पोहोचतील, तिथे ते माननीय राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्यासोबत पाथरी माता मंदिराला भेट देतील.त्यानंतर, दुपारी 2 च्या सुमाराला , ते डॉ. बी.आर. आंबेडकर भवनाला भेट देतील, त्यानंतर 2:15 वाजता मिलन केंद्राला भेट देतील. हे केंद्र माननीय राष्ट्रपतींचे वडिलोपार्जित घर आहे, जे सार्वजनिक वापरासाठी दान करण्यात आले आणि त्याचे रूपांतर समुदाय केंद्र (मिलन केंद्र) मध्ये करण्यात आले. त्यानंतर ते दुपारी 2:30 वाजता पारौंख गावात सार्वजनिक कार्यक्रमाला उपस्थित राहतील. पायाभरणी समारंभा दरम्यान, पंतप्रधान 80,000 कोटी रुपयांपेक्षा जास्त मूल्याच्या 1406 प्रकल्पांची पायाभरणी करणार आहेत. या प्रकल्पांमध्ये कृषी आणि संलग्न, माहिती आणि तंत्रज्ञान आणि इलेक्ट्रॉनिक्स, सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग उत्पादन, नवीकरणीय ऊर्जा, औषोधोत्पादन , पर्यटन, संरक्षण आणि अवकाश , हातमाग आणि वस्त्रोद्योग इत्यादी विविध क्षेत्रांचा समावेश आहे. या समारंभाला देशातील उद्योग क्षेत्रातील दिग्गज उपस्थित राहणार आहेत.
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
