एक्स्प्लोर
लोकसभा निवडणुका मतदानपत्रिकाद्वारे घ्या, 17 पक्षांची मागणी
इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशिनमधील (ईव्हीएम) बिघाड आणि छेडछाडीच्या घटनांच्या पार्श्वभूमीवर ही मागणी केली जात आहे.
![लोकसभा निवडणुका मतदानपत्रिकाद्वारे घ्या, 17 पक्षांची मागणी 17 political parties to approach Election Commission, demanding 2019 general elections be conducted on ballot paper लोकसभा निवडणुका मतदानपत्रिकाद्वारे घ्या, 17 पक्षांची मागणी](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2016/11/28100223/CyULCG2UQAA-HWe.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
नवी दिल्ली : 2019 मधील लोकसभा निवडणुका मतदान पत्रिकांद्वारे घ्या, अशी मागणी देशातील 17 राजकीय पक्षांनी केली आहे. इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशिनमधील (ईव्हीएम) बिघाड आणि छेडछाडीच्या घटनांच्या पार्श्वभूमीवर ही मागणी केली जात आहे.
मागणी मान्य न झाल्यास आंदोलन करण्याचा इशाराही या पक्षांनी निवडणूक आयोगाला दिला आहे. मतपत्रिका म्हणजेच बॅलेट पेपरच्या वापराची मागणी करणाऱ्या पक्षांमध्ये तृणमूल काँग्रेस आणि समाजवादी पक्षाचाही समावेश आहे.
समाजवादी पक्षाने यापूर्वी अनेक वेळा मतपत्रिकेद्वारे मतदान घेण्याची मागणी केली आहे. देशभरात गेल्या काही वर्षात झालेल्या निवडणुकांदरम्यान इव्हीएममध्ये छेडछेड होत असल्याचा आरोप विरोधी पक्षांनी केला होता.
उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीत भाजपला स्पष्ट बहुमत मिळाल्यानंतर बसप आणि सप या पक्षांनी ईव्हीएममध्ये फेरफार झाल्याचा आरोप केला होता. पंजाबमधील निवडणुकीनंतर आम आदमी पक्षाचे प्रमुख अरविंद केजरीवाल यांनीही ईव्हीएममधील फेरफेराचा मुद्दा उपस्थित केला होता.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
व्यापार-उद्योग
सोलापूर
महाराष्ट्र
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)