एक्स्प्लोर
Advertisement
3 वर्षात 12 पोलीस नोकरी सोडून अतिरेकी बनले!
जम्मू-काश्मीर पोलिसांनी अशाप्रकारच्या घटनांवर चिंता व्यक्त करताना एक अंतर्गत अहवाल तयार केला आहे.
जम्मू : जम्मू-काश्मीरमध्ये नोकरी सोडून अतिरेकी झाल्याच्या घटनांनी पोलीस विभागाची चिंता वाढवली आहे. मागील तीन वर्षांत 12 पोलीस कर्मचारी सुमारे 30 शस्त्रांसह पसार झाल्याचं समोर आलं आहे. विशेष पोलीस अधिकारी आदिल बशीर हे पसार झाल्यानंतर जम्मू-काश्मीर पोलिसांनी अशाप्रकारच्या घटनांवर चिंता व्यक्त करताना एक अंतर्गत अहवाल तयार केला आहे.
आदिल बशीर हा दक्षिण काश्मीरच्या वाची विधानसभा मतदारसंघातील पीडीपीचे आमदार एजाज मीर यांच्या सरकारी निवासस्थानावरुन आठ शस्त्रास्त्र घेऊन पळाला होता. यामध्ये 7 एके47 आणि एका पिस्तूलचा समावेश होता. पोलिसांच्या माहितीनुसार सुमारे 12 पोलीस कर्मचारी आणि दोन जवान अतिरेकी रँकमध्ये सामील झाले आहेत. त्यांनी 30 शस्त्रास्त्र घेऊन पळ काढला होता.
पोलिसांनी 5 ऑक्टोबरला 29 वर्षीय बीएसएफ कॉन्स्टेबल शकीर वानीला आणखी एका स्थानिक तरुणासह हिजबुल मुजाहिद्दीनसोबच्या कथित संबंधांच्या आरोपाखाली अटक केली होती. पोलिसांच्या दाव्यानुसार, वानी हा हिजबुल मुजाहिद्दीनचा भूमिगत कार्यकर्ता आहे आणि तो अतिरेक्यांना रसद पुरवण्यात मदत करतो. तसंच मिलिटंट रँकसाठी तरुणांच्या भरतीची जबाबदारीही त्याच्यावर सोपवण्यात आली होती.
नोकरी पोलिसांची, काम अतिरेक्यांचं
नोकरी सोडून पसार झालेल्या कॉन्स्टेबल रशीद शिगन प्रकरणात नवी माहिती जम्मू काश्मीर पोलिसांना मिळाली आहे. "रशीद हा हिजबुल मुजाहिद्दीनचा एक सक्रीय सदस्य होता. तसंच पोलीस खात्यातील नोकरीदरम्यान मागील 18 महिन्यांमधील किमान 13 अतिरेकी हल्ल्यात तो सामील होता," असा दावा पोलिसांनी केला आहे.
पोलिसांसमोरील आव्हान कोणतं?
"पोलिस कर्मचाऱ्यांना आपल्या भावना नोकरीपासून दूर ठेवणं कठीण आहे, विशेषत: जेव्हा कर्मचाऱ्याने अनेकवेळा वैयक्तिकरित्या त्या परिस्थितीचा सामना केलेला असतो. सध्या पोलीस विरुद्ध अतिरेकी असं चित्र दिसतं. पण पोलीस कर्मचाऱ्यांना स्वत: मध्येही एका आव्हानाचा सामना करावा लागत आहे," असं एका वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्याने सांगितलं.
1993 मध्ये पहिलं बंड
जम्मू काश्मीर पोलिसांनी आपल्या पहिल्या बंडाचा सामना 1993 मध्ये केला होता. त्यावेळी सुमारे एक हजार पोलीस कर्मचाऱ्यांनी सैन्याच्या ताब्यात असलेल्या एका साथीदाराच्या मृत्यूच्या विरोधात पोलीस कंट्रोल रुमवर ताबा मिळवला होता. यानंतर इमारत रिकामी करण्यासाठी सैन्य आणि निमलष्करी दलाला पाचारण करण्यात आलं होतं. मग पोलिसांनी शरणागती स्वीकारली होती.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
बीड
महाराष्ट्र
निवडणूक
निवडणूक
Advertisement