एक्स्प्लोर
दहावीत 625 पैकी 624 मार्क, एका मार्कसाठी पेपर रिचेकिंगला
एवढी मेहनत करुनही माझा एक मार्क कुठे गेला, याचा शोध घेण्यासाठी दहावीच्या विद्यार्थ्याने पेपर रिचेकिंगला पाठवला. रिचेकिंगमध्ये उरलेला एक मार्कही मिळाल्यानंतर हा विद्यार्थी टॉपर ठरला.
बेळगाव : दहावीच्या परीक्षेत 625 पैकी 624 मार्क मिळाले. मात्र एवढी मेहनत करुनही माझा एक मार्क कुठे गेला, याचा शोध घेण्यासाठी दहावीच्या विद्यार्थ्याने पेपर रिचेकिंगला पाठवला. रिचेकिंगमध्ये उरलेला एक मार्कही मिळाल्यानंतर हा विद्यार्थी टॉपर ठरला.
बेळगावमधील मोहम्मद कैफ मुल्लाला दहावीत 625 पैकी 264 मार्क मिळाले. संयुक्तपणे एका विद्यार्थ्यासोबत तो टॉपर होता. मात्र हा एक गुण कसा गेला, याचा शोध घेण्यासाठी त्याने पेपर रिचेकिंगला पाठवला. अखेर रिचेकिंगमध्ये त्याला गमावलेला एक मार्क मिळाला आणि तो बोर्डात टॉपर म्हणून घोषित करण्यात आला.
मोहम्मद कैफने विज्ञान वगळता सर्व विषयांमध्ये शंभर टक्के मार्क मिळवले. बोर्डातील तेरा लाख विद्यार्थ्यांपैकी त्याने शंभर टक्के मार्क घेत पहिला क्रमांक पटकावला.
''मला शंभर टक्के मार्क मिळतील याची खात्री परीक्षा दिल्यापासून होती. पण 99.86 टक्के मार्क मिळाले, केवळ एकच मार्क विज्ञान विषयात गमावला होता. पण रिचेकिंगनंतर मला अपेक्षित असा निकाला लागला,'' असं कैफ एका वेबसाईटशी बोलताना म्हणाला.
मोहम्मद कैफ आता अकरावीत विज्ञान शाखेला प्रवेश घेणार आहे. त्याचे आई आणि वडील दोघेही शिक्षक आहेत. मोहम्मद कैफ सोशल मीडियावर कधीही वेळ व्यर्थ घालत नाही, त्याने असाच अभ्यास करावा असी इच्छा असल्याचं त्याचे वडील सांगतात.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
पुणे
विश्व
छत्रपती संभाजी नगर
Advertisement