एक्स्प्लोर

कावेरीचं पाणी पेटलं, 56 बस जाळल्या, 16 ठिकाणी कर्फ्यू

मुंबई :  कावेरी नदीच्या पाण्यावरुन कर्नाटक आणि तामिळनाडूत प्रचंड धुसफूस सुरु आहे. बंगळुरुत 16 पोलीस स्टेशन परिसरात कर्फ्यू लागू करण्यात आला आहे, तर काल एकाच डेपोतील तब्बल 56 बस पेटवण्यात आल्या.   प्रशासनाने तणाव निवळण्यासाठी तब्बल 15 हजार पोलिसांना रस्त्यावर उतरवलं आहे.   पुढचे 10 दिवस दररोज तामिळनाडूला 12 हजार क्युसेक्स पाणी सोडा, असे आदेश काल सुप्रीम कोर्टानं कर्नाटकला दिले आहेत. कावेरीचं पाणी पेटलं, 56 बस जाळल्या, 16 ठिकाणी कर्फ्यू या आदेशविरोधात काल दिवसभर बंगळुरु, म्हैसूरसह इतर शहरांमध्ये तोडफोड आणि जाळपोळीचं सत्र पाहायला मिळालं. ज्यात तामिळनाडूच्या शेकडो वाहनांचं नुकसान झालं आहे. तामिळनाडूच्या अनेकांना बेदम मारहाण करण्यात आली. कावेरीचं पाणी पेटलं, 56 बस जाळल्या, 16 ठिकाणी कर्फ्यू दरम्यान बंगलोरमधली परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी तब्बल 15 हजार पोलिस तैनात करण्यात आलेत. तसंच नागरिकांनी कायदा हातात घेऊ नये असं आवाहनही कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी केलंय.   जयललितांचं सिद्धरामय्यांना पत्र कर्नाटकातील हिंसा आणि तामिळी नागरिकांवर होणारे हल्ले पाहता, तामिळनाडूच्या मुख्यमंत्री जयललिता यांनी सिद्धरामय्यांना पत्र लिहिलं आहे. तामिळी नागरिकांची आणि त्यांच्या संपत्तीच्या सुरक्षेची काळजी घेण्याचं आवाहन त्यांनी केलं आहे.   केरळ-कर्नाटक वाहतूक रोखली कर्नाटकातील परिस्थिती पाहता केरळ सरकारने बंगळुरूला जाणाऱ्या बस रोखल्या आहेत. तर केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्यांशी बातचीत केली.   काय आहे कावेरीच्या पाण्याचा वाद? *कावेरी नदीचा उगम कर्नाटकच्या कोडगू जिल्ह्यातील आहे. पुढे ही नदी वाहात तामिळनाडू, केरळ आणि पाँडिचेरीतून बंगालच्या उपसागराला मिळते   *1892 आणि 1924 मध्ये म्हैसूर आणि मद्रास प्रांतात झालेल्या पाणीवाटप करारावरुन वादाला तोंड   *1990 साली सुप्रीम कोर्टानं कावेरी ट्रिब्युनलकडे वाद सोपवला, 1991 ला तामिळनाडूला 205 टीएमसी पाणी तामिळनाडूला देण्यास सांगितलं.   *2007 मध्ये ट्रिब्युनलनं तामिळनाडूला 419 टीएमसी पाणी सोडण्याचा आदेश दिला, वर्षात 10 वेळा हे पाणी सोडण्याची सूचना   *यंदा कमी पाऊस झाल्यानं कावेरी निम्मं रिकामं असल्याचं कारण देत कर्नाटकानं पाणी सोडण्यास विरोध केला   *तर 40 हजार हेक्टरवरचं सांबा पीक वाचवायचं असेल तर तामिळनाडूला पाणी सोडणं गरजेचं असल्याचा दावा जयललितांनी केला   *5 सप्टेंबर 2016 - सुप्रीम कोर्टानं 10 दिवस दररोज 15 हजार क्युसेक्स पाणी सोडण्याचे आदेश दिले, त्यावरुन जाळपोळ, बंद, धरणं आंदोलनं सुरु झाली   *9 सप्टेंबर 2016 - कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी मोदींना पत्र लिहिलं, कावेरीचं पाणी तामिळनाडूला दिलं तर पिण्याचा पाण्याचा प्रश्नगं भीर होईल   *12 सप्टेबर 2016 - कर्नाटकच्या विरोधानंतर सुप्रीम कोर्टानं 10 दिवस 15 हजाराऐवजी 12 हजार क्युसेक्स पाणी सोडण्याचे आदेश दिले संबंधित बातम्या सुप्रीम कोर्टाच्या आदेशानंतरही कावेरीचा पाणी प्रश्न कायम
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Nashik Assembly Election : नाशिक जिल्ह्यातील विधानसभा लढती, कोण-कोण भिडणार? 15 विधानसभा मतदारसंघातील चित्र स्पष्ट!
नाशिक जिल्ह्यातील विधानसभा लढती, कोण-कोण भिडणार? 15 विधानसभा मतदारसंघातील चित्र स्पष्ट!
पुण्यात आरपीआय आठवले गटाला खिंडार! राजीनामा दिलेल्या माजी उपमहापौरांची महायुतीविरोधी भूमिका, मतदान न करण्याची दिली शपथ
पुण्यात आरपीआय आठवले गटाला खिंडार! राजीनामा दिलेल्या माजी उपमहापौरांची महायुतीविरोधी भूमिका, मतदान न करण्याची दिली शपथ
विधानसभेतही 'सांगली पॅटर्न',  अपक्ष उमेदवार जयश्री पाटलांना निवडून देण्याचं विशाल पाटलांचं आवाहन
विधानसभेतही 'सांगली पॅटर्न',  अपक्ष उमेदवार जयश्री पाटलांना निवडून देण्याचं विशाल पाटलांचं आवाहन
Solapur Assembly Election : सोलापूर जिल्ह्यातील विधानसभा लढती, कोण-कोण भिडणार? 11 विधानसभा मतदारसंघातील चित्र स्पष्ट!
Solapur Assembly Election : सोलापूर जिल्ह्यातील विधानसभा लढती, कोण-कोण भिडणार? 11 विधानसभा मतदारसंघातील चित्र स्पष्ट!
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines :  3 PM : 05 November 2024 : एबीपी माझा हेडलाईन्स : ABP MajhaABP Majha Marathi News Headlines 2PM TOP Headlines 2 PM 05 November 2024Uddhav Thackeray Radhanagri Speech : शिवरायांचं मंदिर ते मुलांना मोफत शिक्षण; ठाकरेंची मोठी आश्वासनंSatej Patil Radhanagari Speech :   भर मंचावर सतेज पाटलांना समोर बोलावलं, राधानगरीत मोठी जबाबदारी

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Nashik Assembly Election : नाशिक जिल्ह्यातील विधानसभा लढती, कोण-कोण भिडणार? 15 विधानसभा मतदारसंघातील चित्र स्पष्ट!
नाशिक जिल्ह्यातील विधानसभा लढती, कोण-कोण भिडणार? 15 विधानसभा मतदारसंघातील चित्र स्पष्ट!
पुण्यात आरपीआय आठवले गटाला खिंडार! राजीनामा दिलेल्या माजी उपमहापौरांची महायुतीविरोधी भूमिका, मतदान न करण्याची दिली शपथ
पुण्यात आरपीआय आठवले गटाला खिंडार! राजीनामा दिलेल्या माजी उपमहापौरांची महायुतीविरोधी भूमिका, मतदान न करण्याची दिली शपथ
विधानसभेतही 'सांगली पॅटर्न',  अपक्ष उमेदवार जयश्री पाटलांना निवडून देण्याचं विशाल पाटलांचं आवाहन
विधानसभेतही 'सांगली पॅटर्न',  अपक्ष उमेदवार जयश्री पाटलांना निवडून देण्याचं विशाल पाटलांचं आवाहन
Solapur Assembly Election : सोलापूर जिल्ह्यातील विधानसभा लढती, कोण-कोण भिडणार? 11 विधानसभा मतदारसंघातील चित्र स्पष्ट!
Solapur Assembly Election : सोलापूर जिल्ह्यातील विधानसभा लढती, कोण-कोण भिडणार? 11 विधानसभा मतदारसंघातील चित्र स्पष्ट!
राष्ट्रवादीचा स्टार प्रचारक होताच भाऊ कदमनं व्यक्त केली इच्छा; अजित पवार मुख्यमंत्री व्हायला हवेत, शरद पवार-अजितदादांनी एकत्र यावं
अजित पवार मुख्यमंत्री व्हायला हवेत, शरद पवार-अजितदादांनी एकत्र यावं; राष्ट्रवादीचा स्टार प्रचारक होताच भाऊ कदमनं व्यक्त केली इच्छा
Satej Patil Radhanagari Speech :   भर मंचावर सतेज पाटलांना समोर बोलावलं, राधानगरीत मोठी जबाबदारी
भर मंचावर सतेज पाटलांना समोर बोलावलं, राधानगरीत मोठी जबाबदारी
Uddhav Thackeray: कोल्हापूरच्या सभेत उद्धव ठाकरेंची पाच मोठी गेमचेंजर आश्वासनं; मुलांना मोफत शिक्षण, मुंबईत घरं ते स्थिर भाव
कोल्हापूरच्या सभेत उद्धव ठाकरेंची पाच मोठी गेमचेंजर आश्वासनं; मुलांना मोफत शिक्षण, मुंबईत घरं ते स्थिर भाव
मध्यप्रदेशकडून महाराष्ट्रात येणाऱ्या वाहनातून 70 लाखांची रोकड जप्त
Dhule Cash Seized : मध्यप्रदेशकडून महाराष्ट्रात येणाऱ्या वाहनातून 70 लाखांची रोकड जप्त
Embed widget