Devendra Fadnavis : फडणवीस यांच्या नागपुरातील निवासस्थानाबाहेरील सुरक्षेत वाढ
सत्तांतर नाट्याच्या पार्श्वभूमीवर राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि वर्तमान विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या नागपुरातील धरमपेठ येथील निवासस्थानाबाहेर सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आली आहे.
नागपूरः राज्यात गेल्या तीन दिवसांपासून सुरू असलेल्या सत्तासंघर्षात दररोज होणाऱ्या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि वर्तमान विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या नागपुरातील निवासस्थानाबाहेर सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आली आहे. गेल्या तीन दिवसांपासून राज्यात सुरू असलेल्या सत्तांतर नाट्याच्या पार्श्वभूमीवर सुरक्षेच्या कारणावरून देवेंद्र फडणवीस यांच्या घराच्या बाहेर पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आलेला आहे.
शिवसेनेच्या बहुसंख्य आमदारांनी शिवसेनेने महाविकास आघाडीतून बाहेर पडावा, अशी मागणी केली आहे. त्या पार्श्वभूमीवर राज्यात सत्तांतर होईल का? अशा चर्चांना उधाण आलेले आहे. तर दुसरीकडे राज्यसभा खासदार संजय राऊत यांनी देखील शिवसेना महाविकास आघाडीतून बाहेर पडेल, अशी तयारी दर्शवली. यामुळे राज्यात परत एकदा भाजप आणि शिवसेनेचे सरकार अस्तित्वात येईल, अशी चर्चा राजकीय वर्तुळात आहे. त्यामुळेच देवेंद्र फडणीस यांच्या नागपूर येथील निवासस्थानी सकाळी सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे. यासंदर्भात अद्याप भाजपच्या एकाही पदाधिकाऱ्यांने प्रतिक्रिया दिली नाही आहे.
शिंदेंनी भाजपचा पाठिंबा असल्याचे केले मान्य!
Maharashtra Political Crisis : एका राष्ट्रीय पक्षाचा आपल्याला पाठींबा असल्याचे एकनाथ शिंदे यांनी बंडखोर आमदारांना सांगितलं. बंडखोरी करणाऱ्या आमदारांनी एकनाथ शिंदे यांची एकमताने गटनेतेपदी निवड केली आहे. त्यानंतर आमदरांशी बोलताना त्यांनी एका राष्ट्रीय पक्षाचा पाठिंबा असल्याचं सांगितले. आपण कुठेही काही लागलं तरी कमी पडणार नाही, असा शब्द राष्ट्रीय पक्षाने दिला आहे. आता फक्त एकजुटीने राहयचं आहे. आपलं सुख, दु:ख सारखंच आहे. विजय आपलाच आहे, असं एकनाथ शिंदे म्हणाले.
राष्ट्रवादीकडून भाजपला 'क्लिन चिट'
एकीकडे राष्ट्रवादी काँग्रेसकडून भाजपला या प्रकरणात क्लीन चिट दिला असतानाच दुसरीकडे एकनाथ शिंदे यांनी मात्र, राष्ट्रीय पक्षाचा पाठिंबा असल्याची कबुली दिली. दरम्यान, एकनाथ शिंदे यांनी भाजपचं नाव घेतलं नाही. मात्र, त्यांनी राष्ट्रीय पक्षाचा उल्लेख केला आहे. तसेच त्यांचा आपल्याला पाठिंबा असल्याचेही त्यांनी स्पष्टपणे सांगितलेय. त्यामुळे आता लवकरच एकनाथ शिंदे भाजपबरोबर सत्तास्थापनेचा दावा करु शकतात अशी चर्चा आहे.