Horoscope Today 27 February 2026: आजचा शुक्रवार 6 राशींसाठी भाग्यशाली! लक्ष्मी-कुबेराच्या कृपेने धनलाभाचे योग, आजचे राशीभविष्य वाचा...
Horoscope Today 27 February 2026: आज शुक्रवारचा दिवस 12 राशींसाठी कसा असेल? कोणासाठी दिवस फलदायी ठरेल? आजचे राशीभविष्य जाणून घ्या...

Horoscope Today 27 February 2026: वैदिक पंचांगानुसार, आज 26 फेब्रुवारी 2026, आजचा वार शुक्रवार आहे. ज्योतिषशास्त्रानुसार, आजचा दिवस अनेक राशींसाठी खास आणि लाभदायक ठरण्याची शक्यता आहे. या दिवशी ग्रहांची हालचाल पाहता दिवस फार महत्त्वाचा आहे, आज ग्रहांचा दुर्लभ संयोगही होत आहे. ज्याचा परिणाम सर्व 12 राशींच्या लोकांवर दिसून येईल. देवी लक्ष्मीच्या कृपेने तुमचा आजचा दिवस कसा असेल? कोणासाठी दिवस फलदायी ठरेल? 12 राशींचे आजचे राशीभविष्य (Horoscope Today) जाणून घ्या.
मेष रास (Aries Horoscope Today)
मेष राशीच्या लोकांनो आज महिलांना घरात इतरांबरोबर तडजोड करावी लागेल, शारीरिक व्याधी असणाऱ्या लोकांनी पथ्य पाणी सांभाळणे आवश्यक ठरेल
वृषभ रास (Taurus Horoscope Today)
वृषभ राशीच्या लोकांनो आज स्टेटस संबंधीचे प्रश्न लांबणीवर टाकणे चांगले, कोणतेही आर्थिक नियोजन आज करू नये
मिथुन रास (Gemini Horoscope Today)
मिथुन राशीच्या लोकांनो आज वैवाहिक जीवनात जोडीदाराच्या आणि तुमच्या विचारात तफावत राहील, अतिभावनाप्रधानतेमुळे नुकसान होऊ शकते
कर्क रास (Cancer Horoscope Today)
कर्क राशीच्या लोकांनो आज संधीचे सोने करण्यासाठी समय सूचकता ठेवावी लागेल, प्रेमवीरांना मनासारखा जोडीदार मिळण्याची संधी दिसेल
सिंह रास (Leo Horoscope Today)
सिंह राशीच्या लोकांसाठी आज पैशाच्या बाबतीतले अंदाज चुकण्याची शक्यता आहे, त्यामुळे लहान गोष्टीतला आनंदही भरभरून घेता येणार नाही.
कन्या रास (Virgo Horocsope Today)
कन्या राशींच्या लोकांसाठी आज जोडीदाराच्या दुटप्पी वागण्याचा त्रास होईल, इष्टदेवतेचे नामस्मरण बरीच मनःशांती देईल
तूळ रास (Libra Horoscope Today)
तूळ राशीच्या लोकांनो आज अचानक घडणारे योगायोग सुखदुःखाच्या उंबरठ्यावर नेऊन सोडतील, आपल्या योग्यतेपेक्षा जास्त प्रमाणात स्वप्न बघायला हरकत नाही
वृश्चिक रास (Scorpio Horoscope Today)
वृश्चिक राशीच्या लोकांनो आज उत्साह खूप वाढेल, आत्मविश्वासाने पावले टाकाल, अनेक नवीन ऋणानुबंध तयार होतील
धनु रास (Sagittarius Horoscope Today)
धनु राशीच्या लोकांनो आज बुद्धीच्या कसरती करण्यापेक्षा जास्तीत जास्त काम करण्याचा प्रयत्न कराल, यामुळे नोकरीमध्ये वरिष्ठ खूश होतील
मकर रास (Capricorn Horoscope Today)
मकर राशीच्या लोकांनो आज कसोट्या वाट्याला आल्या तरी ईश्वराच्या दारात न्याय आहे हे आज तुम्हाला समजेल
कुंभ रास (Aquarius Horoscope Today)
कुंभ राशीच्या लोकांनो आज अवश्य चांगले संकल्प करा आणि त्याच्या पूर्ततेसाठी प्रयत्न कराल, यश मिळेल
मीन रास (Pisces Horoscope Today)
मीन राशीच्या लोकांनो आज महिलांनी तडजोडीचे धोरण स्वीकारावे, अडचणीतून मार्ग काढण्याचा प्रयत्न कराल
हेही वाचा,
March 2026 Lucky Zodiac Signs: संपूर्ण मार्च महिना भरभराट, 3 राशींची लॉटरी! ग्रहांचे शुभ संकेत, कष्टातून सुटका, प्रगतीची गाडी सुस्साट, कोणत्या राशी लकी?
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)




















