एक्स्प्लोर

'मालेगावसारखी परिस्थिती चार जूननंतर सर्वत्र दिसेल, जो ताकदवर आहे त्याला...'; इम्तियाज जलील यांचा नाशिकमध्ये मोठा दावा

Imtiyaz Jaleel : मालेगावचे माजी महापौर अब्दुल मलिक यांच्यावरील गोळीबार हा राजकीय वादातूनच झाला आहे. मालेगावमधून एमआयएमचे बस्तान उखडवण्यासाठीच हे राजकीय षडयंत्र आहे, असे इम्तियाज जलील यांनी म्हटले.

नाशिक :  मालेगावचे माजी महापौर अब्दुल मलिक (Abdul Malik) यांच्यावरील गोळीबार हा व्यक्तिगत वादातून नव्हे तर राजकीय वादातूनच झाला आहे. मालेगावमधून (Malegaon) एमआयएमचे (MIM) बसलेले बस्तान उखडवण्यासाठीच हे राजकीय षडयंत्र आहे. चार जूनला लोकसभेचा निकाल (Lok Sabha Election Result) आल्यानंतर आपल्याला लोक बंदुका घेऊन दिसतील. जो ताकदवर आहे त्याला बंदुकीने धाक दाखवला जाईल. बंदूकीच्या जोरावर विरोधकांना नेस्तानाबूत करण्यात येईल, असा दावा खासदार इम्तियाज जलील (Imtiyaz Jaleel) यांनी केला आहे.  

काही दिवसांपूर्वी मालेगाव येथील एमआयएमचे माजी महापौर अब्दुल मलिक यांच्यावर गोळीबार होता. या गोळीबारात मलिक हे गंभीर जखमी झाले. त्यांना नाशिकमधील रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. खासदार इम्तियाज जलील यांनी आज अब्दुल मलिक यांची भेट घेतली. त्यानंतर पत्रकारांशी बोलताना त्यांनी वरील दावा केला आहे. 

आमच्या लोकांना अडचणीत आणण्याचा प्रयत्न 

इम्तियाज जलील म्हणाले की, मालेगावमध्ये एमआयएम पक्षासाठी अब्दुल मलिक आणि त्यांच्या भावाने याआधी खूप प्रयत्न केले आहेत. तेव्हाही आम्हाला खूप त्रास सहन करावा लागला. खूप विरोध झाला, जे प्रस्थापित पक्ष होते त्यांच्याकडून खूप विरोध होता. आमच्यावर अनेक हल्ले देखील झाले होते. तरीही लोकांना एमआयएम पक्षच पाहिजे होता. निवडणूक काळात आम्हाला विरोध करण्यात आला. निवडणूक लढू नका, मात्र विरोध झाल्यानंतर देखील आम्ही लढलो आणि जिंकलो. महाराष्ट्रात विधानसभेला मालेगाव आणि धुळे या दोन आमच्या सीट आल्या होत्या आणि तेथे आमचे प्रमुख केंद्र बनले.  मालेगावमध्ये अब्दुल मलिक यांच्यावर गोळीबाराची घटना झाली. त्यानंतर मला फोन आला आणि मी तात्काळ पोलिसांची बोललो, त्यांनी सांगितलं की आरोपींचा शोध लागला आहे. या प्रकरणात प्रॉपर्टीवरून वाद असल्याचं मला कुठेही दिसत नाही, त्याची मी माहिती घेतली आहे. या प्रकरणानंतर मला असे वाटते की, आमच्या लोकांना कुठेतरी अडचणीत आणण्याचा प्रयत्न सुरू झाला आहे. 

मालेगाव गोळीबार प्रकरणात कुठलाही वाद नाही

लोकसभा निवडणुकीनंतर आपल्याला ते सर्व समजेलच. चार जूनला लोकसभेचा निकाल आल्यानंतर आपल्याला देखील लोक बंदुका घेऊन दिसतील.  जो ताकदवर आहे त्याला बंदुकीने धाक दाखवला जाईल, थांबवलं जाईल आणि हा पूर्ण डाव आहे.  या प्रकरणात कोणताही वाद झाला नाही याची मी पूर्ण माहिती घेतली आहे. या प्रकरणात रात्रीच्या वेळी कोणीतरी येतं आणि गोळीबार करते त्यांचा उद्देश हाच होता की समोरच्याला संपवून टाकायचे. तीन तीन गोळ्या मारून समोरच्याला संपवून टाकायचे आणि एका भावाला मारून दुसऱ्याला मागे राहण्यास मजबूर करायचे. 

अब्दुल मलिक यांच्यावर गोळीबार हे राजकीय षड्यंत्र

या प्रकरणात 20-21 वर्षांच्या मुलांना पुढे करून त्याचा फायदा कोणाला घ्यायचा होता. यात कोणकोणत्या राजकीय पक्षांच्या नेत्यांच्या हात होता हे आपल्याला कळेलच. मी पोलिसांना देखील त्यादिवशी सांगितले की, या प्रकरणाची सखोल चौकशी करा, अटक करणे आमच्यासाठी आवश्यक नाही. यात कोण षड्यंत्र करत आहे त्याचा शोध घ्या. या प्रकरणात कोणताही वाद नाही हे राजकीय षड्यंत्र आहे.  मी यातून सर्वांना इशारा देतो जे मालेगाव मध्ये घडलं तेच संपूर्ण राज्य मध्ये घडेल. या प्रकरणात दोन्ही बाजूने गोळीबार झाला नाही आणि झाला असेल तर पोलिसांनी याची चौकशी करावी.  

इम्तियाज जलील यांचा गृहमंत्र्यांना इशारा

या प्रकारच्या घटना घडत असतील तर महाराष्ट्राच्या गृहमंत्र्यांनी यावर बोलले पाहिजे. राज्यात लॉ अँड ऑर्डर आहे की नाही की, जंगल राज सुरू आहे हे आम्हाला सांगावे. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी सांगावे असे मार्ग जर रस्त्यावर सोडवले जाणार असतील तर त्यासाठी देखील आम्ही तयार आहोत.  या प्रकरणात जर आपापसातील भांडण असेल तर राज्याच्या गृहमंत्र्यांनी सांगावे. मुख्यमंत्र्यांनी सांगावे की, आपले प्रकरण पोलिसात किंवा न्यायालयात सोडविले जाणार नाही. आपण आपापले बंदूक आणि शस्त्र घेऊन रस्त्यावर उतरावे. अशा घटना घडत असतील तर महाराष्ट्राच्या सरकारचा दोष आहे. लोकांमध्ये भीती उरलेली नाही त्यामुळे लोकांना वाटते सरकार आम्हाला वाचवायला येणार आहे.  

साम-दाम-दंड वापरण्याचा प्रयत्न

भुसावळ मधील घटना देखील तशीच आहे. चार तारखेच्या निकालानंतर राज्यात काय होईल हे तुम्हीच बघा.  अशा घटना तुम्हाला विधानसभेच्या निवडणुकीपर्यंत दिसतील. सत्तेत जर सामील व्हायचं असेल तर साम-दाम-दंड वापरण्याचा प्रयत्न सुरू आहे.

आणखी वाचा 

मालेगाव : अब्दुल मलिक गोळीबार प्रकरणी मोठी अपडेट, घटनास्थळी दोन्ही बाजूंनी फायरिंग, आतापर्यंत दोघांना बेड्या

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Aaditya Thackeray : भाजपच्या प्रत्येक नेत्यांची, मंत्र्यांची मुलं परदेशात शिकली, ते येणार आहेत का कबर खोदायला? आगी लावणाऱ्यांचे काही जात नाही; आदित्य ठाकरेंकडून 'रोखठोक' व्हिजन
भाजपच्या प्रत्येक नेत्यांची, मंत्र्यांची मुलं परदेशात शिकली, ते येणार आहेत का कबर खोदायला? आगी लावणाऱ्यांचे काही जात नाही; आदित्य ठाकरेंकडून 'रोखठोक' व्हिजन
खोली भरुन रोकड सापडताच न्यायमूर्तींची बदली, वकील संघटना म्हणाली आम्ही कचरा नाही, आमच्याकडे नको; SC चे स्पष्टीकरण
खोली भरुन रोकड सापडताच न्यायमूर्तींची बदली, वकील संघटना म्हणाली आम्ही कचरा नाही, आमच्याकडे नको; SC चे स्पष्टीकरण
स्तन पकडणे, पायजम्याची नाडी खोलणे बलात्कार नाही; अलाहाबाद कोर्टाच्या निकालावर संताप, नीलम गोऱ्हेंचं सर्वोच्च न्यायालयास पत्र
स्तन पकडणे, पायजम्याची नाडी खोलणे बलात्कार नाही; अलाहाबाद कोर्टाच्या निकालावर संताप, नीलम गोऱ्हेंचं सर्वोच्च न्यायालयास पत्र
राज्यातील एकही लाडकी बहीण वंचित राहणार नाही; एकनाथ शिंदेंचा शब्द; म्हणाले, कुठलीच योजना बंद नाही
राज्यातील एकही लाडकी बहीण वंचित राहणार नाही; एकनाथ शिंदेंचा शब्द; म्हणाले, कुठलीच योजना बंद नाही
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Harshwardhan Sapkal Majha Vision : सावरकर ते औरंजेबाची कबर...हर्षवर्धन सपकाळांची स्फोटक मुलाखतDevendra Fadnavis Majha Vision Full : बेधडक उत्तरं, तुफान फटकबाजी! दवेंद्र फडणवीस भरभरुन बोलले..Devendra Fadnavis Majha Vision : Dhananjay Munde यांच्याविरोधात कुणी आजही पुरावा आणून दिल्यास...Devendra Fadnavis Majha Vision : Dhananjay Munde यांच्याविरोधात कुणी आजही पुरावा आणून दिला, तर...

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Aaditya Thackeray : भाजपच्या प्रत्येक नेत्यांची, मंत्र्यांची मुलं परदेशात शिकली, ते येणार आहेत का कबर खोदायला? आगी लावणाऱ्यांचे काही जात नाही; आदित्य ठाकरेंकडून 'रोखठोक' व्हिजन
भाजपच्या प्रत्येक नेत्यांची, मंत्र्यांची मुलं परदेशात शिकली, ते येणार आहेत का कबर खोदायला? आगी लावणाऱ्यांचे काही जात नाही; आदित्य ठाकरेंकडून 'रोखठोक' व्हिजन
खोली भरुन रोकड सापडताच न्यायमूर्तींची बदली, वकील संघटना म्हणाली आम्ही कचरा नाही, आमच्याकडे नको; SC चे स्पष्टीकरण
खोली भरुन रोकड सापडताच न्यायमूर्तींची बदली, वकील संघटना म्हणाली आम्ही कचरा नाही, आमच्याकडे नको; SC चे स्पष्टीकरण
स्तन पकडणे, पायजम्याची नाडी खोलणे बलात्कार नाही; अलाहाबाद कोर्टाच्या निकालावर संताप, नीलम गोऱ्हेंचं सर्वोच्च न्यायालयास पत्र
स्तन पकडणे, पायजम्याची नाडी खोलणे बलात्कार नाही; अलाहाबाद कोर्टाच्या निकालावर संताप, नीलम गोऱ्हेंचं सर्वोच्च न्यायालयास पत्र
राज्यातील एकही लाडकी बहीण वंचित राहणार नाही; एकनाथ शिंदेंचा शब्द; म्हणाले, कुठलीच योजना बंद नाही
राज्यातील एकही लाडकी बहीण वंचित राहणार नाही; एकनाथ शिंदेंचा शब्द; म्हणाले, कुठलीच योजना बंद नाही
आग्र्यात शिवाजी महाराजांचं भव्य स्मारक, शासनाचा GR निघाला; पर्यटन विभागाकडे जबाबदारी, असणार 'लय भारी'
आग्र्यात शिवाजी महाराजांचं भव्य स्मारक, शासनाचा GR निघाला; पर्यटन विभागाकडे जबाबदारी, असणार 'लय भारी'
Video: उद्धव ठाकरेंनी नारायण राणेंना फोन केला का?  दिशा सालियनप्रकरणी आदित्य ठाकरे म्हणाले, शीsss..
Video: उद्धव ठाकरेंनी नारायण राणेंना फोन केला का? दिशा सालियनप्रकरणी आदित्य ठाकरे म्हणाले, शीsss..
Jalgaon Crime : केंद्रीय मंत्र्यांच्या मुलीच्या छेडछाडीनंतर जळगाव पुन्हा हादरले; टवाळखोरांच्या छेडछाडीला कंटाळून 15 वर्षीय मुलीचं धक्कादायक कृत्य
केंद्रीय मंत्र्यांच्या मुलीच्या छेडछाडीनंतर जळगाव पुन्हा हादरले; टवाळखोरांच्या छेडछाडीला कंटाळून 15 वर्षीय मुलीचं धक्कादायक कृत्य
Vijay Wadettiwar & Yogesh Kadam : महाराष्ट्रात गुजरातमधून मोठ्या प्रमाणात गुटखा येतो, वडेट्टीवारांचं विधानसभेत वक्तव्य; गृहराज्य मंत्री म्हणाले....
महाराष्ट्रात गुजरातमधून मोठ्या प्रमाणात गुटखा येतो, वडेट्टीवारांचं विधानसभेत वक्तव्य; गृहराज्य मंत्री म्हणाले....
Embed widget