एक्स्प्लोर

मालेगाव : अब्दुल मलिक गोळीबार प्रकरणी मोठी अपडेट, घटनास्थळी दोन्ही बाजूंनी फायरिंग, आतापर्यंत दोघांना बेड्या

Nashik Malegaon News : मालेगावात माजी महापौर अब्दुल मलिक युनूस इसा यांच्यावर गोळीबार झाल्याची घटना घडली होती. आता याप्रकरणी मोठी अपडेट समोर येत असून आतापर्यंत दोघांना अटक करण्यात आली आहे.

नाशिक : मालेगावात माजी महापौर अब्दुल मलिक युनूस इसा (Malegaon Former Mayor Abdul Malik Yunus Isa) यांच्यावर गोळीबार झाल्याची घटना घडली होती. या हल्ल्यात मलिक हे गंभीर जखमी झाले. आता याप्रकरणी मालेगाव शहर पोलीस स्थानकात (Malegaon Police Station) दोन वेगवेगळे गुन्हे दाखल करण्यात आले आहे. घटनास्थळी दोन्ही बाजूंनी गोळीबार झाला. दोन्ही बाजूकडून सहा राऊंड फायर करण्यात आले, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.  

याबाबत अधिक माहिती अशी की, मालेगावचे माजी महापौर अब्दुल मलिक हे एका हॉटेलवर चहा पिण्यासाठी बसले होते. यावेळी मोटार सायकलवरून आलेल्या अज्ञात हल्लेखोरांनी अगदी जवळून त्यांच्यावर गोळीबार (Firing) करून फरार झाले. या गोळीबारात अब्दुल मलिक हे गंभीर जखमी झाले. या घटनेनंतर शहरात तणावाचे वातावरण पसरले आहे. मालेगावात पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. मालेगावमध्ये (Malegaon News) गोळीबाराच्या घटनेत सातत्यानं वाढ होत असल्यानं कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न गंभीर बनला आहे.

दोन वेगवेगळे गुन्हे दाखल

आता या प्रकरणी मालेगाव शहर पोलीस स्थानकात दोन वेगवेगळे गुन्हे दाखल करण्यात आले आहे. घटनास्थळी दोन्ही बाजूंनी गोळीबार करण्यात आला. दोन्ही बाजूकडून सहा राऊंड फायर करण्यात आले. जमिनीचे खरेदी-विक्री प्रकरण व पूर्व वैमस्यातून हा गोळीबार करण्यात आला. या हल्ल्यात वापरण्यात आलेली दुचाकी, गावठी कट्ट्यासह दोन संशयितांना पोलिसांनी अटक केल्याची माहिती अपर पोलीस अधीक्षक अनिकेत भारती यांनी दिली आहे.

मालेगावात गुंडाराज सुरू, मौलाना मुफ्तींचा आरोप

दरम्यान, एमआयएमसचे आमदार मौलाना मुफ्ती यांनी अब्दुल मलिक यांची भेट घेत घटनेची चौकशी केली आहे. तसेच, हल्लेखोरांना शोधून त्यांना अटक करण्याचीही मागणी आमदार मौलाना मुफ्ती यांनी केली आहे. त्यासोबतच मालेगावात गुंडाराज सुरू असल्याचे आरोप आमदार मुफ्ती यांनी केले आहेत.

इतर महत्वाच्या बातम्या 

मनमाड युनियन बँक घोटाळ्याची आमदार कांदेंकडून दखल, स्वतः फिर्यादी होत अधिकाऱ्यांविरोधात दाखल केला गुन्हा

Nashik Raid : नाशकात सराफाच्या घरात फर्निचर फोडताच मिळाल्या नोटांच्या भिंती, रोकड मोजण्यासाठी 14 तास अन् नेण्यासाठी 7 गाड्यांचा वापर

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

National Highways Act : सरकारने जमीन घेतली, पण पाच वर्ष वापर केलाच नाही, तर आता काय होणार? राष्ट्रीय महामार्ग कायद्यात सुधारणा होणार
सरकारने जमीन घेतली, पण पाच वर्ष वापर केलाच नाही, तर आता काय होणार? राष्ट्रीय महामार्ग कायद्यात सुधारणा होणार
मोठी बातमी : लाच घेताना पकडलेल्या साताऱ्याच्या न्यायाधीशांना मुंबई हायकोर्टाचा झटका, जामीन देण्यास नकार!
मोठी बातमी : लाच घेताना पकडलेल्या साताऱ्याच्या न्यायाधीशांना मुंबई हायकोर्टाचा झटका, जामीन देण्यास नकार!
Beed Crime: बेदम मारुन लेकाला संपवलं, नंतर विकासच्या आई-वडिलांना फोन लावून क्षीरसागर म्हणाला, 'अर्जंट माझ्या घरी या'
बेदम मारुन लेकाला संपवलं, नंतर विकासच्या आई-वडिलांना फोन लावून क्षीरसागर म्हणाला, 'अर्जंट माझ्या घरी या'
Jitendra Awhad : औरंगजेबासारखा व्हिलन होता म्हणून शिवाजी महाराज हिरो झाले; जितेंद्र आव्हाडांच्या वक्तव्यानं वाद आणखी चिघळणार?
औरंगजेबासारखा व्हिलन होता म्हणून शिवाजी महाराज हिरो झाले; जितेंद्र आव्हाडांच्या वक्तव्यानं वाद आणखी चिघळणार?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 02 PM TOP Headlines 02 PM 17 March 2025ABP Majha Marathi News Headlines 01 PM TOP Headlines 01 PM 17 March 2025ABP Majha Marathi News Headlines 12 PM TOP Headlines 12 AM 17 March 2025ABP Majha Marathi News Headlines 11 AM TOP Headlines 11 AM 17 March 2025

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
National Highways Act : सरकारने जमीन घेतली, पण पाच वर्ष वापर केलाच नाही, तर आता काय होणार? राष्ट्रीय महामार्ग कायद्यात सुधारणा होणार
सरकारने जमीन घेतली, पण पाच वर्ष वापर केलाच नाही, तर आता काय होणार? राष्ट्रीय महामार्ग कायद्यात सुधारणा होणार
मोठी बातमी : लाच घेताना पकडलेल्या साताऱ्याच्या न्यायाधीशांना मुंबई हायकोर्टाचा झटका, जामीन देण्यास नकार!
मोठी बातमी : लाच घेताना पकडलेल्या साताऱ्याच्या न्यायाधीशांना मुंबई हायकोर्टाचा झटका, जामीन देण्यास नकार!
Beed Crime: बेदम मारुन लेकाला संपवलं, नंतर विकासच्या आई-वडिलांना फोन लावून क्षीरसागर म्हणाला, 'अर्जंट माझ्या घरी या'
बेदम मारुन लेकाला संपवलं, नंतर विकासच्या आई-वडिलांना फोन लावून क्षीरसागर म्हणाला, 'अर्जंट माझ्या घरी या'
Jitendra Awhad : औरंगजेबासारखा व्हिलन होता म्हणून शिवाजी महाराज हिरो झाले; जितेंद्र आव्हाडांच्या वक्तव्यानं वाद आणखी चिघळणार?
औरंगजेबासारखा व्हिलन होता म्हणून शिवाजी महाराज हिरो झाले; जितेंद्र आव्हाडांच्या वक्तव्यानं वाद आणखी चिघळणार?
बीडच्या शिक्षकाचा मुद्दा सभागृहात, संस्थाचालकावर गुन्हा दाखल होणार; दानवेंचा प्रश्न, गृहमंत्र्यांचे उत्तर
बीडच्या शिक्षकाचा मुद्दा सभागृहात, संस्थाचालकावर गुन्हा दाखल होणार; दानवेंचा प्रश्न, गृहमंत्र्यांचे उत्तर
रिषभ ते अजिंक्य, IPL टीमच्या कॅप्टनला किती पगार?
रिषभ ते अजिंक्य, IPL टीमच्या कॅप्टनला किती पगार?
Aurangzeb Tomb Row: शिवाजी महाराजांच्या पुढच्या पिढ्यांनी औरंगजेबाच्या कबरीला धक्का लावला नाही, मग आताच्या लोकांना कबर का हटवायचेय? खुलताबादच्या फुलविक्रेत्याचा प्रश्न
शिवरायांच्या वंशजांनी औरंगजेबाच्या कबरीला धक्का लावला नाही, मग आताच कबर का हटवायचेय? फुलविक्रेत्याचा प्रश्न
Ajit Pawar : त्यांना सोडणार नाही, त्यांची नावं काढा; जिल्हा बँकेच्या कारभाऱ्यांना अजितदादांचा सज्जड दम!
त्यांना सोडणार नाही, त्यांची नावं काढा; जिल्हा बँकेच्या कारभाऱ्यांना अजितदादांचा सज्जड दम!
Embed widget