IDA World DJ Championship 2025 मध्ये भारतीय डीजेंचा डंका; 40 वर्षांच्या इतिहासात प्रथमच पहिला क्रमांक पटकावला!
IDA World DJ Championship 2025: जागतिक DJ स्पर्धांच्या 40 वर्षांच्या इतिहासात प्रथमच भारतीय DJ नी पहिला क्रमांक मिळवून भारताचा मान उंचावला आहे.

IDA World DJ Championship 2025 वसई : पोलंडमधील क्राकोव्ह येथे 6 डिसेंबर 2025 रोजी झालेल्या आयडीए वर्ल्ड डीजे चॅम्पियनशिपमध्ये (IDA World DJ Championship 2025) भारतीय डीजे जॉनी (DJ Johney) आणि डीजे स्किप (DJ Skip/Skipster) यांनी शोकेस कॅटेगिरी (Showcase Category) मध्ये विश्वविजेतेपद पटकावत इतिहास घडवलाय. जागतिक DJ स्पर्धांच्या 40 वर्षांच्या इतिहासात प्रथमच भारतीय DJ नी पहिला क्रमांक मिळवून भारताचा मान उंचावला आहे.
IDA World DJ Championship 2025: 40 वर्षांच्या इतिहासात प्रथमच पहिला क्रमांक पटकावला!
जगभरातील नामांकित कलाकारांशी स्पर्धा करताना या जोडीने त्यांच्या सर्जनशीलता, तांत्रिक कौशल्य आणि हाय-एनर्जी परफॉर्मन्सने परीक्षकांची मने जिंकली. बासरी आणि ‘Magneto’ या कस्टम-मेड वाद्याच्या अभिनव वापरामुळे त्यांचे रूटीन स्पर्धेतील सर्वात वेगळे ठरले.वसईच्या गल्लीपासून जागतिक मंचापर्यंत पोहोचलेला DJ Johney चा प्रेरणादायी प्रवास आणि बहुगुणी कलाकार DJ Skip यांची ही कामगिरी भारतीय DJ संस्कृतीसाठी मैलाचा दगड ठरली आहे. या स्पर्धेत भारताने पहिला, पोलंडने दुसरा आणि थायलंडने तिसरा क्रमांक पटकावला.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना डॉ. पंजाबराव देशमुख स्मृती पुरस्कार 2025 घोषीत
अमरावती येथील श्री शिवाजी शिक्षण संस्थेतर्फे दिला जाणारा यावर्षीचा 'डॉ. पंजाबराव देशमुख स्मृती पुरस्कार 2025' मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना त्यांच्या राजकीय, सामाजिक व सांस्कृतिक कार्यासाठी देण्यात येणार आहे. पाच लाख रुपये रोख, स्मृतिचिन्ह, मानपत्र, शाल व श्रीफळ असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. शिक्षणमहर्षी डॉ. पंजाबराव उपाख्य भाऊसाहेब देशमुख यांच्या 27 डिसेंबरला आयोजित 127व्या जयंती उत्सवाच्या मुख्य समारंभात या पुरस्काराने मुख्यमंत्र्यांना सन्मानित करण्यात येणार आहे. अशी माहिती संस्थेचे अध्यक्ष हर्षवर्धन देशमुख यांनी दिली.
आणखी वाचा























