HMPV व्हायरस आपलं काहीही वाकडं करु शकणार नाही, भारतीयांमध्ये अगोदरपासून अँटीबॉडीज: CSIR चे माजी महासंचालक डॉ. शेखर मांडेंची महत्वपूर्ण माहिती
HMPV Virus : एचएमपीव्ही व्हायरस हा धोकादायक व्हायरस नाही. तसेच हा व्हायरस भारतात आधीपासूनच अस्तित्वात असलेला व्हायरस असल्याचे मत CSIR चे माजी महासंचालक डॉ. शेखर मांडे यांनी व्यक्त केलं आहे.
HMPV Virus : जगभरात 2020 मध्ये थैमान घातलेल्या कोरोना महामारीनंतर चीनसह इतर अनेक देश आणखी एका धोकादायक व्हायरसच्या विळख्यात सापडले आहे. ह्युमन मेटाप्युमोव्हायरस (HMPV) या चीनमधील नव्या व्हायरसनं जगभरातील देशांची धाकधूक वाढवली आहे. सोमवारी बंगळुरू आणि गुजरातमध्ये या व्हायरसची लागण झालेले रुग्ण आढळून आले होते. आता नागपुरातही एचएमपीव्हीची लागण झालेले दोन रुग्ण आढळून आले आहेत. दोन लहान मुलांचा HMPV अहवाल पॉझिटिव्ह आला होता. सात वर्षांचा मुलगा आणि 13 वर्षांच्या मुलीला HMPV ची लागण झाल्याचं समोर आलं आहे. त्यामुळे राज्यातील आरोग्य विभागसह (Maharashtra Health Department) सर्व प्रशासकीय यंत्रणा अलर्ट मोडवर आल्याचे चित्र आहे.
अशातच, एचएमपीव्ही (HMPV) व्हायरस हा धोकादायक व्हायरस नाही. तसेच हा व्हायरस भारतात आधीपासूनच अस्तित्वात असलेला व्हायरस असल्याचे मत वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन परिषदेचे (CSIR) माजी महासंचालक डॉ. शेखर मांडे यांनी व्यक्त केलं आहे. प्रत्येक भारतीयांमध्ये या व्हायरसच्या विरोधात लढणाऱ्या अँटीबॉडीज आहेत. त्यामुळे भारतीयांनी घाबरण्याची गरज नाही, असेही डॉ. शेखर मांडे म्हणाले. शिवाय या व्हायरसमुळे मृत्यूचा धोकाही नसल्याचं सीएसआयआरचे माजी डायरेक्टर जनरल डॉक्टर शेखर मांडे यांनी सांगितलय.
भारतीयांमध्ये अगोदरपासून अँटीबॉडीज
दुसरीकडे संभाव्य आजाराचा धोका लक्ष्यात घेता HMPV रोखण्यासाठी राज्यासह पुण्यात विशेष खबरदारी घेण्यात येत आहे. पुण्यातील हॉस्पिटल बेड राखीव ठेवण्याच्या हालचालीला आता वेग आला असून आरोग्य विभाग अलर्ट मोडवर आल्याचे चित्र आहे. ह्युमन मेटाप्युमो व्हायरस (HMPV) संदर्भात महाराष्ट्र आरोग्य विभागाने काही सूचना जाहीर केल्या आहेत. त्यात नागरिकांनी कशी काळजी घ्यावी या संदर्भात माहिती देण्यात आली आहे. दरम्यान पुण्यात या व्हायरस संदर्भात खबरदारीसाठी उपाययोजना करण्यात येत आहे. पुण्यातील नायडू हॉस्पिटलमध्ये 350 बेड करण्यात यावी, अस पत्र महापालिका नायडू हॉस्पिटलला देण्यात आले आहे.
डॉ. शेखर माडेंची महत्वपूर्ण माहिती
-लोकांनी घाबरून जाण्याची गरज नाही
-कोरोना सारखा हा नवीन व्हायरस नाहीये
2001 मध्ये डिटेक्ट झाला होता.
त्यामुळे घाबरून जाण्याची गरज नाही.
या व्हायरस विरोधात लढण्यासाठी भारतीयांमध्ये अँटिबाडीज आहेत.
भारतात देखील हा व्हायरस नवीन नाही.
कोरोना सारखीच लक्षण आहे मात्र धोकादायक नाही
या व्हायरसमुळे मृत्यूचा धोका नाही.
नागरिकांना मास्क वापरण्याची शक्ती नाही. मात्र खबरदारी म्हणून
मास्क वापरू शकता.
जुनाच वायरस असल्यामुळे या वायरसचा फार धोका नाही.
काय करावं?
- खोकताना किंवा शिंकताना आपलं तोंड आणि नाकावर रुमाल किंवा टिश्यू पेपर ठेवावा.
- साबण, पाणी किंवा अल्कोहोलवर आधारित सॅनिटायझरनं आपले हात वारंवार धुवावेत.
- ताप, खोकला आणि शिंका येत असल्यास सार्वजनिक ठिकाणांपासून दूर राहा.
- भरपूर पाणी प्या आणि पौष्टिक खा
- संक्रमण कमी करण्यासाठी सर्व ठिकाणी व्हेंटीलेशन होईल, याची दक्षता घ्या.
काय करणं टाळावं?
- खोकलेल्या किंवा शिंकलेल्या हातांनी हस्तांदोलन करणं टाळावं. यामुळे संसर्ग लगेच पसरतो.
- टिश्यू पेपरचा वापर केल्यानंतर तो कचरा पेटीत टाकावा. वारंवार एकाच टिश्यू पेपरचा वापर करणं टाळावं.
- आजारी लोकांपासून लांब राहावं. व्हायरल इन्फेक्शन झालेलं असल्यास शक्यतो रुग्णाच्या जवळ जाऊ नये. शक्य असल्यास त्याला घरातच आयसोलेट करावं.
- डोळे, नाक आणि तोंडाला वारंवार स्पर्श करू नये.
हे ही वाचा
Check out below Health Tools-
Calculate Your Body Mass Index ( BMI )