(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Hingoli: 33 लाखांचा धान्य घोटाळा, तत्कालीन तहसीलदारसह 20 लोकांवर गुन्हा दाखल
Hingoli News: परिविक्षाधीन तहसीलदार असलेल्या हिमालय घोरपडे यांच्या तक्रारीवरून हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Hingoli News: हिंगोली जिल्ह्यात 2019 साली जानेवारी ते जुलै या कालावधी दरम्यान झालेल्या स्वस्त धान्य घोटाळा प्रकरणी अखेर तत्कालीन तहसीलदार यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तीन वर्षांपूर्वी हिंगोलीत झालेल्या स्वस्त धान्य घोटाळा प्रकरणी 33 लाख रुपये वसुलीपात्र रक्कम न भरल्याने अखेर तत्कालीन तहसीलदार गजानन शिंदे आणि स्वस्त धान्य दुकानदार अशा एकूण वीस लोकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हिंगोली पोलिसात मंगळवारी रात्री उशिरा या प्रकरणी फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. परिविक्षाधीन तहसीलदार असलेल्या हिमालय घोरपडे यांच्या तक्रारीवरून हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तीन वर्षांपूर्वी म्हणजेच 2019 मध्ये हिंगोली तहसील कार्यालयाच्या पुरवठा विभागात घोटाळा झाल्याचे समोर आले होते. जानेवारी ते जुलै 2019 या कालावधीत ऑफलाईन धान्य वाटप करताना स्वस्त धान्य दुकानदारांना अतिरिक्ति धान्याचे वाटप केल्याचा प्रकार उघडकीस आला होता. त्यामुळे या सर्व प्रकरणात चौकशी करून घोटाळ्यात सहभागी असलेल्या लोकांना पुरवठा विभागाने नोटीस देऊन अतिरिक्त वाटप झालेल्या धान्याची रक्कम भरण्याच्या सूचना दिल्या होत्या. दरम्यान नोटीस आल्यावर काही लोकांनी रक्कम भरणा देखील केली. परंतु यातील 33 लाख रुपयांची वसुलपात्र रक्कम भरण्यात आली नाही. त्यामुळे नोटीस देऊनही वसुलपात्र रक्कम भरण्यात न आल्याने याप्रकरणी बुधवारी पहाटे हिंगोली शहर पोलिस ठाण्यात 20 जणांविरूद्ध गुन्हा नोंद करण्यात आला आहे. तर पोलिसांकडून या प्रकरणात तपास करण्यात येत आहे.
यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला...
या प्रकरणी हिंगोली तहसीलचे परिविक्षाधिन तहसीलदार हिमालय घोरपडे यांच्या फिर्यादीवरून तत्कालीन तहसीलदार गजानन शिंदे, तत्कालीन अव्वल कारकून कैलास वाघमारे, तत्कालीन गोदामपाल इम्रान पठाण, तत्कालीन अव्वल कारकून बी.बी. खडसे, रास्तभाव दुकानदार रेखा प्रकाश पाईकराव (माळसेलू), पी.आर. गरड (राहोली), ज्ञानेश्वर रामराव मस्के (सिरसम बु.), गोविंदा पुंजाजी मस्के (तिखाडी), गणाजी मुकिंदा बेले (खेर्डावाडी), विनोद लक्ष्मण आडे (पेडगाव1), हिंगोली तालुका विक्री संघ क्र. 1चे चालक, रास्तभाव दुकानदार एस.के. चव्हाण (पळसोना), डी.एम. शिंदे (सावरगाव बं), मिलिंद निवृत्ती पडघन (जुमडा म.), डी.बी. चव्हाण (मौजा), गजानन नामदेव गडदे (गाडीबोरी), अनुसया अंबादास गाडे (वैजापूर), गोपाल तापडीया (भिरडा), डी.बी. चव्हाण (हिरडी), पतिंगराव मस्के (वराडी) यांच्यावर हिंगोली शहर पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
इतर महत्वाच्या बातम्या :