एक्स्प्लोर

Lok Sabha Election 2024 : हिंगोली लोकसभा मतदारसंघातून इच्छुक लागले कामाला, पाहा कोणत्या पक्षातून इच्छुक उमेदवार कोण?

Lok Sabha Election 2024 : हिंगोली लोकसभा मतदारसंघ (Hingoli Lok Sabha Constituency) आपल्या ताब्यात मिळवण्यासाठी सर्वच पक्षाकडून जोरदार तयारी सुरु आहे.

Lok Sabha Election 2024: राज्यात आता लोकसभा निवडणुकीचे (Lok Sabha Election) वारे वाहू लागले असून, सर्वच पक्ष कामाला लागले आहेत. या पार्श्वभूमीवर हिंगोली (Hingoli) लोकसभा मतदारसंघ (Hingoli Lok Sabha Constituency) आपल्या ताब्यात मिळवण्यासाठी सर्वच पक्षाकडून जोरदार तयारी सुरु आहे. त्यामुळे 2024 लोकसभा निवडणुकीसाठी मैदानात उतरण्याची अनेकांकडून तयारी सुरु झाली आहे. शिंदेसेनेचे विद्यमान खासदार हेमंत पाटील हे भाजप-शिवसेना (शिंदे गट) युतीचे उमेदवार राहण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे भाजपकडून सुद्धा अनेक इच्छुकांनी लोकसभा निवडणुकीची तयारी सुरू केली आहे. भाजपचे नेते रामदास पाटील सुमठाणकर, रामराव वडकुते, श्रीकांत पाटील यांच्यासह अनेकजण लोकसभा निवडणुकीसाठी इच्छुक असल्याची चर्चा आहे. 

असा आहे मतदारसंघ! 

हिंगोली लोकसभेमध्ये हिंगोली जिल्ह्यातील वसमत, कळमनुरी, हिंगोली विधानसभा मतदारसंघासह, नांदेड जिल्ह्यातील किनवट, हादगाव विधानसभा मतदारसंघाचा समावेश आहे. त्याचबरोबर यवतमाळ जिल्ह्यातील उमरखेड विधानसभा मतदारसंघाचा देखील समावेश होतो. 

2019 च्या निवडणुकीत काय झालं? 

2019 मध्ये लोकसभा निवडणुकीत हिंगोली मतदारसंघातून दिवंगत खासदार राजीव सातव यांनी माघार घेतली होती. त्यामुळे काँग्रेसमध्ये प्रवेश करणाऱ्या माजी खासदार सुभाष वानखेडे यांना काँग्रेस पक्षाकडून उमेदवारी मिळाली होती. तर शिवसेना- भाजप युतीचे उमेदवार म्हणून हेमंत पाटील रिंगणात होते. यावेळी मोहन राठोड यांनी वंचित बहुजन आघाडीकडून निवडणूक लढवली होती. दरम्यान, यावेळी शिवसेना-भाजपचे उमेदवार खासदार हेमंत पाटील यांनी विजयाचा भगवा फडकावला होता. हेमंत पाटील यांनी एकूण मतांच्या 50.65 टक्के म्हणजेच, 5 लाख 86 हजार इतकी मते मिळवली होती. काँग्रेसचे उमेदवार सुभाष वानखेडे यांना एकूण मताच्या 26.65 टक्के म्हणजेच, 3 लाख 8 हजार एवढी मतं पडली होती. तसेच वंचितचे उमेदवार मोहन राठोड यांनी एकूण मतांच्या 15 टक्के म्हणजेच, 1 लाख 74 हजार इतकी मते घेतली होती. 

महाविकास आघाडीतही इच्छुकांची गर्दी...

आगामी लोकसभा निवडणुकीत हिंगोली मतदारसंघातून निवडणूक लढवण्यासाठी महाविकास आघाडीत सुद्धा इच्छुकांची संख्या मोठी आहे. ज्यात पेशाने डॉक्टर असलेले अंकुश देवसरकर यांच्यासह दिवंगत खासदार राजीव सातव यांच्या पत्नी प्रज्ञा सातव या देखील काँग्रेसकडून लोकसभा निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक आहेत. विशेष म्हणजे आता हिंगोली लोकसभेवर राष्ट्रवादीकडून देखील दावा करण्यात येत असून, माजी मंत्री जयप्रकाश दांडेगावकर लोकसभा निवडणूकीच्या मैदानात उतरण्यासाठी इच्छुक असल्याचं बोललं जात आहे. तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून माजी खासदार सुभाष वानखेडे इच्छुक असल्याची चर्चा आहे. 

मतदारसंघातील 'जातीय' फॅक्टर

हिंगोली लोकसभा मतदारसंघातील राजकीय परिस्थिती पाहता, महाविकास आघाडी एकत्रितपणे रिंगणात उतरल्यास युतीच्या उमेदवाराला चांगलीच टक्कर देऊ शकतात. हिंगोली जिल्ह्यांमध्ये जातीचा फॅक्टर सुद्धा खूप महत्त्वाचा ठरणार आहे. या मतदारसंघांमध्ये मराठा समाजाची मतं निर्णायक असू शकतात. त्यामुळे अनेकवेळा उमेदवारी देताना मराठा समाजाला सुद्धा प्राधान्य देणं, हे पक्षश्रेष्ठींना सोयीचे ठरताना पाहायला मिळालं आहे. त्याचबरोबर आदिवासी आणि बंजारा समाजाच्या मतदानावर सुद्धा उमेदवाराचे भविष्य ठरण्याचा अंदाज वर्तवला जातो. त्यामुळे मराठा समाजासह आदिवासी आणि बंजारा या समाजातील मतदाराकडे उमेदवारांचं कटाक्षानं लक्ष आहे. 

निवडणूक आता सर्वसामान्य नागरिकांच्या हातात 

एकंदरीत पाहायला गेलं तर, लोकसभा निवडणुकीला जवळपास वर्षभराचा कालावधी आहे. मात्र इच्छुक उमेदवारांनी भेटीगाठी सुरु करत खऱ्या अर्थाने लोकसभा निवडणुकीची तयारी आतापासूनच सुरु केली आहे. महाराष्ट्रतील बदललेलं राजकारण, शिवसेनेत पडलेली उभी फूट आणि त्यानंतर नेते मंडळींचे वेगवेगळ्या पक्षात झालेले पक्षप्रवेश हे सगळं बघता लोकसभेची निवडणूक ही उमेदवार किंवा कार्यकर्ते यांच्या हाती राहिली नसून ती निवडणूक आता सर्वसामान्य नागरिकांच्या हातात असल्याचं बोललं जात आहे. त्यामुळे हिंगोली या लोकसभा मतदारसंघातून कोणाला, कोणत्या पक्षातून उमेदवारी मिळणार आणि कोण विजयी होणार याची चर्चा आतापासूनच पाहायला मिळत आहे. 

इतर महत्वाच्या बातम्या : 

Cabinet Expansion : शिरसाट यांच्यानंतर मंत्रीपदाच्या शर्यतीत मराठवाड्यातील आणखी एक नाव; शंभर टक्के मंत्री होण्याचा दावाही केला

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Ashok Chavan : पैशाच्या जोरावर निवडणूक लढवत नाही, रेवंत रेड्डींकडून पक्षनिष्ठेचे धडे मला घेण्याची गरज नाही, अशोक चव्हाण यांचा पलटवार
पैशाच्या जोरावर निवडणूक लढवत नाही, तेलंगणाचा पैसा महाराष्ट्रात आलाय, अशोक चव्हाण यांचा रेवंत रेड्डींवर पलटवार
Land Scam News : 224 एकर जमीन हडपली, 75 एकर उद्योगपतीला भाड्याने दिली; हातकणंगलेतील जमीन घोटाळ्यात आतापर्यंत काय काय झालं?
224 एकर जमीन हडपली, 75 एकर उद्योगपतीला भाड्याने दिली; हातकणंगलेतील जमीन घोटाळ्यात आतापर्यंत काय काय झालं?
Ind vs Aus 1st test : सरप्राईज! BCCI ने धाडला मेसेज, संघात निवड नाही तरी पठ्ठ्या पर्थ कसोटीत खेळणार, कोणाची घेणार जागा?
सरप्राईज! BCCI ने धाडला मेसेज, संघात निवड नाही तरी पठ्ठ्या पर्थ कसोटीत खेळणार, कोणाची घेणार जागा?
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 17 नोव्हेंबर 2024 | रविवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 17 नोव्हेंबर 2024 | रविवार
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Muddyche Bola : दादर-माहिममध्ये कुणाची हवा? ठाकरे, मनसे, शिवसेना; जनतेचा कौल कुणाला?#मुद्द्याचं बोलाAvadiche Khane Ani Rajkiya Tane Bane : Bharatshet Gogawale यांच्याशी निवडणुकीच्या धामधुमीत गप्पाMahesh Sawant : माहीमच्या मुस्लिम समाजाचा मला पाठिंबा, महेश सावंतांचं वक्तव्य ABP MAJHAPratibha Pawar Baramati|प्रतिभा पवार,रेवती सुळेंना बारामतीतील टेक्सटाइल पार्कमध्ये जाण्यापासून रोखले

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Ashok Chavan : पैशाच्या जोरावर निवडणूक लढवत नाही, रेवंत रेड्डींकडून पक्षनिष्ठेचे धडे मला घेण्याची गरज नाही, अशोक चव्हाण यांचा पलटवार
पैशाच्या जोरावर निवडणूक लढवत नाही, तेलंगणाचा पैसा महाराष्ट्रात आलाय, अशोक चव्हाण यांचा रेवंत रेड्डींवर पलटवार
Land Scam News : 224 एकर जमीन हडपली, 75 एकर उद्योगपतीला भाड्याने दिली; हातकणंगलेतील जमीन घोटाळ्यात आतापर्यंत काय काय झालं?
224 एकर जमीन हडपली, 75 एकर उद्योगपतीला भाड्याने दिली; हातकणंगलेतील जमीन घोटाळ्यात आतापर्यंत काय काय झालं?
Ind vs Aus 1st test : सरप्राईज! BCCI ने धाडला मेसेज, संघात निवड नाही तरी पठ्ठ्या पर्थ कसोटीत खेळणार, कोणाची घेणार जागा?
सरप्राईज! BCCI ने धाडला मेसेज, संघात निवड नाही तरी पठ्ठ्या पर्थ कसोटीत खेळणार, कोणाची घेणार जागा?
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 17 नोव्हेंबर 2024 | रविवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 17 नोव्हेंबर 2024 | रविवार
Priyanka Gandhi : प्रियांका गांधी यांचा नागपूरमध्ये रोड शो, काँग्रेस- भाजप आमने सामने, कार्यकर्त्यांची घोषणाबाजी
प्रियांका गांधी यांचा नागपूरमध्ये रोड शो, काँग्रेस- भाजप आमने सामने, कार्यकर्त्यांची घोषणाबाजी
Manipur Violence : मणिपुरात पुन्हा रक्तपात, मुख्यमंत्र्यांसह 10 आमदारांच्या घरावर हल्ला; अमित शाह तीन सभा रद्द करून तडकाफडकी दिल्लीत
मणिपुरात पुन्हा रक्तपात, मुख्यमंत्र्यांसह 10 आमदारांच्या घरावर हल्ला; अमित शाह तीन सभा रद्द करून तडकाफडकी दिल्लीत
Pratibha Pawar Car Stopped : 'ज्यांनी तुम्हाला बोटाला धरुन चालायला शिकवलं त्यांचाच रस्ता तुम्ही आज अडवलाय!', बारामतीच्या घटनेवरुन मविआ आक्रमक
'ज्यांनी तुम्हाला बोटाला धरुन चालायला शिकवलं त्यांचाच रस्ता तुम्ही आज अडवलाय!', बारामतीच्या घटनेवरुन मविआ आक्रमक
Sharad Pawar : काँग्रेसनंतर शरद पवारांचा बंडखोर नेत्यांना दणका, दोघांना थेट घरचा रस्ता, कोण आहेत ते नेते?
काँग्रेसनंतर शरद पवारांचा बंडखोर नेत्यांना दणका, दोघांना थेट घरचा रस्ता, कोण आहेत ते नेते?
Embed widget