![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/Premium-ad-Icon.png)
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Cabinet Expansion : शिरसाट यांच्यानंतर मंत्रीपदाच्या शर्यतीत मराठवाड्यातील आणखी एक नाव; शंभर टक्के मंत्री होण्याचा दावाही केला
Cabinet Expansion :आपण शंभर टक्के मंत्री होणार असल्याचा दावा शिंदे गटाच्या एका आमदाराने केला आहे.
![Cabinet Expansion : शिरसाट यांच्यानंतर मंत्रीपदाच्या शर्यतीत मराठवाड्यातील आणखी एक नाव; शंभर टक्के मंत्री होण्याचा दावाही केला Cabinet Expansion Santosh Bangar name in Cabinet Expansion race marathi news Cabinet Expansion : शिरसाट यांच्यानंतर मंत्रीपदाच्या शर्यतीत मराठवाड्यातील आणखी एक नाव; शंभर टक्के मंत्री होण्याचा दावाही केला](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/06/25/40d23f4e7975f1f53c1e6a999017357b1687671601727737_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Cabinet Expansion : गेल्या काही दिवसांपासून राज्यात मंत्रिमंडळ विस्ताराची जोरदार चर्चा सुरू आहे. अशात शिंदे गटाकडून अनेक इच्छुकांनी आपली इच्छा बोलून देखील दाखवली आहे. ज्यात मराठवाड्यातील संजय शिरसाट (Sanjay Shirsat) देखील मंत्रीपदासाठी इच्छुक आहेत. अशातच आता मराठवाड्यातील आणखी एक नाव मंत्रीपदाच्या शर्यतीत समोर आले आहे. आपण शंभर टक्के मंत्री होणार असल्याचा दावा शिंदे गटाचे आमदार संतोष बांगर (Santosh Bangar) यांनी केला आहे. 'आम्हाला मराठवाड्यात तुमच्या सारखा एक नेता मंत्री करायचा आहे. त्यामुळे तुम्ही काळजीच करू नका, असे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांनी मला सांगितलं असल्याचं देखील बांगर म्हणाले आहेत.
बांगर यांनी शिवसेनेच्या मेळाव्यात बोलताना मंत्रीपदाची इच्छा बोलावून दाखवली. आम्हाला मराठवाड्यात तुमच्या सारखा एक नेता मंत्री करायचा आहे. त्यामुळे तुम्ही काळजीच करू नका, असे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांनी मला सांगितलं आहे. त्यामुळे आपण शंभर टक्के मंत्री होणार आहोत. खरेतर हे सांगणार नव्हतो, मात्र संपर्कप्रमुखांच्या आधीच सांगून टाकले, असे आमदार संतोष बांगर यांनी शिवसेनेच्या मेळाव्यात सांगून टाकले. त्यांच्या या वक्तव्यानंतर कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली.
माज आणून जमत नाही...
हिंगोली येथील विश्रामगृहावर शिवसेनेचा मेळावा आयोजित करण्यात आला होता. यासाठी संपर्कप्रमुख, सहसंपर्कप्रमुख यांच्यासह पदाधिकारी आणि कार्यकर्ते देखील उपस्थित होते. दरम्यान यावेळी बांगर म्हणाले, आमदार असलो तरीही मी तुमच्यासारखाच आहे. जनता पाठीशी असेल, तोपर्यंत पद आहे. त्यामुळे माज आणून जमत नाही. सन्मानाने वागा आणि वागवा. सगळ्यांना सोबत घेऊन चालण्याची भूमिका माझी असून, अशीच भूमिका आपणही ठेवा, असे आवाहन कार्यकर्त्यांना केले.
शिरसाट देखील वेटिंगवर...
राज्यात नव्याने स्थापन झालेल्या शिंदे-फडणवीस सरकारच्या शपथविधीवेळी संजय शिरसाट हे देखील मंत्रीपदाची शपथ घेणार असल्याचे निश्चित समजले जात होते. मात्र ऐनवेळी त्यांचा पत्ता कट झाला. त्यानंतर शिरसाट यांनी अनेकवेळा मंत्रीपदाची इच्छा बोलावून दाखवली. पण मंत्रिमंडळ विस्तार होत नसल्याने शिरसाट वेटिंगवर आहे. विस्तार कधी होणार याचा कोणताही अंदाज नाही. त्यातच आधीच छत्रपती संभाजीनगरमध्ये शिंदे गटाचे दोन आणि भाजपचे एक मंत्री असल्याने आणखी चौथा मंत्री दिला जाणार का? याबाबत देखील उलटसुलट चर्चा आहे. त्यामुळे मंत्रिमंडळाची अधिकृत तारीख जोपर्यंत जाहीर होत नाही, तोपर्यंत इच्छुकांची गर्दी आणि भावी मंत्र्यांची नावाची चर्चा कायम राहणार.
इतर महत्वाच्या बातम्या :
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)