एक्स्प्लोर

निवडणूक निकाल २०२४

(Source: ECI/ABP News/ABP Majha)

Hingoli News : 'भुजबळ, मुंडेंनी पक्ष काढला असता तर इथे मुख्यमंत्री म्हणून आलो असतो', हिंगोलीतील ओबीसी सभेतून जानकर गरजले

Hingoli News : हिंगोलीत ओबीसी सभेचं आयोजन करण्यात आलं असून या सभेला अनेक ओबीसी नेत्यांनी हजेरी लावली. दरम्यान या सभेत महादेव जानकरांनी देखील आरक्षणाच्या मुद्द्यावर भाष्य केलं.

हिंगोली : हिंगोलीमध्ये (Hingoli) ओबीसी सभेचं (Obc Sabha) आयोजन करण्यात आलंय. या सभेला छगन भुजबळांसह अनेक ओबीसी नेते उपस्थित होते. 'छगन भुजबळ, गोपीनाथ मुंडेंनी पक्ष काढला असता तर मी इथे मुख्यमंत्री म्हणून आले असतो', असं वक्तव्य महादेव जानकर (Mahadev Jankar) यांनी केलं. दरम्यान या ओबीसीमधून अनेक मुद्द्यावर भाष्य महादेव जानकरांनी केलं. 

मनोज जरांगे यांनी मराठा समाजाला सरसकट ओबीसीमधून आरक्षण देण्याची मागणी केली आहे. दरम्यान, यासाठी त्यांनी महाराष्ट्राचा दौरा देखील केला. तर, 24 डिसेंबरपर्यंत मराठा आरक्षणाचा मुद्दा मार्गी लावणार असल्याचं सरकारने म्हटले असल्याचा दावा देखील जरांगे यांच्याकडून केला जात आहे. परंतु, मराठा समाजाचा ओबीसीमध्ये समावेश करून सरसकट आरक्षण देण्यासाठी मंत्री छगन भुजबळ यांच्यासह अनेक ओबीसी नेत्यांचा विरोध होत आहे. त्यामुळे हा विरोध दाखवण्यासाठी रविवार 26 नोव्हेंबर रोजी  हिंगोलीत भव्य ओबीसी सभा आयोजित करण्यात आलं.

भुजबळांसोबत युती करण्यास आम्ही तयार - महादेव जानकर

भुजबळ साहेब तुम्ही कमांडर बना, डिमांडर नको. ज्यांना सोबत यायचे ते येतील. आम्ही तुमच्या सोबत युती करायला तयार आहोत पण त्यांच्यासोबत युती करणार नाही, असं ठणकावून महादेव जानकरांनी ओबीसी सभेमधून ठणकावून सांगितलं. आम्ही पैशालाही कमी नाही. मी 100 वंजाऱ्यांना सांगेल 1 - 1 कोटी रुपये द्या. आज  छगन भुजबळ, गोपीनाथ मुंडे एकत्र आले असते तर आमच्यावर ही वेळ आली नसती, असं वक्तव्य देखील महादेव जानकरांनी ओबीसी सभेतून केलं. 

पुढच्या वेळेस दलित आणि मुस्लीम यांना सोबत घ्या - जानकर

छोट्या लोकांना तिकीट मागायला कशायला जायचं? आम्ही कमांडर आहोत. उत्तर प्रदेशात मुलायम सिंग यांनी पक्ष काढला म्हणून त्यांचा मुलगा मुख्यमंत्री झाला. त्यामुळे भुजबळ पुढच्या वेळेस दलित आणि मुस्लीम यांना देखील सोबत घ्या, असं जानकरांनी म्हटलं. 

सभेला 'हे' नेते उपस्थित

मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी ओबीसी जनमोर्चाचे अध्यक्ष प्रकाश अण्णा शेंडगे, प्रमुख मार्गदर्शक म्हणून मृद व जलसंधारण मंत्री संजय राठोड, विशेष निमंत्रितनामध्ये चंद्रशेखर बावनकुळे, नाना पटोले, जयदत्त क्षीरसागर, विनय कोरे, बबनराव तायवाडे, विजय चौगुले, प्रा. टी.पी. मुंडे, शब्बीर अहमद अन्सारी, सुनील महाराज, लक्ष्मणराव गायकवाड, मच्छिद्र भोसले, चंद्रकांत बावकर, कल्याण दळे, राजेश राठोड यांच्यासह स्थानिक नेते मंडळी उपस्थित राहणार असल्याची माहिती देण्यात आली होती. 

हेही वाचा : 

Manoj Jarange On Chhagan Bhujbal : ओबीसी सभेपूर्वी जरांगेंचा पुन्हा एकदा छगन भुजबळांवर हल्लाबोल; वाचा नेमकं काय म्हणाले?

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Vidhansabha Election 2024 : काँग्रेसची धुळधाण, पृथ्वीराज चव्हाण, यशोमती ठाकूर , बाळासाहेब थोरातांचा पराभव, महाराष्ट्रात महायुतीचा डंका
काँग्रेसची धुळधाण, पृथ्वीराज चव्हाण, यशोमती ठाकूर , बाळासाहेब थोरातांचा पराभव, महाराष्ट्रात महायुतीचा डंका
Amruta Fadnavis on Vidhan Sabha Result | ही लँडस्लाईड विक्ट्री, मिस फडणवीसांची प्रतिक्रिया
Amruta Fadnavis on Vidhan Sabha Result | ही लँडस्लाईड विक्ट्री, मिस फडणवीसांची प्रतिक्रिया
काय झाडी, काय डोंगरवाल्या शहाजी बापूंचा पराभव; सांगोल्यातून शेकापचे बाबासाहेब देशमुख विजयी
काय झाडी, काय डोंगरवाल्या शहाजी बापूंचा पराभव; सांगोल्यातून शेकापचे बाबासाहेब देशमुख विजयी
वसई-विरारमध्ये बहुजन विकास आघाडीला जबर धक्का, 35  वर्षांची एकहाती असलेली सत्ता गमावली
वसई-विरारमध्ये बहुजन विकास आघाडीला जबर धक्का, 35 वर्षांची एकहाती असलेली सत्ता गमावली
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Narayan Rane On Vidhan Sabha Result : महाराष्ट्रात आता तोंड दाखवू नका, उद्धव ठाकरेंवर सडकून टीकाAmruta Fadnavis on Vidhan Sabha Result | ही लँडस्लाईड विक्ट्री, मिस फडणवीसांची प्रतिक्रियाAditi Tatkare Win Vidhan Sabha Election | राष्ट्रवादीच्या आदिती तटकरेंचा दणदणीत विजय ABP MajhaRaju Waghamare on CM : एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचा मुख्यमंत्रिपदावर दावा #electionresults2024

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Maharashtra Vidhansabha Election 2024 : काँग्रेसची धुळधाण, पृथ्वीराज चव्हाण, यशोमती ठाकूर , बाळासाहेब थोरातांचा पराभव, महाराष्ट्रात महायुतीचा डंका
काँग्रेसची धुळधाण, पृथ्वीराज चव्हाण, यशोमती ठाकूर , बाळासाहेब थोरातांचा पराभव, महाराष्ट्रात महायुतीचा डंका
Amruta Fadnavis on Vidhan Sabha Result | ही लँडस्लाईड विक्ट्री, मिस फडणवीसांची प्रतिक्रिया
Amruta Fadnavis on Vidhan Sabha Result | ही लँडस्लाईड विक्ट्री, मिस फडणवीसांची प्रतिक्रिया
काय झाडी, काय डोंगरवाल्या शहाजी बापूंचा पराभव; सांगोल्यातून शेकापचे बाबासाहेब देशमुख विजयी
काय झाडी, काय डोंगरवाल्या शहाजी बापूंचा पराभव; सांगोल्यातून शेकापचे बाबासाहेब देशमुख विजयी
वसई-विरारमध्ये बहुजन विकास आघाडीला जबर धक्का, 35  वर्षांची एकहाती असलेली सत्ता गमावली
वसई-विरारमध्ये बहुजन विकास आघाडीला जबर धक्का, 35 वर्षांची एकहाती असलेली सत्ता गमावली
Solaur vidhansabha : राम सातपुतेंचा 6 महिन्यात दुसरा पराभव; मोहिते पाटलांची साथ ठरली 'उत्तम'; माळशिरसमधून जानकरांनी झेंडा रोवला
राम सातपुतेंचा 6 महिन्यात दुसरा पराभव; मोहिते पाटलांची साथ ठरली 'उत्तम'; माळशिरसमधून जानकरांनी झेंडा रोवला
Man Vidhan Sabha Election Result 2024 :  जयकुमार गोरे यांचा दणदणीत विजय, माणचे पुन्हा मानकरी, प्रभाकर घार्गेंचा पराभव करत विजयाचा चौकार मारला
जयकुमार गोरे यांचा दणदणीत विजय, माणचे पुन्हा मानकरी, प्रभाकर घार्गेंचा पराभव करत विजयाचा चौकार मारला
Vidhan Sabha Constituency Election Result 2024: राज्याची सत्ता महायुतीकडेच; तुमच्या भागातील आमदार कोण? पाहा संपूर्ण यादी!
राज्याची सत्ता महायुतीकडेच; तुमच्या भागातील आमदार कोण? पाहा संपूर्ण यादी!
Kolhapur Uttar Vidhan Sabha : कोल्हापूर उत्तरच्या वादळात राजेश क्षीरसागरांनीच दिवा लावला! राजेश लाटकरांची झुंज अपुरी पडली
कोल्हापूर उत्तरच्या वादळात राजेश क्षीरसागरांनीच दिवा लावला! राजेश लाटकरांची झुंज अपुरी पडली
Embed widget