(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Hingoli Rain Update : हिंगोली जिल्ह्यात मागील 24 तासात सरासरी 71.30 मिमी पावसाची नोंद; पहिल्यांदाच कयाधू नदीला पूर
Hingoli Rain Update : हिंगोली जिल्ह्यात आतापर्यंत सरासरी 243.30 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे.
Hingoli Rain Update : पावसाळा सुरु होऊन देखील हिंगोली (Hingoli) जिल्ह्यात गेल्या दीड महिन्यात अजूनही सर्वदूर जोरदार पाऊस (Rain) पाहायला मिळालेला नाही. दरम्यान अशात मागील तीन-चार दिवसांत कमी-अधिक पाऊस पडताना पाहायला पाहायला मिळत आहे. परभणी जिल्ह्यात आज सकाळी 8.00 वाजेपर्यंत मागील 24 तासांत 71.30 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. तर जिल्ह्यात आतापर्यंत सरासरी 243.30 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. जिल्ह्यात आतापर्यंत वार्षिक सरासरीच्या 30.59 टक्के इतकी पावसाची नोंद झाली आहे. हिंगोलीत (19 जुलै) रोजी सकाळी 8.00 वाजेपर्यंत मागील 24 तासांत झालेला पावसाची मिलीमीटर मध्ये तालुकानिहाय देखील नोंद करण्यात आली आहे.
तालुकानिहाय पावसाची नोंद...
हिंगोली 108 (316.70) मि.मी., कळमनुरी 54.10 (237.20) मि.मी., वसमत 61.30 (218.30) मि.मी., औंढा नागनाथ 77.80 (225.40) मि.मी, सेनगांव 49.40 (203.30) मि.मी पाऊस झाला आहे. याप्रमाणे जिल्ह्यात आतापर्यंत सरासरी 243.30 मि.मी. पावसाची नोंद झाली असल्याचे जिल्हाधिकारी कार्यालयाने कळविले आहे.
88 टक्के पेरण्या आटोपल्या
जून महिना कोरडा गेल्यावर जुलैच्या दुसऱ्या आठवड्यापर्यंत दडी मारलेल्या पावसाने आता हजेरी लावल्याने शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. त्यामुळे पेरण्यांनाही गती आली असून 88 टक्के पेरण्या उरकल्या आहेत. यात सर्वाधिक 2 लाख 43 हजार 390 हेक्टर क्षेत्रावर सोयाबीनचा पेरा झाला आहे. जुलैच्या पहिल्या आठवड्यात केवळ 6 टक्के पेरण्या झाल्या होत्या. त्यानंतर ऐनवेळी पावसाने हजेरी लावली असल्याने, टक्केवारी वाढली असून जुलैच्या दुसऱ्या आठवडा अखेर तब्बल 88 टक्के पेरण्या आटोपल्या आहेत. दरम्यान, जिल्ह्यात जवळपास 88 टक्के पेरण्या झाल्या असून हिंगोली तालुक्यात 93 टक्के, कळमनुरी 83 टक्के, वसमत 87 टक्के, औंढा ना. 87 टक्के तर सेनगाव तालुक्यात 90 टक्के पेरण्या झाल्या आहेत.
यावर्षीच्या पावसाळ्यात पहिल्यांदाच कयाधू नदीला पूर
यावर्षी जून महिना कोरडा गेला, तर जुलै महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात पावसाला सुरवात झाली. मोठा पाऊस पडत नसल्यामुळे शेतकऱ्यांची देखील चिंता वाढली होती. मात्र जुलै महिन्याच्या चौ्थ्या आठवड्यात पावसाला जोरदार सुरुवात झाली. तर यावर्षीच्या पावसाळ्यात पहिल्यांदाच शहरातून वाहणाऱ्या कयाधू नदीला पूर आला आहे. जिल्ह्यातील ओढे, नालेही खळखळून वाहू लागले आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. विशेष म्हणजे या पावसामुळे दुबार पेरणीचे संकट टळले आहे.
इतर महत्वाच्या बातम्या: