(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Hingoli News: हिंगोलीच्या शेतकऱ्याला शिमला मिरचीने केले मालामाल; मिळतेय लाखोचे उत्पादन
हिंगोलीच्या खंदारबन जवळा येथील शेतकरी सदाशिव चव्हाण यांनी यांच्याकडे असलेल्या शेती पैकी 20 गुंठे शेतीवर शेडनेट उभारून 2 बाय 2 अशा पद्धतीने बेड तयार केला.
Farmer Success Stories : पारंपरिक शेतीला फाटा देत हिंगोलीच्या (Hingoli News) खंदारबन जवळा येथील एका तरुण शेतकऱ्याने शिमला मिरचीच्या (Capsicum) पिकाचा यशस्वी प्रयोग केला आहे. शिमला मिरचीची लागवड करत फक्त तीन महिन्यांमध्ये तीन लाख रुपयाचा नफा कमवत आहेत. शेती फायद्याची नाही असं म्हणणाऱ्या अनेक तरुणांसमोर एक वेगळा आदर्श निर्माण केला आहे. सदाशिव चव्हाण असे या शेतकऱ्याचे नाव आहे.
हिंगोलीच्या खंदारबन जवळा येथील शेतकरी सदाशिव चव्हाण यांनी यांच्याकडे असलेल्या शेती पैकी 20 गुंठे शेतीवर शेडनेट उभारून 2 बाय 2 अशा पद्धतीने बेड तयार केला. या बेडवर साडेसात हजार शिमला मिरचीचे रोपटे लावत चांगल्या पद्धतीने नियोजन करत ठिबकच्या माध्यमातून या शिमला मिरचीला पाणी देत चांगल्या पद्धतीने उत्पादन घेतले आहे. शेतकरी सदाशिव चव्हाण या शेतातून दररोज 60 ते 70 किलो शिमला मिरची वसमतच्या बाजारपेठेत विक्रीसाठी पाठवतात. बाजारात शिमला मिरचीची आवक कमी असल्याने त्यांच्या शिमला मिरचीला भावही चांगला मिळतोय.
सध्य शिमला मिरचीला बाजारात साठ ते सत्तर रुपये प्रति किलो प्रमाणे शिमला मिरची लागवड बाजारात भाव मिळत आहे. त्यामुळे शेतकरी सदाशिव चव्हाण यांचा चांगला फायदा होतोय. या सर्व शिमला मिरचीच्या उत्पादनातून तीन ते चार लाख रुपयांचे उत्पन्न मिळत आहे. खर्च वगळता शेतकरी सदाशिव चव्हाण यांना तीन लाख रुपयाचा फायदा होतोय असे ते सांगतात.
बळीराजाचे पावसासाठी साकडे
मराठवाडा आणि विदर्भामध्ये दरवर्षी मृग नक्षत्रांमध्ये पेरणी करण्यात येते. परंतु या वर्षी बिपरजॉय चक्रीवादळामुळे मान्सून लांबणीवर पडला आहे. यामुळे बळीराजाच्या चिंतेत मात्र भर पडली आहे. राज्यात पावसाच्या विश्वासावर शेतकऱ्यांनी त्यांच्या शेतीच्या मशागतीची कामे पूर्ण केली होती. तसेच हळदी आणि सोयाबिन पिकांसाठी शेतकऱ्यांनी मशागतीची तयारी पूर्ण केली होती. पंरतु मान्सूनने अजूनही योग्य प्रमाणात हजेरी न लावल्यामुळे आता पेरणी कशी करायची असा प्रश्न आता शेतकऱ्यांसमोर उभा राहिला आहे.एक ते दिड महिन्यांपासून शेतीच्या मशागतीची कामे पूर्ण करुन शेतकरी आता मान्सूनच्या प्रतिक्षेत आहेत. मशागत करुन लवकर पाऊस न पडल्यामुळे दुबार मशागत करावी लागणार असल्याची चिंता आता शेतकऱ्यांना लागून राहिली आहे. यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक नुकसानीचा देखील सामना करावा लागत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना लागून राहिलेली मान्सूनची प्रतिक्षा कधी संपणार याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.
हवामान खात्याने यंदा लवकर आणि वेळेत मान्सून दाखल होईल असा अंदाज वर्तवला होता. त्यामुळे शेतकऱ्यांनी देखील हजारो रुपये खर्च करुन पेरणासाठी लागणाऱ्या बियाणांची खरेदी केली होती. परंतु अद्यापही योग्य प्रमाणात पाऊस पडला नसल्यामुळे पेरणी वेळेवर होणार की नाही असा प्रश्न आता शेतकऱ्यांसमोर उभा आहे. दरवर्षी लवकर होणाऱ्या मूग आणि उडदाच्या पिकांची पेरणी देखील यावेळी उशिरा होणार असल्याचं म्हटलं जात आहे.