(Source: ECI/ABP News/ABP Majha)
आंघोळ करतानाचे फोटो व्हायरल करण्याची धमकी देत विवाहितेवर अत्याचार; हिंगोलीतील संतापजनक प्रकार
Hingoli Crime News: धक्कादायक म्हणजे आरोपी गेल्या वर्षभरापासून फोटो व्हायरल करण्याची धमकी देत ब्लॅकमेल करत होता.
Hingoli Crime News: हिंगोली जिल्ह्यात (Hingoli District) एक संतापजनक प्रकार समोर आला असून, आंघोळ करतानाचे फोटो व्हायरल करण्याची धमकी देत एका 25 वर्षीय विवाहितेवर अत्याचार करण्यात आला आहे. या घटनेने परिसरात खळबळ उडाली असून, पीडिताच्या तक्रारीवरून एकाविरुद्ध हिंगोली ग्रामीण पोलिस ठाण्यात 4 फेब्रुवारी रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. परमेश्वर प्रकाश कोरडे असे आरोपीचे नाव आहे. धक्कादायक म्हणजे आरोपी गेल्या वर्षभरापासून फोटो व्हायरल करण्याची धमकी देत ब्लॅकमेल करत होता.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, हिंगोली तालुक्यात हा प्रकार उघडकीस आला. पीडित महिला ही आंघोळ करत असताना आरोपीने तिचे 2021 मध्ये फोटो काढले होते. त्यानंतर हे फोटो सोशल मीडियावर टाकण्याची धमकी देत घरात शिरला आणि 6 फेब्रुवारी 2022 पासून त्याने अत्याचार सुरु केला. तसेच जबरदस्तीने मोबाईलही वापरण्यासाठी दिला. या त्रासाला कंटाळून पीडित महिलेने हा प्रकार पती, सासू-सासऱ्यांना सांगितला. त्यानंतर हा सर्व प्रकार समोर आला आणि आरोपीच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आरोपी परमेश्वर प्रकाश कोरडे याने 2021 मध्ये पीडित महिला आंघोळ करत असताना, गुपचूप तिचे नको त्या अवस्थेत फोटो काढले. तसेच पुढे तेच फोटो सोशल मीडियावर व्हायरल करण्याची महिलेला धमकी दिली. हेच फोटो दाखवत धमकी देत, बळजबरीने महिलेवर अत्याचार केला. या घटनेने महिला प्रचंड घाबरली होती. पण आपले फोटो व्हायरल होतील, या भीतीने तिने कुठेच याची वाच्यता केली नाही. दरम्यान आरोपीकडून होणार त्रास अधिक वाढल्याने तिने अखेर घडलेला सर्व प्रकार पती, सासू-सासऱ्यांना सांगितला. त्यामुळे ते जाब विचारण्यासाठी गेले असता त्यांनाही, आरोपीने शिवीगाळ करून धमकी दिली. त्यामुळे अखेर पीडिताच्या तक्रारीवरून परमेश्वर प्रकाश कोरडे याच्याविरुद्ध हिंगोली ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
वर्षभरापासून करत होता ब्लॅकमेल!
आरोपी परमेश्वर कोरडे हा पीडित महिलेला गेल्या वर्षभरापासून ब्लॅकमेलिंग करत होता. त्याने 2021 ला पिडीत महिलेचा अांघोळ करताना फोटो काढला होता. तसेच हा फोटो व्हायरल करण्याची धमकी देऊन महिलेवर अत्याचार करायचा. गेल्या वर्षभरापासून तो महिलेला सतत ब्लॅकमेलिंग करत होता. त्यामुळे पीडित महिला देखील प्रचंड घाबरली होती. पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केला असून, पुढील तपास करण्यात येत आहे.
इतर महत्वाच्या बातम्या!
Hingoli News : लम्पीचा कहर थांबेना! हिंगोलीत आतापर्यंत तीन हजारपेक्षा अधिक जनावरे झाली बाधित