Health Tips : महिलांमध्ये हाडं ठिसूळ होण्याचं प्रमाण नेमकं का वाढतं? वाचा यामागचं कारण, लक्षण आणि उपाय
Health Tips : हाडं ठिसूळ होणे याला वैद्यकीय भाषेत ऑस्ट्योपोरॉसिस असंही म्हणतात.

Health Tips : सध्या हिवाळ्याचे दिवस सुरु आहेत. थंडीच्या दिवसांत हाडं ठिसूळ होण्याचं प्रमाण, तसेच सांधेदुखीचा त्रास मोठ्या प्रमाणात होतो. विशेषत: महिलांमध्ये मासिक पाळी गेल्यानंतर त्यांची हाडं ठिसूळ होण्याचं प्रमाण फार वाढतं. त्याचप्रमाणे, वयोमानाने सुद्धा हाडं ठिसूळ होतात. अशा वेळी यावर उपचार नेमके कोणते घ्यायचे? हाडं ठिसूळ नेमकी कशामुळे होतात आणि हाडं ठिसूळ होऊ नयेत यासाठी कोणती काळजी घ्यायची यांसारखे अनेक प्रश्न तुम्हाला पडले असतील. तर, याच संदर्भात अत्यंत महत्त्वाची माहिती आजच्या आपल्या 'डॉक्टर टिप्स' (Doctor Tips) या विशेष कार्यक्रमाच्या माध्यमातून जाणून घेऊयात.
या संदर्भात, डॉ. श्रद्धा मोरे संधिवात तज्ज्ञ (सहाय्यक प्राध्यापिका, KEM) म्हणतात की, हाडं ठिसूळ होणे याला वैद्यकीय भाषेत ऑस्ट्योपोरॉसिस असंही म्हणतात. महिलांची पाळी जेव्हा जाते ज्याला मेनोपॉझ म्हणतात. तेव्हा त्यांची हाडं ठिसूळ होणं ही फार सामान्य गोष्ट आहे.
कमी वयात हाडं ठिसूळ होण्याची कारणं बघायची असतील तर संधीवात हे त्यामागील कारण आहे. वेगवेगळ्या प्रकारचे संधीवात असतात. त्यामध्येसुद्धा प्रीमॅच्युअरली हाडं ठिसूळ होऊ शकतात. आणि ऑस्ट्योपोरॉसिस होऊ शकतो.
हाडांच्या ठिसूळ होण्याची लक्षणे कोणती?
अंग दुखणं किंवा हाडं दुखणं हे असू शकतं. पण सगळ्यात महत्त्वाचं लक्षण जे आहे ऑस्ट्योपोरायटीसचं ते म्हणजे फ्रॅक्चर होणं. हे फ्रॅक्चर कुठेही असू शकतं. जसं की, हातांच्या रेडियस हाडांमध्ये, मनगटाजवळ, किंवा पाठीच्या मणक्याच्या हाडांमध्ये फ्रॅक्चर होणं. या काही जागा आहेत जिथे हाडं ठिसूळ होण्यामुळे फ्रॅक्चर होऊ शकतं.
हाडं किती ठिसूळ झाली हे कसं कळेल?
एक्स रेमध्ये थोड्याफार प्रमाणात हाडं ठिसूळ झालेली दिसतात. पण एक जर कन्फर्म निदान द्यायचं असेल तर डेक्सा (Dxa) नावाचा एक स्कॅन येतो. जो हाडांचा स्कॅन असतो. या स्कॅनमध्ये कळून येतं की हाडं किती प्रमाणात ठिसूळ झाली आहेत. आणि त्याप्रमाणे कोणती ट्रीटमेंट करण्याची गरज आहे.
हाडं ठिसूळ न होण्यासाठी 'ही' काळजी घ्या
सर्वात महत्त्वाचं म्हणजे व्यायाम करणं फार महत्त्वाचं आहे. व्यायामामुळे हाडं बळकट होतात. तुम्ही धावा, चाला मात्र, व्यायाम करणं गरजेचं आहे. किंवा मग हाडं बळकट करण्यासाठी डॉक्टरांच्या सल्ल्याने उपचार करा.
पाहा व्हिडीओ :
महत्त्वाच्या बातम्या :
Health Tips : संधिवात म्हणजे काय? संधिवात टाळण्यासाठी कशी काळजी घ्यावी? वाचा तज्ज्ञांचा सल्ला
Check out below Health Tools-
Calculate Your Body Mass Index ( BMI )























