एक्स्प्लोर

ग्रामदेवता : खरसुंडी गावचे जागृत ग्रामदैवत श्रीसिद्धनाथ

सांगली : माणदेशाचे आराध्य दैवत आणि लाखो भाविकांचे श्रध्दास्थान म्हणजे खरसुंडीचा सिद्धनाथ. सांगली जिल्हातील आटपाडी तालुक्यामध्ये श्री खरसुंडी सिध्दाचे सुमारे ११२५ वर्षापूर्वीचे प्राचीन देवस्थान आहे. मंदिराची रचना हेमाडपंथी श्री सिध्दनाथांचे मंदीर दक्षिणाभिमुख, पुरातन आणि दगडी असून त्याचे बांधकाम हेमाडपंथी आहे. मुख्य प्रवेशद्वार, नगारखाना, सभामंडप, गाभारा आणि प्रदक्षिणा मार्ग अशी मंदिराची रचना आहे. मंदिरातील नगारखाना तर नक्षीकाम शैलीचा उत्कृष्ट नमुना असल्याचे याठिकाणी पहायला मिळते. मुख्य प्रवेशद्वार, नगारखाना, सभामंडप, गाभारा आणि प्रदक्षिणा मार्ग अशी या मंदिराची रचना आहे. सभामंडपावर पूर्वीचे पत्र्याचे छत आहे. खारसुड सिद्धाची आख्यायिका औंध संस्थानाचे अधिपती बाळासाहेब महाराज यांच्या सूचनेवरून प्रसिध्द कारखानदार किर्लोस्कर यांनी हा मंडप बांधला आहे. गाभार्‍यात पन्नास किलो चांदीने मढवलेल्या मखरामध्ये श्री सिध्दनाथ व बाळाईदेवीची मूर्ती आहे. शंकराच्या देवालयात नंदी असतो असा प्रघात आहे. परंतु या देवापुढे ज्या कालवडीच्या स्तनातून दूध निघून ‘खारसुड सिद्ध’ तयार झाले त्या गोमातेची सुंदरशी पितळी प्रतिमा आहे. या ग्रामदेवतेची आख्यायिकाही अतिशय मनोरंजक आहे. मायाप्पा गवळी नावाच्या एका भक्ताला दृष्टांत होऊन सिध्दनाथाच्या कृपेने त्याच्या खिलारीतील एका कालवडीच्या स्तनातून दुधाची धार सुरू झाली. या कच्च्या दुधाचा खरवस होऊन त्यातून दोन लिंग तयार झाली. म्हणून या स्थानास खरसुंडी सिध्द-खरवस, शुंड सिध्द असे नांव प्राप्त झाले. या देवाची चैत्र वद्य द्वादशीला भरणारी चैत्र यात्रा वर्षतील महत्वाची यात्रा आहे. या यात्रेला संपूर्ण महाराष्ट्रसह कर्नाटक मधून देखील भाविक येतात. या यात्रेत सासनकाठ्या मिरवणूक आणि पालखी सोहळा पाहण्यासासारखा असतो. श्रींची विशेष कापडीपूजा आणि पत्रीपूजा गाभार्‍यावर सुमारे १५० फूट उंचीचे शिखर आहे.शिखरावर भक्तगणांनी अर्पण केलेला सुवर्णकलश असून त्याची स्थापना करवीर पीठाचे शंकराचार्य यांच्या हस्ते करण्यात आली. श्री सिद्धनाथ मंदिराचा दिवस नित्य पहाटे चार वाजता सनई-चौघडा वादनाने सुरू होतो. त्यानंतर मूर्तीस अभिषेक घालून पत्रीपूजा बांधण्यात येते. पत्रीपूजेनंतर ’श्रीं’ची कापडी पूजा बांधण्यात येते. संपूर्णपणे कापडाचा वापर करुन विविध रूपात बांधण्यात येणारी पूजा हे येथील प्रमुख वैशिष्टय आहे. नवरात्र उत्सवामध्ये देखील दररोज वेगवेगळ्या प्रकारे पूजा बांधली जाते. खरसुंडी गावातील पुजारी मंडळींकडून सिद्धनाथांची विविध स्वरुपात पूजा बांधली जाते. भल्या पाहाटे श्रींच्या मूर्तीस गरम पाण्याने स्नान घालण्यात येते. देवांना कौल लावला जातो. त्यानंतर श्रींची सुंदर अशी पूजा बांधण्यात येते. दररोज श्रींची वेगवेगळ्या स्वरुपात पूजा करण्यात येते. पूजेसाठी विविध प्रकारचे प्राणी वापरतात. त्यामध्ये घोडा,हाती,नाग,सिंह असे अनेक प्राणी वापरले जातात. या पूजा अशा प्रकारे बांधल्या जातात की बघणाऱ्यांच्या डोळ्याचे पारणे फिटते. सशाची पारध माघ पौर्णिमेस परशुराम लोणारी या भक्ताची आठवण म्हणून “ सशाची पारध ” वाटली जाते. मोठ्या उत्सवात पालखी सोहळा रंगतो. त्यास 'पारधी पौर्णिमा उत्सव' असे म्हणतात. ही परंपरा वर्षानुवर्षे सुरु आहे. सशाचे मांस तसेच मीठ व गुलाल यांच्या मिश्रणापासून ही पारध बनवली जाते. वर्षभर विविध उत्सवांचं आयोजन मंदिरात वर्षभर अनेक प्रकारचे उत्सव साजरे केले जातात. यात चैत्रपाडवा, रामनवमी, नाथअष्टमी, चैत्र वद्य दशमी, चैत्र यात्रा, नवरात्रौत्सव, देव सीमोल्लंघन शिकारीसाठी प्रस्थान, पालखी सोहळा,  माघ पौर्णिमा, श्रीनाथ जन्मकाळ, कार्तिक वद्य प्रतिपदा ते अष्टमी, पौष शुद्ध त्रयोदशी, अधिकमास यांचा समावेश होतो. याठिकाणची सासणकाठ्यांची परंपरा अतिशय प्रसिद्ध आहे. नवसाच्या सासणकाठ्या, मानाची सासणे, श्री सिद्धनाथांच्या पालखीवर मुक्तपणे भाविक गुलाल- खोबऱ्याची उधळण करतात. यावेळी भाविक गुलालाने अक्षरशः न्हाऊन निघतात. खरसुंडी नगरीतील मंदिर परिसर, गावातील सर्व रस्ते, गावचा परिसर गुलालाने व भाविकांनी खचाखच भरलेला असतो. 'नाथबाच्या नावानं चांगभलं', 'सासनाचं चांगभलं'च्या जयघोषाने परिसर दुमदुमुन निघतो. ढोल-ताशांच्या निनादावर सासणकाठ्या नाचत असतात. हे मनोहारी दृष्य नजरेत साठवून ठेवण्यासाठी लाखो भाविक येथे हजेरी लावतात. या सगळ्या वैशिष्ट्यांमुळेच खरसुंडीचं ग्रामदैवत असलेल्या सिद्धनाथाच्या दर्शनाला जायलाच हवं. पाहा व्हिडीओ
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Tuljapur News : तुळजापुरात भाजप आणि माविआच्या कार्यकर्त्यांमध्ये राडा, तुफान हाणामारी करत हवेत गोळीबार; काँग्रेस उमेदवाराचा पुतण्या गंभीररित्या जखमी
तुळजापुरात भाजप आणि माविआच्या कार्यकर्त्यांमध्ये राडा, तुफान हाणामारी करत हवेत गोळीबार; काँग्रेस उमेदवाराचा पुतण्या गंभीररित्या जखमी
माजी मंत्र्यांचा पुतण्या बांधणार भाजपमधील नाराज बंडखोरांची मोट, अकोल्यात स्थापन होणार नवी आघाडी
माजी मंत्र्यांचा पुतण्या बांधणार भाजपमधील नाराज बंडखोरांची मोट, अकोल्यात स्थापन होणार नवी आघाडी
दिलासादायक! चार दिवसानंतर सोन्याच्या दरात घसरण, सध्या किती दर? पुढच्या काळात काय राहणार  स्थिती? 
दिलासादायक! चार दिवसानंतर सोन्याच्या दरात घसरण, सध्या किती दर? पुढच्या काळात काय राहणार  स्थिती? 
टाटाकडून महिला टीम इंडियाचा सन्मान; संघातील प्रत्येक खेळाडूस कार गिफ्ट करत बहुमान
टाटाकडून महिला टीम इंडियाचा सन्मान; संघातील प्रत्येक खेळाडूस कार गिफ्ट करत बहुमान

व्हिडीओ

Shivsena And BJP Seat Sharing : युतीचा बोलबाला, कधी ठरणार फॉर्म्युला? Special Report
NCP Alliance : मित्रांनी ठेवलं दूर, काकांशी एकीचा सूर; कुणाला डोकेदुखी? Special Report
Thackeray Brother Alliance : बिगुल वाजलं तरी ठाकरे बंधूंच्या युतीचं नाही ठरलं? Special Report
Chandrapur Farmer :कर्ज फेडण्यासाठी शेतकऱ्याने विकली किडनी? शेतकऱ्याचा धक्कादायक दावा Special Report
Navneet Rana : पक्ष की पती? नवनीत राणांची कुणाशी सहमती? भाजप राणांना झापणार की जपणार? Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Tuljapur News : तुळजापुरात भाजप आणि माविआच्या कार्यकर्त्यांमध्ये राडा, तुफान हाणामारी करत हवेत गोळीबार; काँग्रेस उमेदवाराचा पुतण्या गंभीररित्या जखमी
तुळजापुरात भाजप आणि माविआच्या कार्यकर्त्यांमध्ये राडा, तुफान हाणामारी करत हवेत गोळीबार; काँग्रेस उमेदवाराचा पुतण्या गंभीररित्या जखमी
माजी मंत्र्यांचा पुतण्या बांधणार भाजपमधील नाराज बंडखोरांची मोट, अकोल्यात स्थापन होणार नवी आघाडी
माजी मंत्र्यांचा पुतण्या बांधणार भाजपमधील नाराज बंडखोरांची मोट, अकोल्यात स्थापन होणार नवी आघाडी
दिलासादायक! चार दिवसानंतर सोन्याच्या दरात घसरण, सध्या किती दर? पुढच्या काळात काय राहणार  स्थिती? 
दिलासादायक! चार दिवसानंतर सोन्याच्या दरात घसरण, सध्या किती दर? पुढच्या काळात काय राहणार  स्थिती? 
टाटाकडून महिला टीम इंडियाचा सन्मान; संघातील प्रत्येक खेळाडूस कार गिफ्ट करत बहुमान
टाटाकडून महिला टीम इंडियाचा सन्मान; संघातील प्रत्येक खेळाडूस कार गिफ्ट करत बहुमान
यल्लामा देवीची 3 दिवस यात्रा, देशभरातून हजारो तृतीयपंथी जमले; दागदागिन्यांचा शृंगार अन् मोठा उत्सव
यल्लामा देवीची 3 दिवस यात्रा, देशभरातून हजारो तृतीयपंथी जमले; दागदागिन्यांचा शृंगार अन् मोठा उत्सव
Narendra Modi : मोदींच्या शिरपेचात आणखी एक आंतरराष्ट्रीय तुरा; इथियोपियाचा सर्वोच्च पुरस्कार ‘ग्रेट ऑनर निशान’ने सन्मानित
मोदींच्या शिरपेचात आणखी एक आंतरराष्ट्रीय तुरा; इथियोपियाचा सर्वोच्च पुरस्कार ‘ग्रेट ऑनर निशान’ने सन्मानित
पुणे, पिंपरीत दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार? अजित पवारांशी बंद दाराआड चर्चा, तुषार कामठे काय म्हणाले?
पुणे, पिंपरीत दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार? अजित पवारांशी बंद दाराआड चर्चा, तुषार कामठे काय म्हणाले?
Director Rob Reiner Wife Murder Case: सुप्रसिद्ध दिग्दर्शकाला पत्नीसह संपवलं; राहत्या घरात रक्ताच्या थारोळ्यात आढळले मृतदेह, पोटच्या पोरावरच पोलिसांची संशयाची सुई
सुप्रसिद्ध दिग्दर्शकाला पत्नीसह संपवलं; राहत्या घरात रक्ताच्या थारोळ्यात आढळले मृतदेह, पोटच्या पोरावरच पोलिसांची संशयाची सुई
Embed widget