Shivshahi Bus Accident : शिवशाही बस अपघातातील मृतांचा आकडा वाढला,राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, पंतप्रधानांकडून शोक व्यक्त
Gondia Shivshahi Bus Accident : गोंदिया जिल्ह्यातील सडक अर्जुनी तालुक्यात झालेल्या शिवशाही बस अपघातात आतापर्यंत 11 जणांचा मृत्यू झाला आहे. मृतकांमध्ये एक महिला पोलीस कर्मचार्याचा देखील समावेश आहे.
Gondia Shivshahi Bus Accident : गोंदिया जिल्ह्यातील सडक अर्जुनी तालुक्यात झालेल्या शिवशाही बस अपघातात आतापर्यंत 11 जणांचा मृत्यू झाला आहे. मृतकांमध्ये एक महिला पोलीस कर्मचार्याचा देखील समावेश आहे. तर 3 लोक गंभीर आणि 26 प्रवासी किरकोळ जखमी झाल्याची माहिती आहे. यातील सर्व जखमींवर गोंदिया येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात सध्या उपचार सुरू आहे. 11 मृतकांपैकी 9 मृतांची ओळख पटली असून अन्य 2 मृतकाची ओळख अद्यापही पटलेली नाही.
या अपघाताच्या बातमीने राज्यासह देशभरातून प्रतिक्रिया उमटत असून राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील शोक वक्त करत मृतांना श्रद्धांजली अर्पण केली आहे. तर अपघाताची बातमी समजताच काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी अपघातातील मृतांना तातडीने 10 लाख रुपयांची यांची मदत देण्याचे आदेश परिवहन प्रशासनाला दिले आहे. तसेच स्थानिक प्रशासनाकडून परिस्थितीची माहिती ही मुख्यमंत्र्यांनी घेतली असून जखमींना तातडीने आणि योग्य उपचार देण्याच्या सूचना ही दिल्या आहेत
देवेंद्र फडणवीसांकडून मृतांना श्रद्धांजली
गोंदियातील शिवशाही बसचा दुर्दैवी अपघाताची बातमी समजतात आता राजकीय वर्तुळातूनही हळहळ व्यक्त केली आहे. या अपघाताबद्दल आता देवेंद्र फडणवीस यांनीही शोक व्यक्त करत मृतांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली आहे. गोंदिया जिल्ह्यातील सडकअर्जुनीनजीक शिवशाही बसचा दुर्दैवी अपघात होऊन काही प्रवाशांचा मृत्यू झाल्याची घटना अतिशय दुर्दैवी आहे. मृतांना मी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. त्यांच्या कुटुंबीयांच्या दु:खात आम्ही सहभागी आहोत. या घटनेत जे लोक जखमी झाले, त्यांना खाजगी रुग्णालयात उपचार द्यावे लागले तरी ते तातडीने द्या, असे निर्देश देण्यात आले आहेत. आवश्यकता भासल्यास त्यांना नागपूरला हलविण्याची व्यवस्था करा, असेही मी गोंदियाच्या जिल्हाधिकार्यांना सांगितले आहे. प्रशासनातील वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी पोहोचले असून, ते मदतकार्यासाठी समन्वय करीत आहेत. या घटनेतील जखमींना लवकर आराम पडावा, अशी मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो. असे देवेंद्र फडणवीस यांनी एका पोस्टच्या माध्यमातून आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.
Deeply anguished to learn about the loss of lives, including many women, in a tragic bus accident in the Gondia district of Maharashtra. I extend my deepest condolences to the bereaved families and pray for the speedy recovery of the injured.
— President of India (@rashtrapatibhvn) November 29, 2024
शिवशाही बस अपघातात आतापर्यंत 11 जणांचा मृत्यू
1) स्मिता सूर्यवंशी (32) रा. मोरगाव अर्जुनी (पोलीस कर्मचारी)
2) मंगला राजेश लांजेवार (60) राहणार पिपरी जिल्हा भंडारा
3) राजेश देवराम लांजेवार राहणार पिपरी जिल्हा भंडारा
4) कल्पना रविशंकर वानखेडे (65) राहणार वरोरा जिल्हा चंद्रपूर..
5) रामचंद्र कनोजे (65) राहणार चांदोरी साकोली जिल्हा भंडारा..
6) अंजिरा रामचंद्र रामचंद्र कनोजे (60) राहणार चांदोरी साकोली जिल्हा भंडारा
7) आरिफ अजहर सय्यद (42) राहणार घोटी गोरेगाव गोंदिया
8) अजहर अली सय्यद (55) राहणार घोटी गोरेगाव गोंदिया
9) नयना विशाल मिटकरी (35) राहणार बेसा जिल्हा नागपूर
10) अनोळखी पुरुष
11) अनोळखी पुरुष
हे ही वाचा