एक्स्प्लोर

निवडणूक निकाल २०२४

(Source: ECI/ABP News/ABP Majha)

मूळ मुद्द्याला बगल देत विरोधकांना बदनाम करण्याचे भाजपचे षड्यंत्र; काँग्रेस प्रदेशाध्यक्षांचा घणाघात

Nana Patole : धर्मरावबाबा आत्राम यांनी विजय वडेट्टीवार हे लवकरच भाजपमध्ये प्रवेश करणार, असा दावा केला होता. यावरून नाना पटोले यांनी जोरदार हल्लाबोल केला आहे.

Nana Patole : राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री धर्मरावबाबा आत्राम (Dharamraobaba Atram) यांनी राज्याचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार (Vijay Wadettiwar) हे लवकरच भाजपमध्ये (BJP) प्रवेश करणार, असा दावा केला होता. या दाव्यानंतर ऐन निवडणुकीच्या काळात राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली असून अनेक आरोप- प्रत्यारोपांच्या फैरी झाडण्यात येत आहे.

आता काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी या वादात उडी घेत भाजपला मूळ मुद्द्याला बगल देऊन जनतेचे लक्ष दुसरीकडे वळवण्यात प्रयत्न करत असल्याचा आरोप केलाय. धर्मरावबाबा आत्राम यांना गडचिरोलीचे पालकमंत्री पद न देता गोंदियाला पाठवण्यात आले आहे. त्यामुळे त्यांच्या पक्षात काय सुरू आहे हे लक्षात येईल. तुम्ही भाजपसोबत जर विकासासाठी गेलात तर मग विकासावर बोलायला हवं. मात्र दुसऱ्यांचे लोक चोरायचे आणि जे येत नसेल त्यांना बदनाम करायचं षडयंत्र महयुतीच्या नेत्यांकडून होत असल्याचेही नाना पटोले म्हणालेत.

मूळ विषयाला बगल देण्याचे हे षड्यंत्र 

राज्याचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार (Vijay Wadettiwar) यांनी स्वत: या अफवांवर भाष्य करत त्याला मूठमाती दिली आहे. मात्र असे असताना सर्वसामान्यांना मूळ विषयापासून दूर नेत कुठंतरी गुंतवून आपली राजकीय पोळी भाजण्याचे काम सध्या केलं जातंय. अशाच पद्धतीने माझा 2014 चा एक व्हिडिओ भाजपने वायरल केलाय. त्याच्यावर वेळीच कारवाई करून गुन्हा दाखल करण्याचे आम्ही निवडणूक आयोगाला कळवले आहे. हा प्रकार जनतेचा लक्षात आला असून त्यांच्या मनात भाजप विषयी प्रचंड राग आहे. या रागाला आता कसे सावरता येईल याचा एक अयशस्वी प्रयत्न भाजप करताना आपण पाहतोय. त्यांच्यासोबत असलेले जे भ्रष्टाचारी लोक आज विजय वडेट्टीवारांबद्दल बोलतात हा खोडसळपणा असून त्याला कुठलाही अर्थ नसल्याचेही नाना पटोले म्हणाले. 

नेमकं प्रकरण काय ? 

राज्याचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार (Vijay Wadettiwar) 4 जूननंतर भाजपमध्ये येणार असल्याचा दावा राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे मंत्री  धर्मराव बाबा आत्राम ( Dharamraobaba Aatram) यांनी केला होता.  या दाव्यानंतर राजकीय क्षेत्रात एकच खळबळ उडाली होती. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अशोक चव्हाण यांच्या उपस्थितीत आलपल्लीमध्ये महायुतीच्या सभेचं आयोजन केलं होतं. यावेळी बोलताना आत्राम यांनी हे वक्तव्य केलं होतं. त्यानंतर या विषयी स्वत: विजय वडेट्टीवार यांनी प्रत्युत्तर देत धर्मरावबाबा आत्रामांचे सर्व दावे फेटाळून लावत  जहरी टीका केली होती. धर्मरावबाबा जर खरे राजा असतील आणि खरच त्याच्या दाव्यात दम असेल तर त्यांनी ज्या हॉटेलमध्ये भेट झाली त्याचे नाव सांगावं, भाजप प्रवेशासंदर्भात झालेल्या बैठकीचा पुरावा दाखवावा, त्यांनी तसे पुरावे दिल्यास आणि आपला दावा सिद्ध केल्यास मी त्यांची गुलामगिरी करेल, असे खुले आव्हान देत वडेट्टीवार यांनी त्यांचा खरपूस समाचार घेतला होता.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Dhule News : धक्कादायक... घंटागाडीने दीड वर्षांच्या चिमुकल्याला चिरडलं, कुटुंबियांना फोडला टाहो, धुळ्यातील दुर्दैवी घटना
धक्कादायक... घंटागाडीने दीड वर्षांच्या चिमुकल्याला चिरडलं, कुटुंबियांना फोडला टाहो, धुळ्यातील दुर्दैवी घटना
एकनाथ शिंदे कमालीचे सावध! ठाकरेंसोबत घडलेल्या घटनेची पुनरावृत्ती टाळण्यासाठी घेतला मोठा निर्णय, नेमकं काय घडलं?
एकनाथ शिंदे कमालीचे सावध! ठाकरेंसोबत घडलेल्या घटनेची पुनरावृत्ती टाळण्यासाठी घेतला मोठा निर्णय, नेमकं काय घडलं?
महाजन, गुलाबराव पाटलांसह 'हे' बडे नेते मंत्रि‍पदाच्या शर्यतीत, जळगावातून कोणाची वर्णी लागण्याची शक्यता
महाजन, गुलाबराव पाटलांसह 'हे' बडे नेते मंत्रि‍पदाच्या शर्यतीत, जळगावातून कोणाची वर्णी लागण्याची शक्यता
Dharashiv crime: आईने गळफास घेतला, दोन छोट्या बाळांची प्रेतं पाण्याच्या बॅरेलमध्ये तरंगताना दिसली, धाराशीवमधील धक्कादायक घटना
आईने गळफास घेतला, दोन छोट्या बाळांची प्रेतं पाण्याच्या बॅरेलमध्ये तरंगताना दिसली, धाराशीवमधील धक्कादायक घटना
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Eknath Shinde Submits Resignation to Governer : मुख्यमंत्री पदाचा एकनाथ शिंदेंकडून राजीनामा! फडणवीस-अजित पवार राजभवनात उपस्थितNahur Station Viral Video : मराठीत बोलल्याने रेल्वे कर्मचाऱ्याने तिकीट नाकारलं? नेमकं प्रकरण काय?Nagraj Manjule Summons : दिग्दर्शक नागराज मंजुळे यांना गंभीर प्रकरणात पुणे कोर्टाकडून समन्स; नेमकं प्रकरण काय?ABP Majha Marathi News Headlines 10AM TOP Headlines 10 AM 26 November 2024 सकाळी १० च्या हेडलाईन्स-

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Dhule News : धक्कादायक... घंटागाडीने दीड वर्षांच्या चिमुकल्याला चिरडलं, कुटुंबियांना फोडला टाहो, धुळ्यातील दुर्दैवी घटना
धक्कादायक... घंटागाडीने दीड वर्षांच्या चिमुकल्याला चिरडलं, कुटुंबियांना फोडला टाहो, धुळ्यातील दुर्दैवी घटना
एकनाथ शिंदे कमालीचे सावध! ठाकरेंसोबत घडलेल्या घटनेची पुनरावृत्ती टाळण्यासाठी घेतला मोठा निर्णय, नेमकं काय घडलं?
एकनाथ शिंदे कमालीचे सावध! ठाकरेंसोबत घडलेल्या घटनेची पुनरावृत्ती टाळण्यासाठी घेतला मोठा निर्णय, नेमकं काय घडलं?
महाजन, गुलाबराव पाटलांसह 'हे' बडे नेते मंत्रि‍पदाच्या शर्यतीत, जळगावातून कोणाची वर्णी लागण्याची शक्यता
महाजन, गुलाबराव पाटलांसह 'हे' बडे नेते मंत्रि‍पदाच्या शर्यतीत, जळगावातून कोणाची वर्णी लागण्याची शक्यता
Dharashiv crime: आईने गळफास घेतला, दोन छोट्या बाळांची प्रेतं पाण्याच्या बॅरेलमध्ये तरंगताना दिसली, धाराशीवमधील धक्कादायक घटना
आईने गळफास घेतला, दोन छोट्या बाळांची प्रेतं पाण्याच्या बॅरेलमध्ये तरंगताना दिसली, धाराशीवमधील धक्कादायक घटना
Ajit Pawar: 'रुक्मिणीला कुठं सोडलं...', अजितदादांचा सवाल, लाडक्या बहिणी म्हणाल्या, 'रुक्मिणीला आणलंय, वहिनींकडे द्यायचंय...', नेमकं काय घडलं?
'रुक्मिणीला कुठं सोडलं...', अजितदादांचा सवाल, लाडक्या बहिणी म्हणाल्या, 'रुक्मिणीला आणलंय, वहिनींकडे द्यायचंय...', नेमकं काय घडलं?
Ind vs Aus 2nd Test : कोच गौतम गंभीरने सोडली संघाची साथ; अचानक परतला भारतात, मोठं कारण आलं समोर
कोच गौतम गंभीरने सोडली संघाची साथ; अचानक परतला भारतात, मोठं कारण आलं समोर
Maharashtra Wether Updates : राज्याचा पारा घसरला; मुंबईत गुलाबी थंडीची चाहुल, पुणे गारठलं, तर नाशकात नीच्चांकी तापमानाची नोंद
राज्याचा पारा घसरला; मुंबईत गुलाबी थंडीची चाहुल, पुणे गारठलं, तर नाशकात नीच्चांकी तापमानाची नोंद
PAN 2.0 Project : मोठी बातमी! सरकारने आणलं QR कोडवालं पॅनकार्ड, जुनं पॅनकार्ड रद्दीत जाणार, पॅन 2.0 प्रोजेक्ट आहे तरी काय?
मोठी बातमी! सरकारने आणलं QR कोडवालं पॅनकार्ड, जुनं पॅनकार्ड रद्दीत जाणार, पॅन 2.0 प्रोजेक्ट आहे तरी काय?
Embed widget