एक्स्प्लोर

Devendra Fadnavis : 60 नक्षलवादी सरेंडर कसे झाले, नक्षल कमांडर भूपतीसमोर मुख्यमंत्र्यांनी A टू Z सांगितलं

Gadchiroli Naxalites News: गडचिरोली पोलिस आणि राज्याच्या गृह विभागाच्या संयुक्त कारवाईत माओवादी चळवळीतील अत्यंत महत्त्वाचा नेता मल्लोजूला वेणुगोपाल राव उर्फ सोनू उर्फ भूपती याने आपल्या साठ सहकाऱ्यांसह आत्मसमर्पण केलं आहे.

गडचिरोली : माओवादविरोधी लढाईत महाराष्ट्र पोलिसांना आतापर्यंतचे सर्वात मोठे यश मिळाले आहे. गडचिरोली पोलिस (Gadchiroli Police) आणि राज्याच्या गृह विभागाच्या संयुक्त कारवाईत माओवादी चळवळीतील अत्यंत महत्त्वाचा नेता मल्लोजूला वेणुगोपाल राव उर्फ सोनू उर्फ भूपती याने आपल्या साठ सहकाऱ्यांसह आत्मसमर्पण (Naxalites surrendered) केलं आहे. ही घटना काल (मंगळवारी १४ ऑक्टोबर) रात्री दक्षिण गडचिरोली जिल्ह्यातील छत्तीसगड सीमेलगतच्या घनदाट जंगलात घडली. पोलिसांच्या विश्वासार्ह सूत्रांनुसार, हे आत्मसमर्पण (Naxalites surrendered) अत्यंत नियोजित आणि गोपनीय स्वरूपात पार पडले. वेणुगोपाल राव हा माओवादी संघटनेचा पॉलिट ब्युरो मेंबर आणि सेंट्रल कमिटी मेंबर असून, देशातील माओवादी चळवळीतील एक कळीचा मेंदू मानला जात होता. त्याच्या आत्मसमर्पणामुळे माओवाद्यांच्या संघटनात्मक रचनेला मोठा धक्का बसला असून, गडचिरोलीतील माओवादविरोधी कारवाईत हा ऐतिहासिक टप्पा ठरल्याचे सांगितले जात आहे. दरम्यान या आत्मसमर्पणानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी याबाबतची संपूर्ण माहिती सांगितली आहे. (Naxalites surrendered)

Devendra Fadnavis :  सुरुवातीच्या काळात प्रशिक्षण देणारे, बौद्धिक देणारे भूपतीच

नक्षल कमांडर भूपतीसमोर बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले, गडचिरोलीमधून माओवादाच्या समाप्तीचा चॅप्टर लिहिण्याची सुरुवात आजपासून झाली आहे. चाळीस वर्ष सातत्याने माओवादाशी लढणारा आमचा गडचिरोली जिल्हा आहे. पीपल्स वॉर ग्रुप स्थापन झाल्यानंतर या भागातील तरुणांच्या मनात असलेल्या व्यवस्थेबद्दल संशय निर्माण करण्यात आले आणि या व्यवस्थेमध्ये आपल्याला न्याय मिळू शकत नाही, म्हणून संविधानाने निर्माण केलेली व्यवस्था उलथून लावली पाहिजे आणि त्याच्या पर्याय म्हणून आपण जंगलातून पर्यायी व्यवस्था चालवू असे खोटे स्वप्न दाखविले गेले. त्याला इथले काही तरुण बळी पडली. सोनू उर्फ भूपतीचा आत्मसमर्पण अत्यंत महत्त्वाचा आहे. तो पॉलीट ब्युरो मेंबर सेंट्रल कमिटी मेंबर तर आहेच. सोबतच गडचिरोली जिल्ह्यात माओवादी दल निर्माण झाल्यानंतर त्यांना सुरुवातीच्या काळात प्रशिक्षण देणारे, बौद्धिक देणारे भूपतीच होते.

Devendra Fadnavis : देशाच्या इतिहासाची अत्यंत मोठी बाब

भूपतीने या संपूर्ण भागात माओवादी चळवळीचा म्होरक्या म्हणून भूमिका बजावली आहे. मोदी सरकारने चोख धोरण राबविले, तीव्रतेने विकास केले आणि दुसऱ्या बाजूला माओवाद्यांना आत्मसमर्पण करण्यास ही प्रोत्साहित केले.अमित शहा यांची गृह मंत्री म्हणून भूमिका महत्त्वाची ठरली. गडचिरोली पोलिसांनी खासकरून c 60 ने ऑपरेशन राबविले. माओवाद्यांची भरती बंद करून दाखविले. पोलिस दल यासाठी स्तुतीस पात्र आहे. गडचिरोलीचे पोलिस अधीक्षक निलोत्पल आणि त्यांची पूर्ण टीम खास अभिनंदनास पात्र आहे. 
भूपती सारख्या अतीवरिष्ठ आणि सुशिक्षित माओवादी, ज्याने आपल्या बौद्धिक गुणांनी संपूर्ण चळवळ उभी करून दाखवली. अशा माओवादी कमांडरला शस्त्रांसह आत्मसमर्पित करून दाखवणं हे देशाच्या इतिहासाची अत्यंत मोठी बाब आहे. उत्तर गडचिरोली आधीच सशस्त्र माओवादापासून मुक्त झाला आहे. दक्षिण गडचिरोलीमध्ये कंपनी 10 चे बोटावर मोजण्याइतके माओवादी शिल्लक आहे आता त्यांनीही आत्मसर्पण करावे अशी माझी त्यांना विनंती आहे.छत्तीसगड मध्ये लवकर मोठे आत्मसमर्पण होईल अशी अपेक्षा आहे, असंही फडणवीसांनी पुढे म्हटलं आहे

Devendra Fadnavis : गडचिरोलीला देशातला ग्रीन स्टील हब बनवायचे आहे

आपण विचारसरणीवरील युद्ध (ideological war) आपण हरलो आहे, हे माओवाद्यांच्या लक्षात आले आहे. त्यामुळे उरलेल्यानी ही लवकर आत्मसमर्पण करावे. आज जे घडते आहे ते एक जानेवारीला तारकाच्या आत्मसर्पणाने त्याचे बिजारोपण झाले होते. ज्यांनी ज्यांनी आत्मसमर्पण केले त्यांना संविधानाच्या माध्यमातून आपण न्याय देऊ. लॉयड्स मेटल्स (Loyads.metals) मध्ये आधीच आत्मसमर्पित माओवाद्यांना नोकऱ्या मिळवून दिल्या आहे. आज आत्मसमर्पण करणाऱ्या माओवाद्यापैकी ज्यांची इच्छा असेल, त्यांना ही लॉयड्स मेटल्स(loyads metals) किंवा इतर उद्योगांमध्ये मध्ये नोकऱ्या मिळवून दिली जाईल. गडचिरोलीचा स्टील हब म्हणून विकास होत आहे, जे जे उद्योग इथे आले आहे किंवा भविष्यात येतील त्या सर्वांना आपण अट घातली आहे की जास्त करून भूमिपुत्रांनाच त्यांनी नोकऱ्या द्याव्या. गडचिरोलीचा विकास होत असताना इथली जैवविविधता आपण नष्ट होऊ देणार नाही. मोठ्या प्रमाणावर वृक्ष लागवड केली जाणार आहे. गडचिरोलीला देशातला ग्रीन स्टील हब बनवायचे आहे. गडचिरोलीला महाराष्ट्राचा शेवटचा जिल्हा मानला जायचा, पनिशमेंट पोस्टिंग(punishment posting) म्हणून गडचिरोलीकडे पाहिले जायचे. आज तो पहिला जिल्हा म्हणून मानला जात आहे, असंही यावेळी फडणवीसांनी म्हटलं आहे.

Devendra Fadnavis : मुख्यमंत्र्यांनी भूपती संदर्भात पोलिसांकडून देण्यात आलेला शब्द पाळला

भूपती शरण येऊ शकतो, मात्र तो तेलंगणाला शरण जाईल किंवा छत्तीसगडला तो शरणागती पत्करेल, अशी शक्यता व्यक्त केली जात असताना, भूपतीने महाराष्ट्र पोलिसांसमोर शरण जाणे मान्य केले. गेले काही दिवस मध्यस्तांच्या माध्यमातून भूपती आणि त्यांच्या सहकाऱ्यांसोबत चर्चा सुरू होती. शासनाला शरण गेल्याने आणि शस्त्रे खाली ठेवून समाजाच्या मुख्य प्रवाहात गेल्याने काय फायदे होतील हे समजवण्यात पोलीस आणि त्यांचे मध्यस्थ यशस्वी ठरले. मात्र, भूपतीने शरणागती पत्करण्यापूर्वी एक अट घातली होती, की तो शरणागती फक्त महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांच्या समोरास पत्करेल आणि मुख्यमंत्र्यांनीही भूपतीने शरणगतीचा निर्णय घेतल्यानंतर आज त्यांचे सर्व प्रमुख कार्यक्रम बाजूला ठेवले आणि महाराष्ट्राच्या वतीने पोलीस आणि त्यांच्या मध्यस्थांनी जो शब्द भूपतीला दिला होता, तो शब्द आज मुख्यमंत्री गडचिरोलीला येऊन पाळत आहेत.

Who is Naxal Leader Bhupati: माओवाद्यांचा टॉप माओवादी नेता भूपती नेमका कोण?

माओवाद्यांचा पॉलिट ब्युरो मेंबर तसेच सेंट्रल कमिटी मेंबर मल्लोजूला वेणुगोपाल राव (Venugopal Rao) उर्फ सोनू उर्फ भूपती  हा नक्षल चळवळीतील मेंदू समाजाला जातो. त्याने 2 नोव्हेंबर 1980 रोजी गडचिरोली जिल्ह्यातील मोयाबिनपेठा येथे सीआरपीएफ आणि माओवाद्यांमध्ये पहिली चकमक झाली होती. तेव्हा तत्कालीन सीरपूर दलमचा पेद्दी शंकर हा माओवादी कमांडर ठार झाला होता. आणि तेव्हाच माओवाद्यांविरोधातला पहिला गुन्हा दाखल झाला होता. त्यानंतर 1982 मध्ये गडचिरोली जिल्ह्यातील सिरोंचा जवळील अमरादी या गावात माओवाद्यांनी पहिल्यांदा सामान्य व्यक्ती वर हल्ला केला होता. तेव्हा त्या भागातील शिक्षक राजू मास्टर यांचा उजवा हात माओवाद्यांनी कापला होता.

1980 पासून 2025 पर्यंतमहाराष्ट्रातील माओवादाची आकडेवारी

दरम्यान, 1980 पासून गडचिरोलीत सुरू झालेल्या माओवाद सशस्त्र चळवळीत आजवर माओवाद्यांनी 538 सामान्य नागरिकांचे जीव घेतले आहे.

आजवर 4213 माओवादी यांना अटक करण्यात आली आहे.

तर 1522 माओवादी पोलिसांना शरण आले आहे.

तर 347 माओवाद्यांना ठार मारण्यात पोलिसांना यश आले आहे.

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Vishal Patil: सांगलीच्या शाळकरी शौर्यने दिल्लीत जीव दिला, एफआयआर होऊनही अटकेची कारवाई नाही; खासदार विशाल पाटलांचा संसदेत रुद्रावतार
Video: सांगलीच्या शाळकरी शौर्यने दिल्लीत जीव दिला, एफआयआर होऊनही अटकेची कारवाई नाही; खासदार विशाल पाटलांचा संसदेत रुद्रावतार
Jobs in germany Maharashtra: महायुती सरकारच्या दुर्लक्षामुळे मोठं नुकसान, 10 हजार विद्यार्थ्यांची जर्मनीत नोकरीची संधी हुकली
Jobs in germany: महायुती सरकारच्या दुर्लक्षामुळे मोठं नुकसान, 10 हजार विद्यार्थ्यांची जर्मनीत नोकरीची संधी हुकली
Pune Land Scam:  'मला भावाच्या लग्नाला जायचंय, वेळ वाढवून द्या'; दिग्विजय पाटलांनी चौकशीत काय म्हटलं?
'मला भावाच्या लग्नाला जायचंय, वेळ वाढवून द्या'; दिग्विजय पाटलांनी चौकशीत काय म्हटलं?
Pune Land Scam: 300 कोटी कोणाच्या बँक अकाउंटला गेले? शीतल तेजवानी प्रकरणात सरकारी वकिलांचा कोर्टात मोठा युक्तीवाद
300 कोटी कोणाच्या बँक अकाउंटला गेले? शीतल तेजवानी प्रकरणात सरकारी वकिलांचा कोर्टात मोठा युक्तीवाद
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Godwoman Defrauded : माझाची काठी, वसूल 14 कोटी, माझाच्या बातमीचा इम्पॅक्ट Special Report
IndiGo Plane : इंडिगो जमिनीवर, खोळंब्याचा टेक ऑफ, सेवा विस्कळित का झाली? Special Report
Sayaji Shinde :सयाजींची भूमिका सत्ताधाऱ्यांना पटेना, वृक्षतोडीला सयाजी शिंदेंचा विरोध Special Report
Nitesh Rane : झाडांचा गेम, बकऱ्यांवरून नेम; पर्यावरणप्रेम आणि बकऱ्यांचा संबंध तरी काय? Special Report
Maharashtra LIVE Superfast News : 5.30 PM : बातम्यांचा वेगवान आढावा : 04 DEC 2025 : ABP Majha

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Vishal Patil: सांगलीच्या शाळकरी शौर्यने दिल्लीत जीव दिला, एफआयआर होऊनही अटकेची कारवाई नाही; खासदार विशाल पाटलांचा संसदेत रुद्रावतार
Video: सांगलीच्या शाळकरी शौर्यने दिल्लीत जीव दिला, एफआयआर होऊनही अटकेची कारवाई नाही; खासदार विशाल पाटलांचा संसदेत रुद्रावतार
Jobs in germany Maharashtra: महायुती सरकारच्या दुर्लक्षामुळे मोठं नुकसान, 10 हजार विद्यार्थ्यांची जर्मनीत नोकरीची संधी हुकली
Jobs in germany: महायुती सरकारच्या दुर्लक्षामुळे मोठं नुकसान, 10 हजार विद्यार्थ्यांची जर्मनीत नोकरीची संधी हुकली
Pune Land Scam:  'मला भावाच्या लग्नाला जायचंय, वेळ वाढवून द्या'; दिग्विजय पाटलांनी चौकशीत काय म्हटलं?
'मला भावाच्या लग्नाला जायचंय, वेळ वाढवून द्या'; दिग्विजय पाटलांनी चौकशीत काय म्हटलं?
Pune Land Scam: 300 कोटी कोणाच्या बँक अकाउंटला गेले? शीतल तेजवानी प्रकरणात सरकारी वकिलांचा कोर्टात मोठा युक्तीवाद
300 कोटी कोणाच्या बँक अकाउंटला गेले? शीतल तेजवानी प्रकरणात सरकारी वकिलांचा कोर्टात मोठा युक्तीवाद
Palak Muchhal Reaction On Smriti Palash Wedding: स्मृती मानधना-पलाशच्या लग्नाबाबत बहिणीचं सूचक वक्तव्य, 'त्या' दोन वाक्यांनी आशा पल्लवित, पलक मुच्छल नेमकं काय म्हणाली?
स्मृती मानधना-पलाशच्या लग्नाबाबत बहिणीचं सूचक वक्तव्य, 'त्या' दोन वाक्यांनी आशा पल्लवित, पलक मुच्छल नेमकं काय म्हणाली?
Gold price hike dollar rate: अबब! सोने दरात मोठी उसळी, एका आठवड्यात 5000 रुपयांनी भाव वाढला, एक तोळा सोन्याची किंमत किती?
सोने दरात मोठी उसळी, एका आठवड्यात 5000 रुपयांनी भाव वाढला, एक तोळा सोन्याची किंमत किती?
Maharashtra Live blog: अखेर ऊस दराची पहिल्या उचलीची कोंडी फुटली, पहिली उचल 2725 जाहीर
Maharashtra Live blog: अखेर ऊस दराची पहिल्या उचलीची कोंडी फुटली, पहिली उचल 2725 जाहीर
Online food delivery: 25 लाखांच्या नोकरीला लाथ मारून डिलिव्हरी बॉय बनण्याचा धाडसी निर्णय; तरुणाचा भन्नाट प्लॅन ऐकून तुम्हीही थक्क व्हाल!
25 लाखांच्या नोकरीला लाथ मारून डिलिव्हरी बॉय बनण्याचा धाडसी निर्णय; तरुणाचा भन्नाट प्लॅन ऐकून तुम्हीही थक्क व्हाल!
Embed widget